आमच्यासारखे आम्हीच (भाग 39)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

नेहा :अनुया!!सायली आणि गीतिका आज तूम्ही पण माझ्यासोबत कॅन्टीन मध्ये थांबा...मला थोडं धाकधूक होत आहे.

अनुया : अगं नेहा!! पण विश्वासला आम्ही चालणार नाही ना...

नेहा : तसं नाही गं... पण मी एकटीच कॅन्टीन मध्ये कशी बसू. विश्वास आल्यावर जर तुम्हाला काही ऑड किंवा uncomfortable वाटलं तर तूम्ही हॉस्टेलला निघून जा.मग तर झालं.

अनुया : बरं बरं ठिक आहे.

बरोबर चार वाजता चौघी जणी कॅन्टीन मध्ये जाऊन बसल्या. चौघीनाही विश्वासची एक अनामिक भीती वाटत होती.

कॅन्टीन मध्ये दोन तीन विद्यार्थी बसलेले होते. तितक्यात ते अचानक उठायला लागले. विश्वासचे आगमन झाल्याची चाहूल सर्वांनाच लागली..

अरे बसा बसा तुमचं चालू द्या. विश्वासने त्या मुलांकडे हात दाखवला आणि या चौघी कडे आला.

कॅन्टीन मालक विश्वासला बघून पुन्हा परेशान झाला...

अरे छोटू!!तेरे काका को बोल, डरनेकी कोई जरुरत नही है |मै खाली बैठने के लिए यहा आया हूं.. हॉटेल मालकाला ऐकू जाईल अश्या आवाजात विश्वास म्हणाला 

 नेहा!! आपण तिकडे बसू..कॅन्टीन मधल्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवत विश्वास म्हणाला..

 कॅन्टीन वाल्याला सर्वांसाठी वडा पाव ची ऑर्डर दिली आणि कोल्ड ड्रिंक्स सांगितले आणि हॉटेल मालकाला विश्वास म्हणाला बिल मेरे खाते मे लिख देना 

नेहा आणि विश्वास दुसरीकडे बसले...

अनुया :आज विश्वासचं एक वेगळंच रूप दिसत आहे.. नाही का??

सायली :हो आणि चक्क वडापाव आणि कोल्डड्रिंक्स तेही आपल्यासाठी🙄..

विश्वास : नेहा!! आता मला सगळं काही व्यवस्थित सांग. तू कसंकाय श्रावणी ला भेटलीस??कशी आहे ती??  काल तू मला एकदम तीची शपथ दिलीस... तूला नेमकं काय माहिती?

नेहा : विश्वास सर!! नेमकं कुठून सुरु करू.🤔श्रावणी मॅम छान आहेत आता त्यांनी फॅशन डिझायनिंग केलं आहे..

विश्वास 'फॅशन डिझाईनिंग 🤔??

नेहा : हो, आणि मला श्रावणी मॅम नी सगळं सांगितलं गीतेश सरांनी त्यांना कसं फसवलं आणि तुम्हाला काय काय त्रास दिला हे सर्व सांगितलं.

विश्वास : हं, तो गीतेश पण खूप नालायक आहे...

नेहा : विश्वास सर!! तूम्ही रागावणार नसणार तर एक विचारू??

विश्वास : हो विचार की?

नेहा : श्रावणी मॅम मला म्हणाल्या की तूम्ही सुरुवातीला खूप सिन्सियर होते. मग ही गुंडगिरी?🤔

विश्वास : तूला नाही समजायचं ते...

नेहा: सांगून तर बघा.. कदाचीत समजेल...

विश्वास : हं.. मी खूप सिन्सियर होतो, वर्गात टॉपर ही होतो.
पण त्या गीतेश नं मला फेल केलं. त्या मुळे माझं खूप नुकसान झालं. श्रावणीशी खोटं बोलून तीला पटवलं... माझं सगळं क्रेडिट त्यांनी लाटलं. मी सगळीकडून उध्वस्त झाल्यासारखा झाला होतो...

नेहा :पण सर!!मग आमच्या फ्रेशर्स पार्टीच्या दिवशी हे कोल्डड्रिंक्स मध्ये नशिली औषधं मिसळणं. त्यात आमचा काय दोष होता.

दोष तुमचा असा नाही, मला एक विघ्न संतोशी आनंद मिळत असे.मी फेल झाल्यावर माझ्या वर्गमित्रांनी देखील भरपूर रंग दाखवले, मला खूप हीनावलं त्यातल्या त्यात माझ्यावर जाळणाऱ्यांची तर चांदीच झाली होती.तेव्हा मला लक्षात आलं कुणीच कुणाचं नसतं. हे बोलताना विश्वास थोडा भावनीक झाला.

नेहा : हूं.. तुम्हाला हे सगळे अनुभव आले याचं मुख्य कारण तर गीतेश सर आहे ना.. तुम्हाला असं नाही वाटलं का की तूम्ही त्यांना धडा शिकवावा म्हणून??

विश्वास : नेहा!!तूला वाटतं का की मी त्यांच्या बाबतीत शांत बसलो असेल.पण काय करणार पार मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांची पोच होती. आणि त्यांनी माझं विश्वच माझ्यापासून  हिरावून घेतल्यासारखं झालं होतं.त्या वेळी मी हातपायच गाळून बसलो होतो.

नेहा : सर!! पण आता तूम्ही स्ट्रॉंग झाले आहात ना.जर आपण मिळून गीतेश सरांना अद्दल घडवली तर..

विश्वास : हे, तू कश्याला असल्या भानगडीत पडतेस. माझं, विन्याचं जे नुकसान झालं तेच खूप आहे. नको नको तू त्यांच्या नादाला लागू नकोस.

नेहा : असं कसं नादाला नको लागू. तो माणूस आणखीन किती लोकांच्या आयुष्याशी खेळणार आहे?

विश्वास : म्हणजे??🤔

नेहाने अगदी थोडक्यात गीतिका बद्दल विश्वासला सांगितले आणि तिच्यासाठी जेव्हा श्रावणी मॅम ला आम्ही भेटलो तेव्हा आम्हाला तुमच्या बद्दल कळाले.आम्ही तर गीतेश सरांना अद्दल घडवणार आहोतच पण तूमची साथ मिळाली तर आम्हाला ते अजूनच सोपं होईल. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है |बरोबर ना....

विश्वास : दोस्त नही, भाई होता है 😊 नेहा तू मला सर नाही दादा म्हटलं तरी चालेल. पण मी मात्र तुझं नाव ऑलरेडी ठेवलंय..

नेहा :🤔काय??

विश्वास :😂😂 चिमणी....

नेहा :काय रे दादा तू पण??

विश्वास : अगं "चिमणी "सारखी बारीकच आहेस की तू. बघ ना त्या चिमणीच्या घासाने वडापाव खात आहेस..

गंभीर वातावरण बदलून एकदम खेळीमेळीचे वातावरण तयार झाले.

नेहा : बरं ऐक ना विश्वास दादा!!खूप उशीर झाला आहे मला आता निघावं लागेल पण आमच्या आता मिशन गीतेश मध्ये तूला सहभागी व्हावच लागेल.

विश्वास : मिशन गीतेश 🤔ग्रेट, तूझा पुढचा प्लॅन काय आहे??

नेहा : मला शारदा आणि रुपालीला भेटायचं आहे.

विश्वास : हे बघ शारदा सध्या भारतातच नाहीये पण मी तिचा कॉन्टॅक्ट मिळवेल आणि रुपालीला आपण उद्या भेटू.

नेहा : चल मी निघते आता माझ्या मुळे सगळ्या जणी ताटकाळत बसल्या आहेत.

विश्वास :ok चल बाय...

नेहा :बाय...

अनुया :यांचं तर मस्त हसणं आणि बोलणं चालू आहे

सायली : हो खरंच की, नेहा आहे ती,सगळ्यांना कशी लाईनवर आणते बघ...

गीतिका : खरंच ना.. माझ्यासाठी म्हणून ती काय काय करत आहे ना.आठवतं का आपण चुकून रेड लाईट एरियात गेलो होतो तेव्हा त्या बायकांना देखील समजून घेण्याची नेहाची तयारी होती. कळत नकळत का होईना नेहा बरोबर सोशल वर्क करते.आज मला तिच्या या अश्या वागण्याचे महत्व कळते.

अनुया :खरंच आपण नशीबवान आहोत की आपली नेहा बेस्ट फ्रेंड आहे.

तितक्यात नेहा देखील त्यांना जॉईन झाली.. एखादा गड जिंकल्यासारखा तिचा चेहरा 😊झाला होता.तिच्याकडे पाहताच ती काही तरी आनंदाची बातमी देणार असे लक्षात येत होते.

 कॉलेज मधल्या मुख्य गुंडापासूनच आपल्याला आता धोका नाही आणि मिशन गीतेश मध्ये काल श्रावणी आणि आता विश्वास ऍड झाले हे कळाल्याने चौघीनी हॉस्टेल वर खूप धमाल केली.

क्रमश :
भाग 40 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या