आमच्यासारखे आम्हीच (भाग 46)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

Friendship day नुसता नावानेच सेलेब्रेट होणार होता असे नव्हे तर या friendship day ला जुनी गैरसमज झाल्याने दूर झालेली मनं देखील एकत्र येणार होती. आणि rose day... 🤔  त्यातही सरप्राईज ठेवलेलं होतं...

मैत्रीचा दिवस उजाडला... सगळ्या हॉस्टेलच्या मुलीनी ड्रेसकोड ठरवले होते.... Long गाऊन, जीन्स टॉप, प्लाझो आणि साडी... या चारही पैकी ज्याला जे आवडेल ते घालायचं....

मुलांनीही अगदी जीन्स आणि टी शर्ट तर कुणी कुर्ता... असं तयार झाले होते...
विश्वासने देखील एक पांढरा कडक इस्त्रीचा नेहरू शर्ट घातला होता. त्याच्या धीप्पाड शरीरावर तो अधिकच खुलून दिसत होता...
 विश्वास ईतका हँडसम दिसत होता की आपल्या कॉलेज मध्ये ईतका हँडसम मुलगा असताना आतापर्यंत आपले याच्याकडे लक्ष कसे गेले नाही असंच त्याच्याकडे बघणाऱ्या प्रत्येक मुलीला वाटत होते.,..

विन्या : विश्वास!!भावा आज तर रोज king ची बाजू तूच मारून नेतोस वाटतं... कसला भारी दिसत आहेस....

विश्वास : विन्या!! खूप दिवसांनी आज पहिल्यांदाच मी स्वतःला माझ्या स्वतःच्या नजरेतून न्याहाळलं आहे.... त्या नालायक माणसामुळे मी स्वतःचं अस्तित्व हरवून बसलो होतो.....

विन्या : हो खरंच आपण चांगलंच भरकटलो होतो....

विश्वास : बरं विन्या... आपल्या गँग मधले दोघे जण टेन्ट साठी गेले आहेत ना...

विन्या : हो हो.. अर्ध्या तासापूर्वीच गेले आहेत..

विश्वास : गूड... बरं ऐक ना आपण काय करू... तीन ऐवजी चार स्टॉल लाऊ.... चार कोपऱ्यात चार स्टॉल... Batch wise... चारही स्टॉल वर बॅण्ड्स, फूले आणि ग्रीटिंग्स ठेऊ... म्हणजे एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.

अमित : अरे वा विश्वास!!विन्या!! तूम्ही तर एकदम परफेक्ट arrangements केल्या आहेत.. बरं ऐका आपल्या सेलेब्रेशन ची वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत ठेवली आहे... त्या नंतर एक तास ब्रेक आणि सात वाजता king आणि queen ची घोषणा करायची आहे.

सेलेब्रेशनचे वेळापत्रक अमितने व्हाट्सअँप द्वारे आधीच संपूर्ण कॉलेज ला पाठवून दिलेले होते ....

दहा वाजले एक एक करून विद्यार्थी सुरु झाले....

नियोजन व्यवस्थित असल्यामुळे एकदम गर्दी झाली नाही...

रशीद : यास्मिन!! रुको...

यास्मिन : क्या...

ये लो.... असं म्हणत रशीदने यास्मिनला पिवळा गुलाब दिला....

यास्मिन :रशीद!! रुको... असं म्हणत पिवळा बँड रशीद ला बांधला....हम दोस्त बनके रह सकते ना... I mean सिर्फ दोस्त...

रशीद : हा हा क्यूँ नही... पर मैने जो कहा था उसके बारे मे क्या?? रशीदने यास्मिन ला फोन वर प्रपोज केले होते त्याची आठवण करून दिली....

यास्मिन : हमारे अम्मी अब्बू ने किसी और को पसंद किया है | मेरा जल्द ही रोका होने वाला है....

रशीद : किसी और को मतलब...

यास्मिन : हमारे मामा का लडका कुछ दिन बाद दुबई से आनेवाला है | तो प्लीज मेरे ये दोस्ती को कुछ गलत मत समझो....

रशीद : अच्छा...

यास्मिन: प्लीज हमे गलत मत समझो...हमने कभी आपके बारे मे ऐसा वैसा कुछ नही सोचा...

रशीद : अरे नही... हम आपको गलत नही समझ रहे है |

यास्मिन आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली...

तितक्यात अनुया, सायली आणि गीतिका ची टेन्ट मध्ये एन्ट्री झाली.. नेहा मात्र आधीच आलेली होती....

विश्वासला पाहून सगळ्या मुली मात्र थोडावेळ थबकत होत्या... आपल्या कॉलेज मध्ये ईतका हँडसम कुणीतरी आहे... ह्याचं सगळ्या मुलींना आश्चर्य वाटत होतं... आपलं आतापर्यंत याच्याकडे लक्ष कसं गेलं नाही असं सगळ्या मुलींना वाटत होतं....

विश्वासला येता जाता पिवळा गुलाब देत होते आणि पिवळा बँड त्याच्या हातावर बांधत होतं...

नेहा : क्या बात है विश्वास दादा!! आज तर तू नक्कीच friendship king होणार आहेस....

विश्वास : ए चिमणे!! अजून दुसऱ्या कुणाला तरी मिळतील की माझ्या पेक्षा जास्त गुलाब....

नेहा : मला नाही वाटत.... तसंही तूला येल्लो बँड बांधणाऱ्या मुली हुशार आहेत बरं का... उद्या तूला त्यांना प्रोटेक्ट करावं लागेल😉....

विश्वास : बरं बरं.😊..

रोहन सायलीला शोधत होता... सायली मात्र एका कोपऱ्यात उभी होती... तीला विकी ने येलो बँड बांधला... क्लास मधल्या अजून एक दोन मुलांनी येल्लो बँड बांधताना बघून...आपणही सायलीला सध्या तरी येल्लो बँड बांधूच शकतो ना असा विचार रोहन करत होता...

तितक्यात सायली रोहन जवळ आली...

सायली : रोहन!!हात पुढे कर...

रोहन : अं 😳... हं

सायलीने रोहनला पिवळा गुलाब देत पिवळा बँड बांधला...

हे काय...लाल तरी बांधायचा ना... जाऊदे तू नाही बांधला तरी मी बांधणार... असा विचार करत त्याने सायलीला गुलाबी बँड आणि गुलाबी गुलाब दिला... एक मैत्रीचं ग्रीटिंग देखील दिलं....
त्यात लिहिलं होतं...
      
       शोधत होतो मैत्री
       मनाच्या गाभाऱ्यात
      हवी हवीशी वाटणारी..
      तूझ्या रूपात मिळाली

सायली : थँक्स 😊

काय करू??🤔 रेड रोज देऊ की नको... नाही नकोच... आजच कुठे मैत्री झाली आहे.... जर सायलीच्या मनात काही नसेल तर.... माणसाने कसं अल्पसंतुष्ट असावं😒.. अशी  मनाची समजूत घालून रोहन तितक्यावरच थबकला....

अनुयाने प्रज्वलला देण्यासाठी एक लाल गुलाबआणि दोन  ग्रीटिंग खरेदी  केले ....खरं तर मला प्रज्वलला रोज किंग करायचे होते... पण आता जर मी सगळेच गुलाब विकत घेतले तर मी पून्हा खर्चिक दिसेल...

  अनुयाने थोडा वेळ विचार केला....आणि मग तीने ग्रीटिंग वर लिहायला सुरुवात केली...

                 दोस्तो की महफिल मे
              एक अंजानासा चेहरा हमने ढुंढ लिया
               बस उसे दोस्त कहतेही
                 कुछ खास लगने लगा है |
                           हटेला :प्रज्वल

            मुद्दत हो गयी देखते देखते
             अब इश्क का समा छाने लगा
             कैसे ईस दिल को समझाए अब
              नशा चाहत का चढने लगा है |
                      हटेली :अनुया 


    देखतेही रहगये हम
         कुदरत का ये करिष्मा
          सोचो अगर जिंदगीमे मिला
           तो जीना जन्नत ही लगा
                     प्रज्वल

      जन्नत का तो पता नही 
      करिष्मा कुदरत का मेहसूस होगा 
          जिंदगी खूबसूरतसा एक नगमा 
        जब हमेशा तेरा साथ होगा
                  अनुया

जणू काही प्रज्वलला तीने एका जुगलबंदी स्वरूपात उत्तरच दिले होते....

तितक्यात रशीद स्टॉल वर गेला आणि त्या स्टॉल वरचे सगळे रेड रोज त्याने विकत घेतले....
क्रमश :
भाग 47 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या