आमच्यासारखे आम्हीच (भाग 37)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................


नेहा  : ठिक आहे मॅम!!आता निघतो आम्ही..... तुम्हाला सगळं वेळोवेळी कळवत राहू...

श्रावणी: बरं वाटलं तुम्हाला भेटून.. गीतेश बद्दल जो राग माझ्या मनात तो आता पर्यंत फक्त मनातल्या मनातच धूमसत होता.... तुमच्या मुळे तो आता शांत होणार....पण 
गीतिका!!तू काळजी घे....

गीतिका :हो मॅम!!आता त्याच्या जाळ्यात मी अडकणार नाही.

श्रावणी :गूड

नेहा, गीतिका :बाय मॅम...

गीतिका : नेहा!!तूझी आयडिया भारी आहे गं..कसं काय तूला असल्या आयडिया सुचतात गं....

नेहा : आयडिया छान आहे पण जसं आपल्याला श्रावणी मॅम भेटल्या तसंच शारदा आणि रुपाली मॅम पण तर भेटायला हव्यात ना.....

लागलीच दोघींनी ऑटो केला आणि काही गरजेपुरती ब्रेड, जाम,अंडी, मॅगी अशी खरेदी करून हॉस्टेलला गेल्या....

अनुया आणि सायली वाटच बघत होत्या..... नेहा आणि गीतिकाने देखील उशीर न करता श्रावणीची स्टोरी त्यांना सांगितली.....

अनुया : वा तूम्ही तर नंबर एक काम केलं आहे.... पहिल्या भेटीत ईतकं पर्सनल सांगणं.... मला तर वाटलं होतं की आज ती तुम्हाला बाहेरच्या बाहेरूनच हाकलून देईल....

गीतिका :अशी कशी हाकलून देईल ते ही नेहा सारखी हरहुन्नरी मुलगी माझ्यासोबत असताना....

नेहा :चढले बरं का?? हरभऱ्याच्या झाडावर🙄...

सायली : नाही गं नेहा खरंच... एकतर तुझ्यामध्ये डेरिंग खूप आहे... आणि ती तू योग्य ठिकाणीच वापरते....

अधून मधून अनुयाचे मेसेंजर वर बघणे चालू होते... एक मेसेज आला नी अनुयाचा चेहरा रडवेला झाला 🥺...

नेहा :काय झालं गं अनुया??🤔

अनुया : हा प्रज्वल बघ ना तीन दिवसांसाठी गावाला जात आहे... त्याच्या मामे भावाचे लग्न आहे....

नेहा : मग, ही तर आनंदाची बातमी आहे की.... तू का उदास झाली...

अनुया : अगं तो आता तीन दिवस भेटणार नाही ना 😒

नेहा :हत्तीच्या इतकंच ना.... तूम्ही पण ना लागलीच किती पजेसिव्ह होता गं....

अनुया : नाही गं मी त्याला काहीच नाही म्हणाले.... फक्त तुम्हाला सांगत आहे....

गीतिका रिप्लाय देत नाही बघून गीतेश सरांनी डायरेक्ट गीतिकाला फोन लावला....

गीतिका : 😳नेहा!!गीतेश सरांचा फोन📳 आहे....ह्यांना कळालं तर नाही ना आपण श्रावणी मॅम कडे गेलो होतो म्हणून.....

नेहा : मला नाही वाटत....फोन रेकॉर्ड कर... फक्त तू काही असं तसं बोलू नकोस... ऐकून तर घे काय म्हणत आहेत ते.....

गीतेश सर   : हॅलो गीतिका!!

गीतिका : हॅलो सर!!

गीतेश सर  : काय झालं?? आजकाल तू काहीच रिप्लाय देत नाहीस??🤔

गीतिका : तसं काहीच नाही सर... मध्ये या टेस्ट्स चे टेन्शन होते ना...

गीतेश सर : अगं मग मला सांगायचं की... मी तूला प्रत्येक पेपरच्या आधल्या दिवशी टेस्ट पेपरच पाठवले असते की...

गीतिका : नाही सर मला कॉपी करणं बिलकुल आवडत नाही....

गीतेश सर : गूड, अगं मलाही आवडत नाही... मी तूझी फक्त परीक्षा घेत होतो....बरं आता मला कधी भेटणार?? मी आतुरतेने वाट पाहत आहे.... गीतिका!!मी तूझ्या प्रेमात पार बुडालो आहे गं....

गीतिका आता मात्र शांत झाली.....

गीतेश सर : का शांत झालीस गीतिका??

गीतिका तरीही शांतच....

गीतेश सर : कुणी आलं आहे का तिथे??

गीतिका : हं....

गीतेश सर : ठीक आहे,ठिक आहे मी फोन ठेवतो पण तू मेसेज ला रिप्लाय करत जा... बाय सी यू...

गीतिका : बाय 🙄...

आता तुमच्या गोड बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही समजलं ना?? गीतिकाने रागातच😡 फोन बंद केला....

नेहा : गीतिका!!हा राग तू नंतर गीतेश सरांवर काढण्यासाठी जपून ठेव.... असा फोन बिनवर काढायचा नाही....

गीतिका : नेहा तू पण ना.....

ईकडे विश्वासला निवडणूक हारल्यापासून चैन नव्हती...तो सतत calculations करत होता...

विश्वास : विन्या!!आपल्या हातातली सत्ता गेलीच कशी....
हे लोकं ऐनवेळी मला हद्दपार करतात आणि असा काहीतरी गोंधळ होतो.....

विन्या : फ्रेशर्स पार्टीच्या दिवशी आम्ही जे शीतपेयात औषध मिळवलं.... त्याचा फोटो कुणी तरी काढला.... आणि मग विजयी असून देखील पूर्ण पॅनलच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून दिला....

विश्वास : कुणी काढला फोटो?? कुणाची ईतकी हिम्मत या विश्वासच्या विरोधात जाण्याची......

विन्या : तेच तर शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे पण मला तो फोटो काढणारा कोण आहे याचा थांग पत्ताच लागत नाही....

तितक्यात विकी तिथे आला.....

विश्वास : काय रे विकी!!कुणी काढला फोटो....नक्कीच तुमच्या वर्गातील असणार... कारण बाकी लोकं मला ओळखतात..... त्यांच्या पैकी कुणीच हिम्मत करणार नाही....

विकी : हो विश्वास सर!!तूम्ही बरोबर बोललात....कालच मी प्रज्वल आणि रोहनला बोलताना ऐकलंय...

विश्वास :कोण तो चिपळ्या... रोहन का??

विकी : नाही नाही तो नाही... हा फोटो त्या नेहा ने काढलेला आहे.....जी श्वास पॅनल मधून girls representative उभी होती ना तीच... तीने सगळेच फोटो काढले आहेत....

विश्वास :कोण ती चिमणी??🙄

विकी : चिमणी 😂😂??

विश्वास : हो चिमणीच तर दिसते ती....येऊ दे तीला कॉलेज मध्ये बघतोच मी तीची 😡😡आता.....

विकी :😳 तूम्ही काय करणार आहेत सर??

विश्वास : मी  🤔,😁😁😁 देखते रह जाओगे....😇  

विश्वास खूप नेहा वर खूप चिडला 😡होता.... रागाने लालबूंद 😡झाला होता....एक तर सहजा सहजी विश्वास कुणावर चिडत😡 नसे पण चिडला😡 की मग त्याला त्या रागावर बिलकुलच नियंत्रण ठेवता येत नसे.... त्याच्या रागाला पूर्ण कॉलेजच काय तर त्याचे जवळचे सहकारी मित्र देखील घाबरत असे....

विन्याने विश्वासला चिडलेलं बघितलं.... त्याला वाटले  आता आपलं काहीच खरं नाही... ईथुन काढता पाय घ्यावा असा विचार करत विन्या तिथून दूर जायला लागला...

विश्वास :ए विन्या तू कुठं चालला...

विन्या :नाही भाऊ ते असंच....

विश्वास :अरे थांब थांब, तुझं काम पडणार आहे मला...

विन्या शांतपणे थांबला.....

नेहमीप्रमाणे या चौघी कॉलेज मध्ये आल्या.... नाश्ता करण्यासाठी म्हणून कॅन्टीन मध्ये गेल्या....

कॅन्टीन विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेली होती....

या चौघीनी देखील एक कोपऱ्यातील रिकामा टेबल बघितला आणि त्या तिथे जाऊन बसल्या....

एकदम काय झालं कुणाला कळायच्या आत कॅन्टीन मधले बाकीचे विद्यार्थी धडाधड कॅन्टीन बाहेर पडले....

या चौघीही ते वातावरण पाहून गोंधळून गेल्या.... तितक्यात विश्वास ने कॅन्टीन मध्ये एन्ट्री केली.... सोबत विन्या आणि त्याची गँग होती.....

कोण आहे रे ती नेहा!! जिला कॉलेज मध्ये आल्या आल्या जरा जास्तच माज चढला आहे ... विश्वास एकदम भारदस्त आवाजात तिथे मोठ मोठ्याने बोलू लागला.... नेहा चे नाव ऐकताच या चौघींचे धाबे दणाणले.....हा विश्वास आपल्यासाठी ईथे आला आहे हे त्यांच्या लक्षात आले...

ए तुम्ही तिघी चला निघा ईथुन बघितलं नाही का... मला येताना बघून सगळी कॅन्टीन रीकामी झाली आहे....
तिघी ही घाबरत घाबरत कॅन्टीन बाहेर पडल्या.....

आता तुम्हाला काही वेगळं सांगावं लागणार आहे का? कॅन्टीनच्या मालकाकडे बघून विश्वास म्हणाला.....

क्रमश :
भाग 38 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या