नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
प्रज्वल,नेहा आणि गीतिकाला विश्वास सोबत बघून बैचेन झाला होता. पण आपण जर आताच वाद घालत बसलो तर अभ्यासातून आपले लक्ष उडेल आणि त्याचा परिणाम सहाजिकच आपल्या परीक्षेवर होईल. केवळ आजचा तर प्रश्न आहे मग या नंतरचा पेपर दोन दिवसांनी आहे अशी स्वतःची समजूत काढून प्रज्वल परीक्षा हॉल कडे वळाला.
विश्वास : चला देवाचं नाव घेऊन आता मिशन गीतेशचा श्रीगणेशा करतो.
असं म्हणून विश्वासने अती महत्वाचे असा heading टाकून स्कॅन केलेला पुरावा सोशल मीडिया वर viral केला. पाहता पाहता सध्याकाळ पर्यंत तो मेसेज कॉलेजच्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे पालक सगळीकडेच viral झाला.
आता कॉलेज मध्ये फक्त न फक्त गीतेश सरांबद्दल चर्चा चालू होती.
Viral झालेला मेसेज पाहून कॉलेजच्या प्रिन्सिपॉलने सगळ्याच शिक्षक लोकांची एक मिटिंग भरवली.
प्रिन्सिपॉल गीतेश सरांना नेहमीच सपोर्ट करत असत त्या मुळे त्यांनी गीतेश सरांना याबद्दल तोंडी विचारले.
गीतेश सर : माननीय प्रिन्सिपॉल सर तूम्हाला असं वाटत नाही का की तूम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी एकत्र करत आहेत. तसंही या आधी देखील मी माझ्या आधीच्या बायकांना का सोडलं आहे याचं एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे.
दुबे सर : गीतेश सर मी जरा बोलू का??
गीतेश सर : काय??
दुबे सर : तूम्ही लाख खरं बोलाल हो पण हा पुरावा,हा तर माहिती नाही कुठकुठपर्यंत पोहोचला आहे. याला तर तुम्हाला उत्तर द्यावे लागेल ना.
दुबे सरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे गीतेश सरांचा अहंकार दुखावला गेला..
गीतेश सर,: प्रिन्सिपॉल सर तुम्हाला मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हणजे झालं ना...
दुबे सर : याला आम्ही गोड धमकी समजावी का?😊
गीतेश सर : मी हायर ऑथॉरिटीला बोलत आहे ना 😡...
दुबे सर : प्रिन्सिपॉल सर!! मला नाही वाटत की या बाबतीत मुख्यमंत्री देखील काही करू शकतील. आणि सर जर तुम्हा दोघांचं नेहमीसारखं ठरलेलं असतं तर आम्हाला मीटिंगला बोलावण्याची गरजच काय आहे. सॉरी सर पण ईथे न्यायाचा प्रश्न आहे.
तूम्ही तूमची मिटिंग चालू द्या. असं म्हणून रागातच😡 दुबे सरांनी मिटिंग सोडली.
बाकी प्राध्यापक लोकांनी काहीच न बोलता दुबे सरांना मुकसंमती दर्शवली होती. पण प्रिन्सिपॉल स्वतः मंत्र्यांच्या दबावाखाली गीतेश सरांवर काहीच ऍक्शन घेऊ शकत नव्हते.
मला माहितीच होतं या मिटिंगचा काहीच निष्कर्ष निघणार नाही.हताश होऊन माने सर देखील मिटिंग संपल्या संपल्या बाहेर पडले..
प्राध्यापकांचे हे बोलणे विश्वासच्या कानावर आले...
पेपर संपल्या संपल्या प्रज्वलने अनुयाला फोन केला.
प्रज्वल : अनुया!! ह्या नेहाचं डोकं बिकं फिरलं की काय गं??😡
अनुया : का 😳काय झालं??
प्रज्वल : अगं मी गावावरून आल्यापासून नेहा आणि विश्वासच्या अफेयर ची चर्चा ऐकली. सुरुवातीला मला या चर्चेवर विश्वास बसला नाही. पण त्यांना मी कालपासून सतत एकत्र पाहिलं आहे. तुमच्या ग्रुप च्या मुलींना असल्या फालतू नात्यांमध्ये अडकण्याचा शौक लागला आहे का 😡
अनुया : प्रज्वल!! काहीपण बडबड करू नकोस 😡.. मला एक सांग तूला कुणी सांगितलं नेहा आणि विश्वास बद्दल??
प्रज्वल : त्याने काय फरक पडणार आहे?? मला ते सोबत दिसत आहेत त्याचं काय?
अनुया : प्रज्वल!!एक तर प्रत्येक वेळेस तू काहीतरी अर्धवट ऐकतोस किंवा बघतोस आणि मग उगाचच आरडा ओरड करतोस. आपण जरा भेटून बोलूया का मग मी सगळं तूला सांगते..
ठिक आहे थांबतो मी..असं म्हणून प्रज्वलने त्याचा मोबाईल डाटा on केला. आणि त्याला गीतेश सरांविषयी viral झालेली पोस्ट दिसली.😳 ओ माय गॉड ही तर ब्रेकिंग news आहे.
तितक्यात अनुया तिथे आली... दोघेही कॅन्टीन मध्ये जाऊन बसले..
प्रज्वल : अनुया!!ही पोस्ट बघितलीस का??
अनुया : बघायचं काय त्यात आपल्या मिशन गीतेश सर चा भाग आहे तो..पण मी तूला सांगण्याआधी मला हे सांग तूला कुणी सांगितलं की विश्वास आणि नेहा चं अफेअर चालू आहे ते..
प्रज्वल :कोण सांगणार रोहन ने i mean त्याला विकीने सांगितलं..
मला वाटलंच हा झेंडू असेल.. बरं ऐक असं म्हणून अनुयाने प्रज्वलला दोन तीन दिवसात काय काय घडले ते सांगितलं..
प्रज्वल :😳 ग्रेट...
अनुया : आणि नेहा,विश्वासला दादा म्हणते समजलं ना... आपल्या कॉलेज मध्ये मुलगा मुलगी एकत्र दिसले की काहीही मागचा पुढचा विचार न करता त्यांचं नाव जोडलंच म्हणून समजा.. हो ना..अन प्रज्वल प्रत्येक वेळी ही ओरडायची घाई बरी नव्हे...
प्रज्वल : सॉरी सॉरी पून्हा नाही असं करणार.. पण खरं सांगू का तुमच्या काळजीपोटी मी चिडलो होतो.
अनुया : हूं....
गीतेश सरांबद्दल आलेली पोस्ट खरी आहे का याची खात्री करण्यासाठी जवळ जवळ सगळ्या मुलींच्या पालकांनी त्यांना फोन 📳लावले...
दुसऱ्याच दिवशी कॉलेज मधील मुला मुलींचे पालक जमा झाले आणि प्रिन्सिपॉल सरांना घेराव घातला.
प्रिन्सिपॉल सरांनी गीतेश सरांना सक्तीच्या रजेवर पाठवतो. असे सांगितले पण त्यावर पालकांचे समाधान होत नव्हते
थोड्याच वेळात तिथे news चॅनेल वाले देखील जमा झाले. गीतेश सरांच्या कारणाम्याची बातमी आता जगभर पसरली होती.
विरोधी पक्षाने काही पाऊल उचलण्या आधीच मुख्यमंत्र्यांनी कॉलेजच्या प्रिन्सिपॉलला गीतेश सरांना कॉलेज मधून काढण्यासाठी आदेश दिले.
आता गीतेश सरांना कॉलेज मधून काढण्याशिवाय काही पर्याय नव्हता....
गीतेश सरांना कॉलेज मधून काढण्याचे अनाऊन्स केल्यावर सगळ्या पालकांनी भारत माता की जय असा नारा लावला....
नंतर एक एक करून सगळे पालक परत त्यांच्या गावी, घरी गेले...
श्रावणी, शारदा रुपाली आणि मयुरा यांना सगळे updates news चॅनेल वर मिळत होते.आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटना जगासमोर आणून कॉलेज मधल्या मुलींना गीतेशच्या जाळ्यात अडकवण्या पासून वाचवले म्हणून आणि त्यांच्या हिम्मतीचे देखील कौतुक होत होते....
श्रावणी शारदा रुपाली आणि मयुरा मनोमन मिशन गीतेशला धन्यवाद देत होत्या.
कॉलेज मधील सर्वच मुले आणि मुली खूप आनंदून गेले होते.
नेहा अनुया गीतिका सायली प्रज्वल रोहन विश्वास विन्या सगळेच जण एका ठिकाणी जमा झाले..
नेहा :विश्वास दादा!!पण ऐनवेळी हे news चॅनेल वाले कुठून आले..
विश्वास :काल मिटिंगनंतर प्राध्यापक लोकांचं बोलणं ऐकलं होतं.. म्हणून मी कालच पत्रकारांना सांगून ठेवले होते.
क्रमश :
भाग 42 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या