नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
मैने तो रशीद को"नही " क्लिअर क्लिअर बोल दिया.. अब ये इतने सारे रेड रोज किसके लिए🤔.....यास्मिन विचार करतच रशीदच्या हालचाली बघत होती...
रशीदने फुलांचा बंच घेतला आणि तडक गीतिकाजवळ गेला... आणि तीला देत म्हणाला ये हसीन खुशबू एक सुंदर लडकी के नाम....
गीतिका रशीद कडे बघत😳 होती....
सायली : गीतिका!! बघतेस काय... तो तूला रोज क्वीन करत आहे... घेऊन टाक....
गीतिका : अगं असं कसं घेऊ...🤔
रशीद : खुबसूरती की कद्र करते है जनाब...इसे गलत मत समझना ...
ते ऐकताच गीतिकाने त्या फुलांच्या 🌹🌹बंच चा स्वीकार केला..
😳..रशीद ने दिया तो दिया🌹🌹 गीतिकाने ले भी लिया... लडके कैसे रहते है ना😡.... दो मिनिट भी नही लगे उसे यहा से वहा जाने मे...अच्छा हुआ मैने उसे" नही "कहा😏..... और सलमा बाजी कह रहे थे की रशीद अच्छा है 😏... जाने दो ऐसे लडके के बारे मे क्या सोचना....
यास्मिनचा नुसताच जळफळाट होत होता...
काश.. मै ईस रशीद को "हा" कह सकती... तो शायद रोज क्वीन मै ही बन जाती😒....
सायली : अभिनंदन गीतिका!!आता तूच रोज क्वीन होणार...
गीतिका : अगं सायली!!असं काही नाही... माझ्या पेक्षाही जास्त गुलाब🌹 अजून कुणाला तरी मिळू शकतात ना...
सायली : मला नाही वाटत..
अनुयाने दिलेले ग्रीटिंग, आणि फुल बघून प्रज्वल एकदम भारावून गेला.... अनुयाने तिच्या श्रीमंतीचे प्रदर्शन न करता प्रज्वलच्या मनाचा ठाव घेतला होता...
अनुया : प्रज्वल!!मला अशीच आयुष्यभर साथ देशील ना रे...
प्रज्वल : अनुया!! मी तर तयार आहे गं... पण आपल्यामध्ये आर्थिक तफावत असल्यामुळे जरा भीती वाटते गं...
अनुया : शू 🤫 ते काहीच नाही बोलायचं.... तसंही माझा डॅडा खूप समजूतदार आहे.... तो नक्कीच आपल्याला समजून घेईल.... त्या मुळे आता कुठलाही ताण ठेऊ नको...
प्रज्वल :😊... जशी आपली आज्ञा राणीसरकार 😉
चार वाजेपर्यंत कार्यक्रम चालला.... एका स्टॉल वरचे बरेचसे रेड रोज उरले होते....
अमित ने कार्यक्रम संपला असे जाहीर केले...
नेहा : कार्यक्रम संपला ना... आता मला हे रेड रोज विकत मिळू शकतील का??
विश्वास : ए चिमणे!!... ही फुले तशीच घेऊन जा... आता कार्यक्रम संपला ना...आता विकत घ्यायची गरज नाही...
नेहा : थँक्स विश्वास दादा 😊
अमित : नेहा!! तू चीफ गेस्ट शी बोलणार होती... बोलणं झालं का??
नेहा : हो हो चीफ गेस्ट एकदम वेळेवर पोहोचणार आहे... तरीही मी एकदा त्यांना रिमाइंड करते...
अमित : ok....
ब्रेक मध्ये सगळ्यांना रोज किंग /क्वीन कोण असणार याची उत्सुकता लागली होती...
ब्रेक संपला सगळेच जण टेन्ट मध्ये जमा झाले....
सगळ्यांचे आवडते दुबे सर आणि मोहिनी मॅम देखील स्टेज वर आलेल्या होत्या... तितक्यात चीफ गेस्ट ची एन्ट्री झाली...
सुस्वागतम, सर्वात धाडसी, या कॉलेज मधील सर्व मुलींना गीतेश सरांसारख्या वाईट माणसापासून वाचवण्यासाठी स्वतःचे उदाहरण सर्वांसमोर मांडून एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या श्रावणी मॅम चे अगदीच मनापासून स्वागत... नेहाने अनाऊन्स केलं....
काय 😳"श्रावणी " आणि आपल्या कार्यक्रमाची चीफ गेस्ट.. विश्वास स्टेज कडे बघतच बसला....
फिक्कट निळ्या रंगाची साडी,स्लीव्हलेस ब्लाउज, लांब सोडलेले सरळ मोकळे केसं आणि साईडला एक गुलाबी गुलाब... स्टेज वर पडणाऱ्या लाईटच्या प्रकाशात श्रावणी अजूनच मोहक दिसत होती... विश्वास तर तीला बघून पार कामातूम गेला.....
तितक्यात श्रावणी ने अनाऊन्स मेन्टला सुरुवात केली...
मैत्रीच्या विश्वात बघुयात कुणी जिंकली जास्त मने...
मैत्रीच्या राज्यात friendship queen आहे "नेहा ".👸.. सर्वांशी मिळून मिसळून राहणारी, धाडसी आणि कुणालाही तत्परतेने मदत करणारी अशी तीची ओळख झाली आहे....
तर friendship किंग म्हणून one and only " विश्वास "🤴ला ओळख मिळाली आहे... आज एका दिवसात त्याने बऱ्याच जणांच्या मनात घर केले आहे...नाव ऐकताच टाळ्यांचा गडगडाट झाला.....
परत श्रावणीने अनाऊन्समेन्ट करायला सुरुवात केली...
आणि आपण आता ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहात... प्रीतीच्या दुनियेत हिने मनाचा ठाव घेतला आहे तिचं नाव आहे " गीतिका " 👸आणि गीतिकाला सर्वात जास्त लाल गुलाबाची फुले दिले आहेत... रशीद ने....
😳... आखिर मे गीतिका को रशीद ने ही 😏... यास्मिन विचार करू लागली ...
श्रावणीने रोज किंग च्याअनाऊन्स मेन्टला सुरुवात अरे वा दोघेही फ्रेशर्सच... तर रोज किंग आहे "रोहन " आणि हे काय 🤔 रोहनला रोज किंग करणाऱ्या व्यक्तीने तिचं नावच लिहिलं नाही... ग्रीटिंग वर फक्त तुझीच वेल विशर असं लिहिलं आहे...
सायली :😳 रोहन चक्क रोज किंग🤴... कुणी केलं असेल 🤔
अनुया : सायली!!किती छान ना...रोज किंग आणि रोज क्वीन दोघेही आपल्याच जवळचे....
नेहा : अनुया!!सायली!! खरा क्लायमॅक्स तर आता पुढे आहे...
अनुया : अच्छा तो आपला प्लॅन 😉
श्रावणी : friendship किंग आणि क्वीन तसंच रोज किंग आणि क्वीन यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन.
आणि आता लास्ट but not least... असं म्हणत श्रावणीने नेहा ला आवाज दिला....
नेहाने तिच्या जवळ असलेला रेड रोजचा 🌹🌹बंच श्रावणीच्या हातात दिला....
माझ्या मनावर अधराज्य गाजवणाऱ्या, सगळ्यात हँडसम व्यक्तीला मी माझ्या मनाचा राजा म्हणून हा गुलाबाचा🌹🌹 बंच देत आहे. मला माहिती आहे की आता मी या कॉलेज ची विद्यार्थिनी नाही म्हणून तुमच्या स्टॉलची वेळ संपल्यावर घेतलेला हा बंच देत आहे... मला मात्र माझं प्रेम व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ वाटली आहे... माझा भूतकाळ पाहता त्या व्यक्तीने याचा स्वीकार करावा की नाही हे त्याने ठरवावे....
त्या व्यक्तीचं नाव आहे "विश्वास."...
नेहा : जा विश्वास दादा!! ही चांगली संधी आहे सगळं काही ठीक करण्याची....
विश्वास मात्र गोंधळून गेला होता....तो बघतच उभा राहिला....
तितक्यात प्रज्वलने ओरडायला सुरुवात केली... विश्वास.... विश्वास....
प्रज्वलचं ऐकून हळू हळू एक एक मुलाने ओरडायला सुरुवात केली...
विन्याने विश्वासला धक्का मारला... जा विश्वास... तिचं प्रपोजल accept कर... ते म्हणतात ना सुबह का भुला अगर श्याम को घर लौट के आये तो उसे भूला नही कहते....
त्या पुढे मात्र विश्वासला काहीच ऐकू आले नाही आणि श्रावणीचं प्रपोजल स्वीकारण्यासाठी तो स्टेजवर गेला...तिचं प्रपोजल स्वीकारताच टाळ्यांचा गडगडाट झाला आणि दोघांच्याही चेहऱ्यावर आनंदाची एक लकेर उमाटली😍😍😍....
क्रमश :
भाग 48 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या