आमच्यासारखे आम्हीच (भाग 35)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

"श्रावणी" नेहा आणि गीतिकाची वाटच पाहत होती....

नेहा ने थोडंसं घाबरतच श्रावणीच्या घराचा दरवाजा ठोठावला....

श्रावणीनेच दरवाजा उघडला..

नेहा आणि गीतिका श्रावणीकडे बघतच राहील्या....
किती अप्रतिम सोंदर्य या श्रावणीला देवाने  दिलं आहे... एखादी पिक्चरची हिरोईनच वाटत आहे... गोरीपान,स्मित करताना पडणारी गालावर खळी.... पण गीतेश सरांना श्रावणी नंतर देखील दुसरी कुणी आवडावी 🤔 🙄

नेहा : श्रावणी मॅम का?? मी नेहा...

नेहाच्या आवाजाने गीतिकाची तंद्री तुटली...

श्रावणी : हं मीच श्रावणी.... ये आत.....

नेहा : श्रावणी मॅम!! मला थोडं पर्सनल बोलायचं होतं....आपल्याला ईथे बसून बोलता येईल का??

श्रावणी : पर्सनल 🤔?? माझ्याशी?? सध्या घरी कुणीच नाहीये... तू बोलू शकतेस...

नेहा : मॅम!!ही "गीतिका" माझी खास मैत्रीण.... हिला गीतेश सरांनी त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता... तसं ती ही काही कालावधी पुरती त्यांच्या कडे आकर्षित झाली होती.... पण नशिबाने गीतेश सर तिच्या भावनांशी खेळतात हे तिच्या लक्षात आले....

श्रावणी : गीतिका!!सुंदर आहेस गं तू... नेहा!!पण तू मला हे गीतेश सरांबद्दल का सांगत आहेस??🤔

गीतिकाने तिच्या मोबाईल वरचे recent मेसेजेस श्रावणीला दाखवले.... आणि म्हणाली मॅम!!गीतेश सरांची प्रत्येकवर्षी एका तरी मुलीला त्यांच्या जाळ्यात अडकवण्याची श्रुखला अजूनही चालूच आहे....

श्रावणी : तो माणूस तसाच आहे😡.... एक तर तो वर्गातील सुंदर मुलगी निवडतो आणि बरोबर तीला जाळ्यात ओढतो... असं शिताफीने जाळ्यात अडकवतो की त्यातून बाहेर निघणे शक्यच होत नाही... गीतिका!!तू बरी त्याच्या तावडीतून  सुटलीस. त्याच्याकडून तो सुधारण्याची अपेक्षाच आपण करू शकत नाही😡....

नेहा : तेच आमच्याही लक्षात आले.... तुम्हाला सांगते आम्हाला कॉलेज सुरु झाल्या झाल्या क्लासमेट आणि सिनियर्स नी देखील वॉर्निंग दिली होती....

गीतिका :तरीही मी आकर्षित झालेच.....

श्रावणी : हं... मग आता काय??

नेहा : आम्ही गीतेश सरांना धडा शिकवायचं ठरवलं आहे .... पण तुमच्या मदती शिवाय ते शक्य नाही....

श्रावणी : हे बघ नेहा!! जर गीतेश सरांशी पून्हा बोलायचे  किंवा भेटायचे असे काही असेल तर मला त्या माणसाचे तोंड देखील बघायचे नाहीये....

नेहा : नाही नाही श्रावणी मॅम!!आम्हीच तुम्हाला तसं काहीच करायला लावणार नाही.... फक्त ईतकं हवं आहे, की नेमकं तुमच्यासोबत काय काय घडलं हे आम्हाला सांगा हेच आमच्यासाठी खूप आहे....

श्रावणी : पण का म्हणून मी सांगू... का म्हणून माझ्या भावनांचा बाजार मी तुमच्या समोर मांडू...

नेहा : नाही नाही मॅडम!!तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.... खरं सांगू का मॅडम मी तुम्हाला आता पाहिलं तेव्हा वाटलं की श्रावणी मॅम किती सुंदर आहेत.🤔 मग तरी देखील तुमच्या सोबत असं काहीतरी विपरीत घडावं.... जरा स्पष्टच बोलते मॅम!!तुम्हाला कधीच वाटलं नाही का की अश्या माणसाला चांगली अद्दल घडावी म्हणून....

श्रावणी : वाटलं ना??

नेहा : मग हा चांगला चान्स आहे....

श्रावणी : पण तूम्ही काय करणार??

नेहा : अजून तरी ठरलं नाही...तूम्ही, शारदा मॅम आणि दीपाली मॅम ना भेटून नेमकं काय घडलं ते माहिती करून घेणार.....

श्रावणी :आणि मयुरा बद्दल??🤔

नेहा : मयुरा म्हणजे त्यांची पहिली बायको का??

श्रावणी :हो....

नेहा: सॉरी आम्हाला त्या आपल्या कॉलेज मधल्या नसल्याने त्यांचे नाव देखील माहिती नव्हते....

श्रावणी : अच्छा... ऐका तर मग....

नेहा आणि गीतिका श्रावणी काय ऐकते ते लक्षपुर्वक ऐकू लागल्या....

श्रावणी : मी फर्स्ट year ला असेल,तेव्हा कॉलेजच्या अगदीच पहिल्या दिवसापासून कुणीतरी माझा पिच्छा करत होतं....कधी माझ्या बाकावर गुलाबाचं फूल सापडे, तर कधी ग्रीटिंग.... ग्रीटिंग मध्ये कधी कधी ईतके सुंदर काव्य लिहिलेले असे, कधी चारोळ्या.... पण ती व्यक्ती काही माझ्यासमोर येत नसे.... मला फार उत्सुकता असे की ती व्यक्ती कोण असेल.... मी पण त्या व्यक्तीच्या शोधात होते....
अश्यातच माझी नजर विश्वासवर पडली.... त्याला बघताच मी जणू त्याच्यावर फिदा झाले.... दिसायला देखणा, एकदम रुबाबदार, आणि वर्गामध्ये एकदम हुशार.....

नेहा : 😳विश्वास म्हणजे तो गुंडा का??

श्रावणी : हो गं नेहा!! तेव्हा तो गुंड नव्हता गं 😒...

नेहा : अच्छा....

श्रावणी : तो विश्वास देखील माझ्याकडे टक लाऊन बघत असे... त्याचे मित्र देखील त्याला चिडवत होते....
आणि एक दिवस रक्ताने लिहिलेलं एक निनावी प्रेम पत्र मला आलं.... मी अस्वस्थ झाले... कोण असेल तो.... तश्यातच रोज डे ला मला रोज क्वीन केले, पण रोज क्वीन करणाऱ्याचे नाव समोर आले नाही....

त्या रोज क्वीन स्पर्धेच्या वेळेस पहिल्यांदा गीतेशने मला बघितलं....

गीतेशने नंतर मला मिळवण्यासाठी  खूप काही युक्त्या लढवल्या... मला जे सगळं निनावी येत होतं त्याचं क्रेडिट गीतेश सरांनी अगदी आयडियाने लाटलं....रक्ताच्या प्रेम पत्राने मी आधीच अस्वस्थ झाले होते... वाटलं ईतकं प्रेम आपल्यावर अजून कोण करणार??🤔

 हेच गीतेश ने बरोबर हेरले आणि मला प्रपोज केले....आयुष्यातलं पहिलं प्रपोजल आणि ईतकं प्रेम करणारी व्यक्ती मिळाल्यावर मला आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटले....मी काहीही विचार न करता लागलीच होकार दिला....

आणि तिथेच मी चुकले....माझं आणि गीतेश चं अफेअर मयुराला कळालं....तीने सुरुवातीला गीतेश ला आणि मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला....

विश्वासने देखील गीतेशला धमाकावण्याचा प्रयत्न केला.... पण झालं काय विश्वास माझ्या नजरेत गुंडा ठरला....

एक दिवस आम्ही पळून जाऊन मंदिरात लग्न केले.... आणि नंतर काही महिन्यांनी वेगळे घर घेऊन राहू लागलो..

माझ्या आईवडिलांना देखील हा खूप मोठा धक्का बसला.. त्यांनी तर आमच्यासाठी श्रावणी मेलीच असं ते वागत होते...

नंतर मयुराने गीतेश सोबत mutual घटस्फोट घेतला...पण ती ईतकी स्वाभिमानी होती की तीने पोटगी मागितलीच नाही....त्यामुळे गीतेशचे अजूनच फावले....  नंतर गीतेशने ईतकी हुशारी केली की आमचे लग्न रजिस्टर केलेच नाही....

नेहा : बापरे 😳... म्हणजे अगदी सोची समजी साजिश असल्यासारखं म्हणा की....

श्रावणी : हो.....

नेहा :अच्छा,तूम्ही म्हणालात की प्रेम पत्राचे क्रेडिट लाटलं.... मग तुम्हाला पत्र पाठवणारी व्यक्ती कळाली का??🤔 कोण होती ती??

क्रमश :
भाग 36 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या