नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
अमित : नक्की ना....
नेहा : हो हो नक्की... तूम्ही जेव्हा विश्वासशी बोलाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच
अमित : बरं बरं ठिक आहे...
प्रज्वल आणि अनुया आता कॉलेज मध्ये कॅन्टीन मध्ये कॉलेजच्या लायब्ररी मध्ये सतत भेटत असत.
यांचे अफेअर सुरु आहे याची बातमी पूर्ण कॉलेजला माहिती झाली होती.
पण अनुया मात्र बिनधास्त होती... तीला बदनामी ची बिलकुल भीती वाटत नव्हती. आणि तीने काहीही मागितलं की तीला सगळं उपलब्ध करून देणारे तीचे डॅडा
तिच्या आणि प्रज्वलच्या नात्याला सहजच मान्यता देतील असं तीला वाटत होतं..
प्रज्वलने अनुयाला पूर्णपणे प्रपोज जरी केलं नसलं तरी ती त्याच्यासमोर आली की तो बाकी सर्व विसरत असे..
कित्येक वेळा तर त्याने अनुयाला त्याच्या आणि तिच्या आर्थिक फरकाबद्दल बोलावं आणि आपण या पुढे जायला नको असे सांगण्याची तो मनाची तयारी करत असे पण अनुया समोर आली की जाऊदे आज नको,आज राहू दे असाच विचार त्याच्या मनात येत असे...
नेहाने श्रावणी शी बोलून कॅफे कट्ट्यावर विश्वासला भेटायचे असे ठरले...
विश्वासला मात्र आता धाकधूक वाटायला लागली होती.... हे काय आजपर्यंत सगळे जण आपल्याला घाबरत होते आणि आज मी चक्क श्रावणीला घाबरत आहे 🤔... विश्वास हे तूला सूट होत नाही...
इतक्या दिवसात खरंच किती बदल घडून गेले..... ती चिमणी मला भेटते काय... आणि माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो काय?? खरंच भारी आहे ही पोरगी....
चला विश्वास आता निघावं लागेल नाहीतर कॅफे कट्ट्यावर पोहोचायला उशीर होईल. असा विचार करत विश्वासने बाईक कॅफेच्या दिशेने वळवली.
कॅफे कट्ट्यावर श्रावणी नुकतीच पोहोचली होती...आणि विश्वासची वाट पाहत होती...
तितक्यात विश्वास तिथे पोहोचला... तो इकडे तिकडे बघत असताना श्रावणी त्याच्यासाठी उठून उभी राहिली...
तीला पाहताच विश्वास दोन मिनिट तिथेच थांबला...
किती अप्रतिम सोंदर्य🤔 खरंच ही आपली वाट पाहत असेल का?तीला अपराध्यासारखं वाटत आहे म्हणून ती आली आहे... विश्वास आता जास्त विचार नको..
असा विचार करत करत विश्वास श्रावणी जवळ येऊन बसला....
श्रावणी : 😊
विश्वास :😊
श्रावणी : कसा आहेस??
विश्वास : मी ठिक आहे... आणि तू??🤔
श्रावणी : मी पण ठीक आहे...
विश्वास : काय घेणार आहेस??
श्रावणी : एक कप कॉफी....
विश्वास :ए छोटू!!दोन कप कॉफी घे.....
श्रावणी : विश्वास!!😳 तूला तर कॉफी आवडत नव्हती ना....
विश्वास : श्रावणी!! 😳तूला माहिती होतं....
श्रावणी : हो मग....
विश्वास : पण मध्ये ईतकं काही घडून गेलं की बऱ्याच नावडत्या गोष्टी आवडत्या कराव्या लागल्या 😊
श्रावणी : सॉरी...
विश्वास : काय??
श्रावणी : सॉरी, माझ्यामुळे तूला खूप त्रास झाला...
विश्वास : 😊its ok.. आता जे घडायचं ते घडून गेलंच ना...
श्रावणी : विश्वास!! खरंच मनापासून खूप खूप सॉरी... पण मी तर काय करणार त्या गीतेश ने मला ईतकं पटवून सांगितलं होतं की ते पत्र आणि ग्रीटिंग वगैरे त्यांनीच ठेवले होते... खरं तर मला तूच..,.....
विश्वास : बोल ना का थांबलीस....
श्रावणी : तू रागावणार नसशील तर बोलते....
विश्वास : आता ईतक्या दिवसानंतर मी काय रागावणार.... बोल ना...
श्रावणी : खरं तर सुरुवातीपासून मला तूच आवडत होता... पण गीतेश ने तूझ्या पत्रांचे आणि ग्रीटिंग्स चे क्रेडिट घेतले आणि मला वेडीला वाटले की ईतकं प्रेम माझ्यावर दुसरं कुणी करूच शकत नाही आणि त्याच चक्रव्युव्हात मी अडकत गेले....आणि जेव्हा खरं कळालं तेव्हा खूप उशीर झालेला होता.... मला आता तूझे गुंडगिरी करण्याचे कारण समजले होते....मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता... पण स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपली परत भेट होईल आणि मी तूझी माफी मागू शकेल... हे बघ विश्वास!!तुझ्यासोबत जो धोका झाला, जे नुकसान झाले आहे ना मी त्याची भरपाई तर कुठूनच करू शकत नाही.. पण मी तूझी माफी मागून माझे डोक्यावरचे ओझे तरी कमी करू शकते... म्हणून मी आज भेटले....
विश्वास : जाऊदे!!झालं गेलं विसरून जाऊ... खरं तर आपण दोघेही प्यादे होतो..त्या गीतेश च्या प्लॅन चे...जाऊदे श्रावणी!! आता आपण खूप पुढे आलो आहोत.... आणि थँक्स, तू तूझ्या लेखी पुराव्या मध्ये माझ्यावर आणि विन्या वर काय अन्याय झाला हे लिहिलंस.... त्या मुळे थोडा का होईना लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे....
श्रावणी : थँक्स😊
कॉफी आली☕️... दोघांनीही कॉफी☕️ घेतली....
श्रावणी : खरंच मला आज डोक्यावर ठेवलेला भारदस्त दगड बाजूला सरकल्या सारखं वाटत आहे...
विश्वास : हं.... चला निघतो मी....
श्रावणी : परत कधी भेटणार??🤔
विश्वास : 😊 मी काय सांगू...
श्रावणी : बरं keep in touch... हा माझा नंबर घे..
दोघांनीही नंबर exchange केले.....
विश्वास : निघतो मी बाय.....
श्रावणी : बाय...
दोघेही तिथून निघाले... पण दोघांच्याही मनात एकमेकांविषयी विचार चालू होते....
श्रावणी आणि आता खूप रिलॅक्स झाले होते .....
नेहाने friendship day सेलेब्रेशन बद्दल तिघींना सांगितले...
सायली : हे wow... मज्जा येईल आता आपल्या क्लास मधील बऱ्याच मुला मुलींचे गुपित उघडे पडतील नाही का 😉...
अनुया : हो..खरंच... मला तर उत्सुकता लागली आहे की हा प्रोग्रॅम कसा असेल??🤔
गीतिका : पण हे सेलेब्रेशन आहे कधी...
नेहा : येत्या शनिवारी....
क्रमश :
भाग 45 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या