आमच्यासारखे आम्हीच (भाग 45)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

विश्वास रूमवर परत आला... स्वतःच्या विचारात गालातल्या गालात स्मित करत ....

विन्या : विश्वास!!आज चक्क तू एकटाच smile करत आहेस... परत एकदा कुणाच्या प्रेमात 😍पडलास की काय?🤔

विश्वास :विन्या!! प्रेम तर जुनंच आहे रे... पण आज नव्याने माझ्या समोर आले...

विन्या : म्हणजे??

विश्वास : आज तो सेलेब्रेशन बनता है | विन्या आज मस्त चकणा मागव... आणि आपला स्पेशल ब्रँड पण...

विन्या : बापरे स्पेशल ब्रँड... ईतका आनंद झाला आहे का?

विश्वास : असंच समज

विन्या : बरं ऐक आपल्या सेलेब्रेशन च्या आधी.. त्या अमितला एकदा भेटून घे... तो ईथे दोनवेळेस येऊन गेला

विश्वास : अमित 🤔 आता त्याला मला कशाला भेटायचं आहे...

विन्या : माहिती नाही पण काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे असं तो म्हणत होता....

विश्वास : ठीक आहे... मी त्याला भेटून येतो....

तितक्यात अमितने तिथे हजेरी लावली....

अमित : विश्वास!!येऊ का🤔

विश्वास: ये ना...

अमित : या saturday ला friendship day आणि rose day सेलेब्रेशन करायचं आहे... त्या साठी मला तूझी मदत हवी होती...

विश्वास : माझी मदत 🤔 चक्क माझी मदत...

अमित : तूला नेहा ने सांगितलं नाही का?

विश्वास : नाही... कश्या बद्दल?

अमित : friendship day बद्दल....

विश्वास : नाही... मला काहीच माहिती नाही...

अमित : विश्वास!! आमच्या पूर्ण कमिटीचं असं ठरलं आहे की या friendship day आणि rose day सेलेब्रेशन मध्ये तू आणि तूझी गँग.....

Dont worry आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही.... अमितचं वाक्य मध्येच तोडत विश्वास म्हणाला....

अमित : अरे विश्वास!! तू काही तरी गैरसमज करून घेत आहेस... मला आधी पूर्ण बोलू तर दे....

विश्वास : हं... बोल

अमित : तू आणि तूझ्या गँग ने आम्हाला मदत करावी... नुसती मदतच नाही तर अगदी महत्वाचा रोल करावा..

विश्वास : मी आणि माझी गँग... आम्हाला ईतकं अचानक महत्व आलं....कसं काय 🤔

अमित : महत्व तर येणारच ना.... तूम्ही आपल्या कॉलेज मधली मुख्य घाण काढून टाकली... आणि जे पुरावे viral झाले त्या वरून तू आणि तूझा मित्र का वाम मार्गाला लागले हे समजूच शकते ना....तूझ्या जागी मी असतो तर कदाचीत मी देखील असाच वागलो असतो...

विश्वास :पण तुम्हाला ईतकं सगळं कसं माहिती झालं 🤔... अच्छा!!आलं लक्षात... हे तुम्हाला चिमणीने सांगितलं असेल ना...

अमित : चिमणी 🤔

विश्वास : नेहा ने

अमित : चिमणी 😂😂 काय समर्पक नाव दिलं आहेस तू....

विश्वास : 😊.... बरं आम्हाला काय करावं लागेल....

अमितने कसं सेलेब्रेशन करायचं ते सर्व विश्वासला समजून सांगितलं...

विश्वास :मला आणि विन्याला स्टॉल ठेवायला आवडेल... विन्या चालेल ना??

विन्या : का नाही चालणार?? चालेल नक्की चालेल..

अमित : ठरलं तर मग... तुमच्या गँग चे दोन मेंबर्स टेन्ट साठी आमच्या सोबत राहतील आणि बाकी तूम्ही तीन स्टॉल ठेवा एक बॅण्ड्स चा एक rose चा आणि एक ग्रीटिंगस चा...

विश्वास : ok done....

अमित : ठीक आहे निघतो मी... तूला आणि विन्या ला व्हाट्सअँप ग्रुप मध्ये ऍड करतो मी.. बाकीचे updates तुम्हाला त्यावर मिळत राहतील....

विश्वास : ठीक आहे.., चालेल....

विन्या :विश्वास !! गेल्या दोन ते तीन वर्षात आपण या कॉलेजचे विद्यार्थी आहोत हे तर मी विसरूनच गेलो होतो.... ... आपण म्हणजे गुंडगिरी करणारी मवाली मुले  अशीच आपली ओळख झाली होती...पण या नवीन प्रेसिडेंटने आपली देखील किम्मत केली....आपल्याला भाव दिला...

विश्वास :खरं आहे तुझं...आपल्या कॉलेजचा आताचा प्रेसिडेंट चांगला आहे... विशेष म्हणजे त्याने आपल्याला रीतसर विचारून त्यांच्या प्लॅनमध्ये  सामावून घेतले.....

प्रज्वल : हॅलो अनुया 📳

अनुया : बोल प्रज्वल काय म्हणतोस??

प्रज्वल :मग काय प्लॅनिंग आहे??

अनुया : कसलं??🤔

प्रज्वल : रोज day सेलेब्रेशनचं...

अनुया : अजून काहीच ठरलं नाही...

प्रज्वल : मी तर प्लॅन केलं आहे.... 

अनुया : काय 🤔

प्रज्वल : मी असा कसा सांगेन...

अनुया : जा नको सांगू😏... ठेऊ फोन📳

प्रज्वल : अरे तू तर रागावलीस....😍😍 पण खरं सांगू का रागावल्यावर तू खूप छान दिसतेस...

अनुया : जाऊदे बाबा... मी नाही बोलत तुझ्याशी...

अनुयाने लडिवाळ रागात येऊन फोन 📳ठेवला....

नेहा : अनुया!! काय झालं गं?? तू प्रज्वल वर का चिडलीस??

अनुया : तो प्रज्वल बघ ना... जर रोज डे चा प्लॅन सांगायचा नसेल तर विषय कशाला काढायचा....

नेहा :हूं.. अनुया!! प्लॅनींग वरून आठवलं आपण दोघी एक छान प्लॅन करू....

अनुया :😳काय कसला प्लॅन....

नेहाने अनुयाच्या कानात काहीतरी सांगितलं...

नेहा : आता हे फक्त तूझ्यात आणि माझ्यात....समजलं ना...

अनुया : हं...बरं नेहा ऐक ना मला प्रज्वलसाठी काही खास  करता येईल का??

नेहा : खरं सांगू का अनुया!! तुझं बर्थडे सेलेब्रेशन बघता प्रज्वलने  फक्त तूझी श्रीमंती बघितली... त्यावरून तू किती खर्चिक आहे हे दिसून आलं...उद्या प्रज्वलला असं देखील वाटू शकतं की मी या अनुयाचे सगळे लाड नाहीच पुरवू शकत... ... पण हा रोज day चान्स आहे... तूला तूझ्या भावना व्यक्त करण्याचा... ते ही अगदी नगण्य किमतीत...

अनुया : हो गं... तुझं बरोबर आहे...

अंजली : नेहा!! येऊ का आत...

नेहा : अंजली!! तूला माझ्या रूम मध्ये येण्याची कधीपासून परमिशन लागत आहे...

अंजली :तसं नाही... पण तुमचं काही पर्सनल चालू असेल तर....

नेहा : पर्सनल कसलं पर्सनल... बरं ते जाऊदे... बरं झालं तू आलीस.. तूला आपल्या friendship day /rose day सेलेब्रेशन मध्ये एक महत्वाचे काम करायचे आहे...

अंजली : 😳 मला आणि महत्वाचे.... काय?

नेहा : हे बघ.... ज्या मुलींना मिळालेले बॅण्ड्स आणि  गुलाब ज्या ज्या व्यक्तीला मिळतील ते तुझ्याकडे येतील... तू आणि मी ते मोजणार आणि नंतर तू त्यातील विनर घोषीत करायचा आहे....त्यातील friendship queen आणि rose queen तूला अनाऊन्स करायचं आहे... चालेल ना...

अंजली : ईतकं मोठं आणि महत्वाचे काम.. नेहा!!माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे थँक्स अ लॉट🥺

नेहा : बस का.. अंजली!!  झाली लागलीच इमोशनल....
चला आता तयारीला लागा....

क्रमश :
भाग 46 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या