नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
श्रावणी : हो तो दुसरा तिसरा कुणी नसून विश्वासच होता....
नेहा : विश्वास 😳....हे तुम्हाला कसं कळालं??....
श्रावणी :मी असंच दर्शनासाठी दगडूशेठ हलवाईच्या गणपती दर्शनाला गेले...तिथे योगायोगाने विश्वासचा खास मित्र विन्या भेटला.... विन्याने मला सगळं विश्वास बद्दल सांगितलं.... पण मी मूर्ख,मला त्याच्यावर विश्वासच बसला नाही.
माझ्यावर गीतेश चा ईतका प्रभाव होता.मी ते देखील गीतेशला सांगितलं......
गीतेश नी त्याचा बदला म्हणून विश्वास आणि विन्याला परीक्षेत फेल केले....त्याचा ईतका परिणाम विश्वास आणि विन्या वर झाला..... दोघांनीही नंतर कॉलेज मध्ये गुंडा गर्दी सुरु केली....
तूला सांगते नेहा!! विश्वास राजकारणी घराण्यातील असूनही त्याने तो तोरा आधी कधीच मिरवला नव्हता....
त्यावेळेस मला ही असं वाटलं की गीतेशने जे केलं ते योग्यच केलं....
नेहा : ओ... मग तुम्हाला खरं कधी कळालं....
श्रावणी : एकदिवस गीतेश कॉलेज मधून घरी आला, त्याला घरात मी दिसले नाही....मी आमच्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये होते आणि गीतेशला वाटले की मी घरातच नाहीये...त्याने बेडरूम मधूनच विश्वासला फोन लावला आणि फोन वर बरंच काही बोलायला लागला... त्याचे ते बोलणे ते छद्मी पणाने हसणे एक गीतेश चं वेगळं रूप माझ्यासमोर आलं....
ते ऐकून माझ्या तळपायाची जमीन सरकली... एकदम घेरी आल्या सारखं झालं.... पण मी स्वतःला कसं बसं सावरलं😒....
ईतकं होऊन देखील माझं मन काही मानायला तयार नव्हतं... पण मग मुद्दाम मी गीतेशला त्या पत्रांबद्दल विचारत असे.... गीतेश मात्र ते शिताफीने टाळत असे...
कारण त्याला एकाही पत्रातील मजकूर माहिती नव्हता.... त्या वेळेस ते सगळेच पत्र विश्वासने लिहिले याची खात्री पटली... आपल्याला या गीतेशने चांगलाच मूर्ख बनवला हे माझ्या लक्षात आले होते.....
खरं सांगते नेहा!!मला तेव्हा ईतका पश्चाताप झाला... आपण या माणसाच्या नादाला लागलो तर लागलो...पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विश्वासचं देखील आयुष्य उध्वस्त झालं....तो वाम मार्गाला लागला...
मला जर चान्स मिळाला तर मी नक्कीच त्याची माफी मागेल....
नेहा : पण पत्र वगैरे दुसरे कुणी लिहिले आहे असा तूम्हाला आधी बिलकुल संशय आला नाही का??
श्रावणी : कसं आहे ना नेहा!!जेव्हा आपण अश्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा विचार करतो ना तर आपल्याला त्याच्या चूका दिसतच नाहीत... दिसल्या जरी तरी आपल्याला त्या पटतच नाहीत... यालाच तर आपण प्रेमात आंधळे होणे म्हणतो ...
गीतिका :हूं... खरंच आहे...मग तूम्ही काय केलंत...
श्रावणी : काय करणार?? लग्नासारखा मूर्ख पणा केल्यावर... तसं गीतेश माझ्याशी खूप प्रेमळ वागायचा आणि माझे जमेल तसे लाड पुरवायचा.... वीकएंड पार्टी, फाईव्ह स्टार हॉटेल, रिसॉर्ट, कधी मूव्ही वगैरे सर्व... मग काय, मला वाटायचं जाऊदे हा आपले ईतके सगळे लाड पुरवतो... आपण मुलींना तरी एका नवऱ्याकडून काय अपेक्षा असते.... त्या सर्व अपेक्षांची पूर्तता करत होता....
नेहा :मग??🤔
श्रावणी : तश्यातच त्याचं शारदा बरोबर अफेयर सुरु झालं हे मला कळाले....मी गीतेश शी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला.... गीतेश ने ते झिडकारून लावलं.... मग मी शारदाला भेटून प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला... पण तीने मला वेडं ठरवलं... गीतेश ने तीला सांगितलं होतं की मला वेडाचे झटके येतात...मला शिझोफ्रेनिया नावाची बिमारी आहे.... मला वाटायचं देवाने मला ही शिक्षा दिली आहे ....मी मयुराला धोका दिला म्हणून.....
नेहा : बापरे 😳 कठीण आहे....
गीतिका : वाचले बाबा 🙄..,
श्रावणी : हो गीतिका!! तू वाचलीस कारण तुझ्याजवळ नेहा सारखी मैत्रीण आहे....
गीतिका :फक्त नेहा नाही मॅडम अनुया आणि सायली पण....
नेहा : मग पुढे 🤔?? तुमचा घटस्फोट...
श्रावणी :अगं कसला घटस्फोट?? जे लग्न कागदोपत्री रजिस्टरच नाही... त्याचा घटस्फोट तरी काय होणार... आणि असंच एक दिवस शारदा आणि गीतेश सर पळून गेले.... न घरका न घाटका अशी माझी परिस्थिती झाली.... माझं इंजिनियरिंग देखील सुटलं.... पण शेवटी आपले आईवडील आपल्यावर कितीही चिडले तरी आपलेच असतात ना.... त्यांनी मला घरात घेतलं.... आणि आता मी फॅशन डिझायनिंग complete केले आहे....
गीतिका : आतापर्यंत गीतेश सरांना अद्दल घडावी असं वाटत असताना माझी किती हिम्मत होईल ह्या बद्दल मी जरा साशंक होते... पण आता मात्र या माणसाला मी पुरती अद्दल घडवणार😡....
श्रावणी : हो पण आता तूम्ही काय करणार??
नेहा : मला exact नाही सांगता येणार पण तूम्ही मला हेच inshort लेखी स्वरूपात द्याल का?? त्यावर तूमची सही व्हावी...
श्रावणी :अच्छा, नेमकं तूझ्या डोक्यात काय चाललं आहे??
नेहा : म्हणजे तुम्हाला चालतं का ते बघा... नसेल चालत तर तसं सांगा.... हे जे तूम्ही लेखी स्वरूपात एका कागदावर द्याल तसंच same आम्ही शारदा मॅम आणि रुपाली मॅम कडनं घेऊ.... Viral करू, त्याचे पॉम्पलेट तयार करून वाटू जे जमेल ते करून नवीन बॅचेस मध्ये जागृती करू... पुरावा असल्यामुळे एकतर त्यांना कॉलेज सोडावे लागेल किंवा अजून कुणी त्यांच्यामध्ये फसणार नाही....
पण तेच तुम्हाला तुमचे हे लिखाण viral झालेले चालेल का?? कारण सध्या तरी मला हेच योग्य वाटत आहे... त्या माणसाचं पितळ खऱ्या अर्थाने उघडं पडावं असं तुम्हाला देखील वाटत असेल ना...
.
श्रावणी :नेहा!!हुशार आहेस गं तू, मला काही बोलायलाच शिल्लक ठेवलं नाहीये.... थांब मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते... तूम्ही कॉफी घ्या तोवर मी हे लिहिते...
श्रावणी कॉफी बनवायला गेली...
गीतिका : खरंच नेहा!!थँक्स.... आज जर तूम्ही सगळ्या माझ्यासोबत नसता तर माझे हाल देखील श्रावणी मॅम सारखे झाले असते 🥺...
नेहा : अरे असं कसं... आम्ही कसं होऊ दिलं असतं.... म्हणून तर आपण सगळ्यापेक्षा वेगळे आहोत... एक दोन तीन चार....😜
श्रावणीने कॉफी नेहा आणि गीतिकाला दिली...
आणि तीने कागदावर महत्वाचे मुद्दे लिहिले आणि त्यावर खाली सही केली...
श्रावणी :नेहा!!एकदा चेक कर बरं....
परफेक्ट,असं म्हणून नेहाने तो कागद घेऊन स्वतःच्या पर्स मध्ये ठेवला....
नेहा : श्रावणी मॅम... ह्याचे updates मी तूम्हाला वेळोवेळी देत जाईल....
श्रावणी : हो नक्की, मलाही बघायला आवडेल गीतेशला अद्दल घडताना...
क्रमश :
भाग 37 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या