आमच्यासारखे आम्हीच (भाग 42)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

नेहा : अरे वा विश्वास दादा!!तू तर प्लॅनला एकदम परफेक्ट वळण दिलेस.

विश्वास : कसं आहे ना रोगाचे समूळ उच्चाटन करणं कधी कधी फार महत्वाचे असते.

अनुया : अगं नेहा!! डॅडाचा फोन येऊन गेला. ते कॉलेज मध्ये येऊन गेले...

गीतिका :हो माझे पप्पा पण येऊन गेले. पण ते आपल्याला का नाही भेटले 🤔...

सायली : अगं आपल्या हायर ऑथॉरिटीनेच त्यांना आपल्याला भेटू दिले नाही.सगळे पेरेंट्स आणि स्टुडंट्स यांचा एकत्र गोंधळ उडेल म्हणून.

विश्वास : चिमणे!! तुमचं चालू द्या.. मी निघतो..

नेहा : ok दादा बाय....

चला गीतिका!! मिशन गीतेश successful.... आज मस्तपैकी हॉस्टेल वर सेलेब्रेशन करू...

अनुया आणि सायलीचे नेहा आणि गीतिकाला एक सरप्राईज पार्टी देण्याचे प्लॅन सुरु झाले.

पार्सल ते ही माझ्या नावाने 🤔कुणी मागवले असेल. मॅक डी चं अमेरीकन चीज वालं veg बर्गर.. माझं फेव्हरेट...सोबत कोक सुद्धा कुणी मागवलं असेल बरोबर चौघीसाठी आहे....

विचार करत करत नेहा रूमवर पोहोचली 🤔

अनुया : नेहा!! तूझ्या हातात पार्सल?? कसलं पार्सल आहे गं..

नेहा : अनुया!! कुणीतरी शुभचिंतकाने पिझ्झा पाठवला आहे...

अनुया : पण मी तर बर्गर मागवला होता...

नेहा : 😂😂😂तुम्हारी चोरी पकडी गयी...

अनुया : काय गं नेहा!! तू पण ना प्रत्येक वेळेस जिंकतेस....

नेहा : अगं मला अंदाज आला होता कारण मॅक डी ची अँप फक्त तुझ्याच फोन मध्ये save आहे. आणि तूला माहिती आहे मला काय आवडतं ते😉...

टेस्ट्स चा निकाल लागला सायली आणि रोहन ने पहिला क्रमांक पटकवला होता.

नेहा अनुया आणि गीतिका ला देखील चांगले मार्क्स पडले होते.

अंजलीला या चौघींपेक्षा कमी मार्क्स पडले होते...

अंजली : गेस पेपर मिळाल्यावर तर कुणालाही चांगले मार्क्स मिळणारच हो ना 😏...

अनुया : अंजली!! काय झालं आहे तूला... मी तर प्रज्वल ने दिलेला गेस पेपर तूला दिला होता ना... तूच तो स्वीकारला नाही...

अंजली : हं... प्रज्वलने तुझ्यासाठी खास वेगळा पेपर काढला असणार 😏आम्हाला थोडीच दाखवणार...

अनुया : अंजली!!त्या इलेक्शन पर्यंत तू चांगली होतीस मग आता अचानक ईतकं कसं विक्षिप्त वागत आहेस तू...

सायली : हो ना... प्रज्वलने जर स्पेशल पेपर अनुयाला दिला असता तर ती पहिली आली असती ना...

नेहा :अंजली!! खरं सांग तू आधी एकदम मैत्रिणीसारखी आणि आता शत्रू असल्यासारखी का वागत आहे.. तूला गर्ल्स representative व्हायचं का?? मी बोलू का प्रेसिडेंटशी..

अंजली : मला भीक नको😏...

नेहा : भीक नको म्हणजे.. अगं वोट्स तर तुलाच जास्त होते ना...

नेहाचे ते वाक्य ऐकून अंजलीचे डोळे पाणावले 🥺...

वेळ साधून नेहाने अंजलीला जवळ घेतले... अंजली!!अगं हे इलेक्शन वगैरे जाऊदे... पण तूला माहिती आहे का आता कॉलेज मधले एकामागे एक कार्यक्रम सुरु होणार आहेत आणि मी तुझ्याशिवाय ते साध्य करूच शकणार नाही....

नेहाचे ते वाक्य ऐकून अंजली खूप खूष झाली.... आता या चौघींशी वाईटपणा घेऊन चालणार नाही हे तिच्या लक्षात आलं ...

ठिक आहे नेहा!!मी तूझ्या सोबतच राहील...येते मी मला जरा काम आहे...

अनुया : नेहा!! अगं तू अंजलीला??...

नेहा : हो... मला आता जास्त वैरी नकोत... तरी आपल्याला अंजलीवर शंभर टक्के विश्वास नाही ठेवता येणार.. पण धोका मात्र नक्कीच कमी होणार.. तूला माहिती का अनुया!!असं म्हणतात की चोराच्या हातात चाव्या दिल्या की त्याला चोरी करता येत नाही... हेच धोरण आता मी अंजलीच्या बाबतीत अवलंबणार आहे... आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्या मध्ये अंजली या विषयावर कुठलाही गैरसमज मला नकोय....

प्रज्वल :रोहन!!टेस्ट्स चे मार्क्स कळाले ना....

रोहन : हो... मला आणि सायलीला एकसारखे मार्क्स आहेत... आम्ही दोघेही फर्स्ट आहोत 😊

प्रज्वल : क्या बात है रोहन!!मार्क्स भी एक जैसे... बाकी...तू सायलीला सांगितलं का?

रोहन : काय??

प्रज्वल : अरे तुला ती आवडते ना ते??

रोहन : नाही बाबा, मला भीती वाटते... तसंही मला असं वाटतं की मी तीला आवडत नाही.. ती माझ्याकडे बिलकुल बघत नाही.

प्रज्वल : हूं... बरं माझी परीक्षा झाल्यावर friendship day येणार आहे आपल्या कॉलेज मध्ये आपल्याला त्याचं सेलेब्रेशन करावं लागणार... तेव्हा तूला चान्स आहे तूझी भावना व्यक्त करण्याचा 😉....

रोहन : तेव्हाचं तेव्हा बघू 🙄....

हॅलो नेहा!!मी श्रावणी बोलतेय...

नेहा :हा श्रावणी मॅम बोला...

श्रावणी : मिशन गीतेश यशस्वी झालं. मला खूप आनंद झाला.. जणू काही तुमच्या रुपात माझं गीतेशचा बदला घेण्याचं स्वप्नच तूम्ही पूर्ण केलं..

नेहा : खरं तर तुमच्यामुळे हे साध्य झालं तूम्ही जर पुरावा दिला नसता तर हे होऊच शकलं नसतं...

श्रावणी : नेहा!!पण तूम्ही initiative घेतलं ना म्हणून.. बरं ऐक ना, तूला विश्वास दिसला का गं कधी कॉलेज मध्ये...

नेहा : हो, भेटतो सुद्धा...

श्रावणी: मला भेटून त्याची माफी मागायची होती.

नेहा :इतकंच ना... उद्याच त्याला घेऊन येते... माफी मागण्याचा आणि तुमच्या भावना व्यक्त करण्याचा चांगला चान्स आहे😉...

श्रावणी : तसं नाही गं नेहा!!मला आता तो कुठे माफ करणार आहे.. मी त्याचं आयुष्यच उध्वस्त केल्यासारखं झालंय... पण माफी मागून माझ्या मनावरचं ओझं तर हलकं होईल.

नेहा : ठरलं तर मग... तरी एकदा विश्वास दादाला एकदा बोलून पुन्हा फोन करेन मी.

क्रमश :
भाग 43वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
      
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या