नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
कॅन्टीन मालक घाबरतच कॅन्टीनच्या बाहेर पडला....
काहीतरी विपरीत घडणार असा त्याला अंदाज आला... कॅन्टीन मालकाने लागलीच कॉलेजच्या प्रिन्सिपॉल केबिन कडे धाव घेतली.....
अनुयाने लागलीच प्रज्वलला फोन 📳लावला....पण हे काय??प्रज्वल तर फोन उचलतच नव्हता...
सायली आणि गीतिका तर घाबरून रडायला लागल्या..
अनुया :सायली!!दुबे सर.... चल आपण दुबे सरांना शोधू....
सगळेच विद्यार्थी कॅन्टीन बाहेर जमा झालेले होते... पन कुणीही ती कॅन्टीनच दार बाहेरून उघडण्यासाठी धजत नव्हतं....
विश्वास चे मित्र कॅन्टीनच्या दरवाजावर पहारा देत होते....
आणि अचानक 😳विश्वासने कॅन्टीनचा दरवाजा आतून उघडला आणि ताड ताड करत तिथून निघून गेला....
विन्या आणि त्याची गँग विश्वासच्या मागे पळाली....
कॅन्टीन बाहेर उभे असलेले सगळेच जण एकदम गोंधळून गेले....
सगळेच जण नेहाला बघण्यासाठी कॅन्टीन मध्ये धावले....
अनुया, सायली आणि गीतिका देखील पळत पळत नेहा कडे धावले....
नेहा दरवाजाकडे बघत स्तब्ध उभी होती.....
अनुया : नेहा!! कशी आहेस....
नेहा : dont worry, i am fine..... अनुया!!सायली!!आणि गीतिका!!चला आपलं लेक्चर आहे ना 😊
सायली :पण नेहा!!
नेहा : हे बघा तूम्ही काळजी करू नका.... मला काहीच झाले नाही....
तितक्यात प्रिन्सिपॉल कॅन्टीन मालकासोबत कॅन्टीन मध्ये धावत आले....
प्रिन्सिपॉल : काय झाले होते?? मला तर कॅन्टीन सुरळीत दिसत आहे...
सर!!तो गुंड विश्वास आताच ईथे होता... या मुलीला त्रास देत होता... नेहा कडे बोट दाखवून कॅन्टीन मालक म्हणाला....
प्रिन्सिपॉल सरांनी नेहा ला विश्वास बद्दल विचारलं....
नेहा : सर!! नाही मला विश्वास ने बिलकुल त्रास दिला नाही....
कॅन्टीन मालक :सर ही नक्की खोटं बोलत आहे
नेहा :नाही सर खरंच मला विश्वासने बिलकुल त्रास दिला नाही.... तसं हे कॅन्टीन मालकही काहीच चुकीचं बोलले नाही....विश्वासचा काही तरी गैरसमज झाला आणि तो चिडला होता... अचानक त्याला एक फोन आला आणि तो तिथून तडक निघून गेला.....कदाचीत त्या फोनवर त्याचा गैरसमज दूर झाला असावा....
प्रिन्सिपॉल : अच्छा, ठिक आहे....बेटा, नेहा!!तू माझा नंबर save कर... आणीबाणीच्या वेळेस तूला कामाला येईल.... चला काळजी घ्या... मी जरा ऑफिस मध्ये जाऊन बसतो....
अनुया :ए नेहा!!खरंच तसं झालं का... सांग ना...
नेहा :आता इथून चला मी हॉस्टेल वर गेल्यावर सांगते....
तिघीना नेहा काय बोलेल याची उत्सुकता लागली होती...
बस कर नेहा!! आता अजून ताणू नकोस.... रूमवर गेल्या गेल्या अनुया म्हणाली...
नेहा :तर मग ऐका.... विश्वास चा पवित्रा बघून मी खूप घाबरले होते.... तो भयंकर रागात होता 😡... विश्वास माझ्याशी कसा वागेल काय करेल कोणत्या थराला जाईल याचा देखील अंदाज नव्हता.....मी तर नुसती थरथर कापत होते.....त्याने मला फ्रेशर्स पार्टीच्या दिवशी काढलेला फोटो दाखवून हा फोटो तू काढला आहेस का असं विचारलं...
मी "हो "म्हणाले.... मग त्याने बोगस वोटिंग वाले फोटो दाखवत पुन्हा तोच प्रश्न केला....
मी परत" हो" म्हणाले...... तूझी हिम्मत कशी झाली गं हे फोटो काढण्याची त्याने रागात😡 येऊन मला प्रश्न विचारला.... मी म्हणाले मला वाटलं कि काहीतरी विपरीत घडत आहे म्हणून मी हे फोटो काढले.....
विपरीत,??विपरीत काय असतं ना मी तूला आता दाखवतो.... असं म्हणत तो माझ्या जवळ आला....
आणि तो मला हात लावणार ईतक्यात मला श्रावणी मॅम आठवल्या....
मी लागलीच विश्वासला म्हणाले मला हात लाऊ नका तुम्हाला श्रावणी मॅम ची शपथ आहे....
झालं.😊.. एकदम जादूची कांडी फिरावी तसा विश्वास शांत झाला... आणि ताड ताड ताड करत विश्वास निघून गेला....
गीतिका :ग्रेट, तूला ऐनवेळी बरं हे सुचलं
नेहा : हो ना.... मला वाटलंच नव्हतं की हा विश्वास अजूनही श्रावणी मॅमच्या प्रेमात असेल....
गीतिका :नेहा!!तूला आठवतं... श्रावणी मॅम आपल्याला काय म्हणाल्या होत्या??
नेहा :हो चान्स मिळाला तर विश्वासची मी नक्कीच माफी मागेल.....
सायली :एकंदर या श्रावणी मॅम मुळे एक मोठा घात होता होता तू वाचलीस नेहा!!पण तू जरा सावध रहात जा बाई... तूला कशाचीच भीती वाटत नाही.....
नेहा :पण खरं सांगू का?? मी आज खूप घाबरले होते.... कसला आडदांड आहे तो विश्वास ... आणि राग तर बापरे बाप....
तितक्यात नेहाचा फोन📳 वाजला....
अननोन नंबर वरून फोन 📳🤔 मला कोण करणार?? विचार करतच नेहाने फोन 📳उचलला....
हॅलो मी विश्वास बोलतोय
😳 विश्वास... हं बोला ना विश्वास सर... नेहा पुन्हा घाबरली...
विश्वास : तू श्रावणीला कशी ओळखतेस??
नेहा : सर माझी आणि श्रावणी मॅमची कालच भेट झाली...त्यांनी कालच तुमच्या बद्दल मला संगितले...
विश्वास : काय 🤔सांगितले?? मी गुंडा 😏आहे म्हणून
नेहा :नाही नाही विश्वास सर त्यांना तर त्यांची चूक समजली आहे... त्या म्हणाल्या की चान्स मिळाला तर मी नक्कीच विश्वास ची माफी मागेल....
विश्वास :नेहा!!मी तूला उद्या दुपारी 4 वाजता कॅन्टीन मध्ये भेटतो... घाबरू नकोस मी तूला काही आज सारखं भेटणार नाही....आणि दुपारी 4 वाजता कॅन्टीन मध्ये गर्दी नसते... जरा व्यवस्थित बोलता येईल....
नेहा : ठिक आहे...
क्रमश :
भाग 39 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या