नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
प्रज्वलच्या परीक्षा संपल्या....
प्रेसिडेंट अमित ने कॉलेज मधले friendship day सेलेब्रेशन प्लॅन करण्यासाठी मिटिंग बोलावली...
मिटिंग ला प्रज्वल, रोहन नेहा, दिव्या आणि बाकी सिनियर्स उपस्थित होते..
अमित : या वर्षी आपल्याला असा friendship day सेलेब्रेट करायचा आहे की सगळ्यांच्या लक्षात राहिला पाहिजे..
नेहा : अमित सर!! Friendship day म्हणजे रोज day का? की फक्त friendship day...
अमित : हो,रोज day सुद्धा...
नेहा : ok...
अमित : सेलेब्रेशन साठी वेगळ्या काही आयडिया सुचवा...
प्रज्वल : आपल्या या सेलेब्रेशन साठी काही funds वगैरे आहेत की आपल्याला काही collection करावे लागेल...
अमित : नाही collection करण्याची गरज nahi आपल्या कॉलेज तर्फे आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाच्या सेलेब्रेशन साठी दुबे सर वेळोवेळी आपल्याला funds available करून देणार आहेत...
प्रज्वल : अच्छा...
रोहन : मी सुचवू का??
अमित : बोल रोहन...
रोहन : आपल्याला मिळालेल्या निधी मधून आपण एक मोठा टेन्ट टाकू... त्यात तीन प्रकारचे स्टॉल ठेऊ... एक स्टॉल friendship band... एक स्टॉल गुलाबांचा.. आणि एक स्टॉल छोटया ग्रीटिंग कार्ड्स ज्यावर काही मेसेजेस लिहिता येतील....
प्रज्वल : अरे वा मस्त आयडिया आहे... तीन रंगांचे रिबीन्स, तीन रंगांचे गुलाब आणि तीन रंगांचे ग्रीटिंग कार्ड्स असे ठेऊ...
अमित :चांगली आयडिया आहे.. पण यातून rose king आणि rose queen कसे निवडणार...
प्रज्वल : एक करता येईल ज्या व्यक्तीला 50 च्या वर गुलाब, तसंच 50 च्या वर bands, ग्रीटिंग्स मिळाले त्यांना आपल्या कमिटीला भेटायला सांगू आणि त्यातील सगळ्यात जास्त rose मिळतील त्यातून rose king, queen ठरवू.
अमित : मस्त... यात स्टॉल लावल्यामुळे काही पैसे पून्हा जमा होतील.....
नेहा : अमित सर!! मला एक बोलायचं होतं...
अमित : बोल...
नेहा : अमित सर!!विश्वास दादा.. म्हणजे आपले सिनियर विश्वास सर आणि त्यांची गँग आता पहिल्यासारखी डेंजर राहिली नाहीये... मला असं वाटतं की या friendship डे च्या दिवशी ही एक चांगली संधी आहे त्यांना आपल्या मध्ये सामावून घेण्याची.... कितीही केलं तर ते आपल्या कॉलेजचे विद्यार्थीच ना.... तसंही गीतेश सरांच्या विरुद्ध viral झालेल्या मेसेज मध्ये विश्वासदादा बद्दल आणि विन्या श्रावणी मॅम ने लिहिलेलं आहेच ना.
अमित : हूं... ईतक्या लवकर हे बदल🤔... मान्य व्हायला थोडं अवघड वाटत आहे.
नेहा : मान्य आहे...थोडी घाई होत आहे... पण मला तर ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी वाटत आहे... तुम्हाला कदाचीत अंदाजा नसेल गीतेश सरांना कॉलेज मधून काढण्यासाठी खूप महत्वाचा रोल त्यांनी निभावला आहे... त्याच्या मुळे ऐनवेळी news चॅनेल वाले आले...
अमित : अच्छा 🤔... खरं...
हो हो अगदी खरं प्रज्वल नेहाला सपोर्ट करण्यासाठी बोलला...
अमित : ठिक आहे.....मी नंतर विश्वासची भेट घेईन...तो जर इच्छुक असेल तर चांगलच आहे ना... उलट आपल्याला कुठल्याही गोंधळाची भीती राहणार नाही....
रोहन : king आणि queen साठी crown... Arrange करावे लागतील....आणि सैशे देखील..
अमित : ठिक आहे.... दिव्या हे crown, आणि स्टॉल चं तू बघशील....
दिव्या :ठिक आहे.. चालेल....
अमित : चला आता मिटिंग संपली असे मी जाहीर करतो..
या पुढचे updates मी व्हाट्सअँप ग्रुप वर देत जाईल...
मिटिंग संपल्यावर नेहाने लागलीच विश्वासला फोन 📳लाऊन त्याला कॉलेज कॅम्पस मध्ये बोलावले...
विश्वास : काय गं चिमणे!!असं सारखं सारखं मला भेटशील तर आपल्या कॉलेज मध्ये नको ती चर्चा होईल ना...
नेहा : आता काय व्हायचं बाकी आहे... तसही मला काहीच फरक पडत नाही... पण जर हे बोलावणं श्रावणी मॅमच्या बाबतीत असेल तर तूला नक्कीच फरक पडेल हो ना...
विश्वास : काय म्हणालीस.?.. श्रावणी... आता तिच्या बद्दल काय??
नेहा : सांगू... नक्की सांगू.. पण हे कॉलेजवाले काय म्हणतील...
विश्वास : ए चिमणे!!... सांग ना पटकन
नेहा : बरं ऐक!! श्रावणी मॅम ला तूला भेटायचं आहे...
विश्वास : मला 😳 आता कश्यासाठी...
नेहा : हे बघ विश्वास दादा!! श्रावणी मॅम सुरुवातीला जे तुझ्यासोबत वागल्या त्याला कारण होतं गीतेश सरांचं कपट कारस्थान.... त्यात तूम्ही दोघेही सफर झाले... श्रावणी मॅम चा दोष इतकाच होता की त्या दिसायला खूप सुंदर 😍आहेत आणि तू त्यांना आवडत असून देखील गीतेश सरांनी game केला...
विश्वास : म्हणजे??🤔
नेहा : मला काय वाटतं विश्वास दादा!! तू हे श्रावणी मॅमलाच का नाही विचारत.....
विश्वास : हूं...
नेहा : अरे विश्वास दादा!! श्रावणी मॅम ना तूला भेटून माफी मागायची आहे... हे बघ दादा!!हाच चांगला चान्स आहे..तूला सगळं काही जाणून घेण्याचा आणि जमलं तर तुमच्या भावना व्यक्त करण्याचा....
विश्वास : कधी भेटायचं आहे??
नेहा : आज संध्याकाळी... कुठे भेटायचं आहे ते मी श्रावणी मॅम ला विचारून मेसेज करते...
विश्वास : ठीक आहे निघतो मी... मला मेसेज कर...चिमणे!!तो तुमचा प्रेसिडेंट तुझ्याकडे कसा मारक्या म्हशीसारखं बघत आहे...
नेहाने वळून बघितलं.... आता याला काय झालं??🤔
नेहा : विश्वास दादा!!चल मी पण निघते जाता जाता बघते अमित असं काय बघतो ते...
नेहा : अमित सर!!काय झालं तूम्ही आमच्या कडे असं काय बघत होते..
अमित : आपलं मिटिंग मध्ये ठरलं ना की मी विश्वास सोबत बोलणार.. मग तू कसं काय बोललीस??...
नेहा : मी काय बोलले🤔... ओ अमित सर!! तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे.. मी आपल्या friendship day बद्दल नाही बोलले.... तो मान तुमचाच आहे....मी कश्याला त्याच्या मध्ये पडू.आणि तसही मला जे वाटलं ते मी मिटिंग मध्ये बोलले ना... मी विश्वास दादा सोबत दुसरं काहीतरी बोलत होते...
.क्रमश :
भाग 44 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या