आमच्यासारखे आम्हीच (भाग 34)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

😭 तो प्रज्वल बघ ना... माझं न ऐकताच त्याने मला झापलं....असं म्हणून अनुयाने, नेहाला" प्रज्वल "आणि तिचं काय बोलणं झालं हे सांगितलं.....

नेहा : हं, अनुया!! मग रडतेस कश्याला??🤔तूला तर खूष व्हायला पाहिजे 😂😂

अनुया :🙄म्हणजे??

नेहा :अगं आतापासूनच तूला तो प्रोटेक्ट करतोय😊.... पजेसिव्ह झालाय गं😍😍...

अनुया :🥺काय गं नेहा... प्रज्वल माझ्यावर चिडलाय आणि तूला गंम्मत सुचतेय 😒

नेहा : बरं बरं ते राहू दे... आपण गीतिकाशी बोलून मग प्रज्वलला गीतिका बद्दल सांगू.... चल त्यांच्या रूम मध्ये...

अनुया : गीतिका!! ऐक ना... अगं एक प्रॉब्लेम झालाय.... असं म्हणत अनुयाने, प्रज्वल आणि तिच्यात काय बोलणं झालं ते गीतिकाला सांगितलं....

गीतिका : अनुया!! तू प्रज्वलला माझ्याबद्दल सांगितलं नाहीस का??🤦‍♀️

अनुया : गीतिका!! मला वाटलं तूला ते आवडणार नाही...

गीतिका : हे बघ अनुया!!आता जेव्हा आपण गीतेश सरांना धडा शिकवायचं ठरवलं तेव्हा त्याच्यासमोर माझ्या आवडीनिवडीला महत्व नाही... अन तू सांग प्रज्वलच्या जागी दुसरं कुणीही असेल तर अर्धवट ऐकल्यावर असंच रिऍक्ट होणार....ते काही नाही तू बिनधास्त त्याला माझ्याबद्दल सांग.. का मी सांगू??🤔.....

अनुया : हूं... मी आता काय बोलू🤷...  रागाने फोन कट केलाय....त्याने माझ्याशी बोलायला तर पाहीजे ना🥺...

तितक्यात अनुयाच्या मेसेंजर वर प्रज्वलचा मेसेज आला... सॉरी, खूप हार्श वागलो मी.... काय करू त्या माणसाचं नाव ऐकलं नी माझं डोकंच उठलं....

मेसेज बघून अनुयाने आनंदाने डोळे पुसले आणि लागलीच  प्रज्वलला फोन📳 लावला....

अनुया : हॅलो प्रज्वल!! तूला राग आला.. ते मान्य... पण आता मी जे काही सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक.. असं म्हणून अनुयाने,गीतिकाबद्दल प्रज्वलला सांगितलं.... गीतेश सर अजूनही तीला मेसेजेस करत आहेत आणि आता त्यांना नक्कीच धडा शिकवायचा आहे.हे आमचं चौघीचं ठरलं आहे....कारण हे प्रकरण आता आपल्या ग्रुप पर्यंत येऊन पोहोचलं आहे......

प्रज्वल :अच्छा असं आहे तर... तू मला आधी का नाही सांगितलं... असा विनाकारण मी तुझ्यावर चिडलो नसतो...बरं ते जाऊ दे... मी उद्या ऑफिस मधून माहिती काढतो.... गीतेश सरांची आताची बायको तर माझी बॅचमेटच आहे....

अनुया : सध्यातरी तीची माहिती नको... कारण आपल्याला  त्यांचा आता चाललेला संसार उध्वस्त करायचा नाहीये...

प्रज्वल : ठीक आहे, उद्याच ऑफिस मधून मी आधीच्या तिघींची माहिती काढतो... गीतेश सरांची जी पहिली पत्नी होती तीची माहिती नाही काढता येणार.. तरीही प्रयत्न करतो काही link लागते का....

अनुया : चल आता खूप उशीर झाला आहे. मी फोन ठेवते.. पण एक गोष्ट लक्षात ठेव की आता मिशन गीतेश सर मध्ये तूला देखील काम करायचे आहे.... No excuse..

प्रज्वल : जशी आपली आज्ञा.... राणीसरकार 😉

अनुया: 🥰 काहीतरीच काय??

प्रज्वल :अगं खरं 😊

 अनुया :बरं बरं 😍गुडनाईट....

प्रज्वल : गुडनाईट😍....

दुसऱ्या दिवशी प्रज्वल ने ऑफिस मध्ये जाऊन क्लर्क ला गेल्या सहा वर्षांपासूनचे ऍड्रेस आणि फोन नंबर असलेले रेकॉर्ड मागितले...

सुरुवातीला रेकॉर्ड न दाखवणारा क्लार्क पाचशेची नोट समोर केल्यावर त्याने पटकन रेकॉर्ड दिले....दुसरी पाचशेची नोट समोर केल्यावर त्याने गीतेश सरांच्या तीनही बायकांचे नाव, फोन नंबर आणि ऍड्रेसचे फोटो मिळाले त्याने त्याच्या मोबाईल मध्ये ते काढले आणि लागलीच अनुयाला फॉरवर्ड केले....

या महिन्याच्या खर्चातील शेवटचे हजार रुपये होते हे अजून अर्धा महिना कटायचा आहे 😥... जाऊदे प्रज्वल प्रेमासाठी काहीपण.....😘

आज गुड मॉर्निंग मेसेज सोबत गीतेश सरांनी गीतिकाला पुन्हा भेटण्यासाठी विनवणी केली... गीतिका आपल्याला रिप्लाय करत नाहीये फक्त मेसेज पाहत आहे.हे गीतेश सरांना कुठेतरी खटकत होतं.... गीतिका आपल्याला टाळत जरी नसली तरी तितका रिस्पॉन्सही देत नाहीये... नक्की तिच्या मनात काय चाललंय हे सरांना जाणून घ्यायचं होतं....

गीतिका : सायली!! गीतेश सर मला भेटायला बोलावत आहेत...भेटणं तर दूरच मला तर आता त्या माणसाचे तोंड देखील बघवत नाही...

सायली :हूं 

गीतिका!! गीतेश सरांच्या तीनही बायकांचे फोन नंबर आणि पत्ते मिळाले आहेत.... आणि नशिबाने त्यांचे पत्ते पुण्याचेच आहेत... फक्त एक सिहंगड रोड, एक कोथरूड तर एक हडपसर एरियात राहते...अनुया गीतिकाच्या रूम मध्ये येऊन म्हणाली....

गीतिका : अगं अनुया!! पण ते त्यांच्या लग्नाच्या आधीचे पत्ते असतील ना...

नेहा : dont worry गीतिका!! फोन नंबर पण आहेतच ना....काही ना काही सुरुवात तर झाली....तूला गीतेश सरांनी भेटायला सांगितलं ना... तू फक्त आपलं काम होईपर्यंत त्यांना कसही करून घुमव... नंतर ते त्यांना  आयुष्यभर लक्षात राहील 😉....

अनुया :पण आपण नेमकं करायचं काय??

नेहा : आज कॉलेज सुटल्यावर इथून या श्रावणी मॅडमची भेट घेऊ.....जवळ पण राहतात.... निघताना आधी फोन करून बघू.....

कॉलेज मध्ये गेल्यावर देखील या चौघीच्या डोक्यातून   मिशन गीतेश सरांचे विचार जातच नव्हते...

कॉलेज सुटल्यावर नेहाने श्रावणी मॅम ला फोन लावला....

नेहा : हॅलो हा श्रावणी मॅम चा नंबर आहे का??

श्रावणी : हो... बोलतीये.

नेहा : मॅम मी इंजिनियरिंग कॉलेज ची विद्यार्थिनी बोलत आहे.. मला तूमची भेट घ्यायची होती...

इंजिनियरिंग कॉलेज चं नाव ऐकताच श्रावणी जरा कचरली.... का??काय काम होतं....

नेहा : मॅडम ते असं फोन वर नाही सांगता येणार प्लीज आपण भेटून बोलूयात का?? तूम्ही सांगाल त्या वेळेवर मी यायला तयार आहे....

श्रावणीने थोडा वेळ विचार केला.... ठिक आहे...संध्याकाळी साडे सहा वाजता आपण भेटू... तू माझ्या घरीच ये....असं म्हणून घराचा पत्ता नेहाला दिला....

नेहा : थँक यू मॅम!! मी नक्की सहा वाजता येते....

ए गीतिका!!लवकर निघ आपल्याजवळ फार थोडा वेळ शिल्लक आहे.... आपल्याला साडे सहा पर्यंत श्रावणी मॅम कडे पोहोचायचं आहे....

गीतिका :आपण दोघीच जायचं?? 🤔

नेहा : हो कारण आपण चौघी गेलो तर मॅमना दडपण येईल.....

नेहा आणि गीतिका ऑटोने श्रावणी मॅमच्या घरी पोहोचल्या.....

क्रमश :
भाग 35 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇


कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या