आमच्यासारखे आम्हीच (भाग 40)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

जरा हळू मस्ती करा गं आमची उद्या परीक्षा आहे. दिव्याने या चौघीना त्यांच्या रूम मध्ये येऊन सांगितलं.

अनुया : ok ok झालं आमचं...आम्ही जरा शांतच राहतो. 
दिव्या दी!! चहा करून हवा असेल तर सांग बरं का? तसंही मी जरा जागणार आहे.

दिव्या : हो का?? पण अनुया!!उद्या प्रज्वल ची पण परीक्षा आहे बरं का.. तू जागणार आहेस म्हणून सांगितलं 😉

अनुया : 😳दिव्या दी!!

दिव्या :काय झालं?? आम्हाला माहिती आहे सगळं 😇😇
कालच मला प्राचीनी सांगितलं 😊..

अनुया : हो 🥰का??

दिव्या : बरं चला,नंतर बोलू. नाहीतर मी ईथे गप्पाच मारत बसेन.

अनुया :Ok बाय दी..

अनुया : ईतक्या लवकर प्रज्वल आणि माझ्याबद्दल यांना कळालं. ही प्राची आतापर्यंत माझ्याशी कधी नीट बोलली नाही पण हिनेच सगळ्यांना सांगितलं....असं का?

नेहा : हो मी प्राचीला observe केलं आहे. ती तूला कशी एकटक बघायची, असं वाटायचं की ती तुझ्यावर चिडत😡 आहे .मला तर असं वाटतं ना कदाचित प्रज्वल तीला आवडत असावा.

अनुया : तूला तसं वाटलं ना... मला अगदीच कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तसं वाटत आहे. पण प्रज्वल तीला कधीच जुमानत नाही म्हणून मला कधीच insecure फील झालं नाही..

नेहा : आणि माझ्यापासून 😉 माझ्यापासून insecure कधीच नव्हतं वाटलं का 🤔

अनुया : काय गं नेहा!!पण खरं सांगू का?? थोडं insecure वाटलं, पण मला तरी कुठे माहिती होतं प्रज्वलच्या मनात मी आहे म्हणून....मला वाटायचं की कदाचित प्रज्वलला तू आवडत असावी.

नेहा : हं...मी बरी मला तूझ्याबद्दल अगदीच अकरावी पासून माहिती असताना त्याच्या नादी लागले असते. शक्य तरी होतं का ते..

विश्वास,नेहा आणि गीतिका सोबतच रुपालीला भेटायला गेले.

रुपाली :विश्वास!! बऱ्याच दिवसांनी आज तू गीतेश चा विषय काढला आहेस. मला तर त्या माणसाचं तोंड देखील बघायचं नाही.

विश्वास : ह्या आपल्या कॉलेज मधल्या फ्रेशर्स नेहा आणि गीतिका.. काय म्हणत आहेत बघ.

नेहाने रुपालीला मिशन गीतेश सरांबद्दल सांगितलं. सोबत श्रावणीने दिलेला पुरावा दाखवल्यामुळे नेहाचे काम अजूनच सोपे झाले. विश्वास सोबत आधीची ओळख असल्यामुळे आणि श्रावणीच्या पुराव्यामुळे रुपालीने लागलीच एका कागदावर काही लिहून सही करून नेहा ला दिला.

नेहा!!हे घे तूझ्या मिशन गीतेशचा एक भाग व्हायला मला देखील व्हायला आवडेल कागद देताना रुपाली म्हणाली.

गीतिका : थँक्स अ लॉट रुपाली मॅम!!आता गीतेश सरांना चांगलीच अद्दल घडणार याची गॅरेंटी वाटत आहे.

रुपाली : उलट मीच तुम्हाला थँक्स म्हणत आहे. त्या गीतेशला अद्दल घडावी म्हणून मला खूप वाटत होतं पण माझ्यामध्ये तितकी हिम्मत नव्हती ना. खरंच तूम्ही एवढ्या छोटया असून हिमतीचे काम करत आहे. मानलं तूम्हाला.

नेहा : थँक्स.

विश्वास : ए चिमणे!! शारदाचा ई-मेल id मिळाला आहे आणि  फोन नंबर सुद्धा आपण शारदाला व्हाट्सअँप कॉल करू पण आता तिथे रात्र असेल..

नेहा : आपण व्हाट्सअँप वर मेसेज टाकून बघू...रिप्लाय आला की whatsapp calling ची वेळ मागून घेऊ... विश्वास दादा!! त्या वेळेस तू सोबत हवा आहेस..

व्हाट्सअँप वर मेसेज टाकल्या टाकल्या शारदाचा रिप्लाय आला. लागलीच विश्वासने शारदाला व्हाट्सअँप कॉल केला.
विश्वासने आधी मिशन गीतेश बद्दल शारदाला सांगितलं आणि नंतर रुपाली आणि श्रावणीचे पुरावे दाखवले.

रुपालीने धोक्याने गीतेश सोबत लग्न केल्यामुळे शारदाची माफी मागितली. दोघींच्याही मनात असलेला कडवट पणा दूर झाला.
आणि शारदाने देखील एका कागदावर गीतेशबद्दल लिहून सही केली आणि तो कागद स्कॅन करून तीने लागलीच नेहाला पाठवला.

शारदा : चला सातासमुद्रा पलीकडून मी देखील मिशन गीतेशचा एक भाग होत आहे मला ह्याचा खूप आनंद होत आहे. थँक्स गं पोरींनो..

नेहा : तूम्ही सगळे मदत करत आहात म्हणून मिशन गीतेश यशस्वी होणार आहे.

शारदा : चला मला ऑफलाईन जावे लागेल,आपल्या  मिशनच्या update द्या बरं का. बाय बाय.

रुपाली :विश्वास!!आता तूम्ही काय करणार आहात..

नेहा : तुमचे तिघांचेही लेखी पुरावे एकत्र करणार आणि ते कॉलेजमध्ये  viral करणार. तिघांच्याही सह्या आहेत ना.तर गीतेश सर कसे आहेत हे सगळ्यांना पुराव्याणीशी माहिती होईल.

रुपाली :तिघींचे पुरावे🤔 का तुम्हाला मयुराचा पुरावा मिळाला नाही का??

नेहा : नाही, कॉलेज मध्ये असलेल्या adress मुळे आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचू शकलो.

रुपाली : अच्छा, मग अजून एक दिवस थांबा मी मयुरा कडून देखील एक लेखी पुरावा तुम्हाला देते. तीला तर बिचारीला डोमेस्टिक व्हॉइलन्स देखील सहन करावा लागला होता.

नेहा : मग तर खूपच छान. ईतका मोठा पुरावा मिळणार असेल तर आम्हाला एक दिवस थांबायला काहीच हरकत नाही.

रुपाली : विश्वास!! उद्या संध्याकाळी बरोबर याच वेळेस ये. मी तूला पुरावा देते..

नेहा : "मयुरा" मॅम काय पुण्यातच राहतात का?

रुपाली : नाही, दादरला राहतात.पण मी तूला any how त्यांचा लेखी पुरावा तुम्हाला मिळवून देते.

गीतिका : पून्हा एकदा थँक्स.. नेहा!!आपल्याला निघावं लागेल नाहीतर हॉस्टेल मध्ये एंट्री मिळणार नाही.

नेहा : हो रुपाली मॅम!! येतो आम्ही.. विश्वास दादा तू कसं करणार आहेस.

विश्वास : चला, मी पण तुमच्यासोबत येतो....

गावावरून आल्यावर नेहा आणि विश्वास बद्दल कॉलेज मध्ये ब्रेकिंग news च्या स्वरूपात तयार झालेल्या बातम्या  प्रज्वलच्या कानावर पडल्या.

विश्वास आणि नेहा असं कसं शक्य आहे.छे मला तर ही अफवाच वाटत आहे. जाऊदे आता सध्या परीक्षेकडे concentrate करू. एकदा परीक्षा झाली की अनुयालाच विचारू... लायब्ररीमधून विचार करत करतच प्रज्वल जात होता.. तितक्यात त्याला समोरून नेहा गीतिका आणि विश्वास दिसले.

😳विश्वास खरोखरच यांच्यासोबत आहे.. मी जरा यांना दिसणार नाही असा उभा राहतो. बघतो यांचं काय बोलणं होतं ते.

विश्वास : नेहा!! आता तूम्ही ईथुन हॉस्टेलला सुरक्षित जाऊ शकता. ते काय आहे ना मी तिकडे येणं योग्य नाही.

नेहा : ठिक आहे चालेल, बाय गूड नाईट..

विश्वास :गूड नाईट...

बापरे 😳 या दोन तीन दिवसात ईतका बदल??🤔 अगदी बाय गुडनाईट पर्यंत येऊन ठेपलं.. माझी परीक्षा आहे नाहीतर मीच नेहाला जाब विचारलं असतं.😡..

मयुराचा पुरावा देखील आता विश्वासच्या हाती लागला.
नेहाने चारही पुरावे एकत्रकेले आणि आता हे एकत्र स्कॅन करून सोशल मीडियावर viral करायचे आहे 

विश्वास : नेहा थांब. हे चारही एकत्र मी स्कॅन करतो आणि माझ्याकडून सोशल मीडिया वर viral करतो. म्हणजे जर गीतेश सरांनी viral कुठून झालं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्या फोनचा आय पी ऍड्रेस जाईल. तूला काहीच अडचण येणार नाही.

आज हे पून्हा एकत्र 😳या पोरी खरंच किती मूर्ख आहेत आधी गीतिका त्या गीतेश सरांच्या जाळ्यात अडकली आणि मी तर या नेहाला समजूतदार समजत होतो पण ती देखील या विश्वास च्या जाळ्यात 🤔...

क्रमश :
भाग 41 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या