आमच्यासारखे आम्हीच (भाग 48)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

आजचा दिवस म्हणजे विश्वास आणि श्रावणीच्या आयुष्यातील सुवर्णक्षरांत लिहून ठेवण्यासारखा दिवस होता...

आणि कॉलेजवासियांसाठी एक काहीतरी वेगळा अनुभव...

अगदी न भूतो न भविष्यती सगळ्यांना लक्षात राहील असा
विश्वास आणि श्रावणी यांचा रोज day साजरा झाला असला तरी पूर्ण कॉलेजच आनंदित झालं होतं....

प्रज्वल : अनुया!! बघितलंस का? प्रेम करावं तर असं...

अनुया : बरं बरं 😍😍

झाल्या प्रकाराने रोहन मात्र पूर्णपणे चक्रावून गेला होता... मी आणि रोज किंग🤔... मला तर विश्वासच बसत नाहीये...बरं लिहिणारीने तिचं नाव तरी लिहायला पाहीजे होतं ना... सायली तर नसेल ना... छे छे.. ती तर माझ्याकडे पाहतच नाही... असा विचार करत रोहनने अंदाज घेण्यासाठी मुलींकडे नजर फिरवली... पण सगळ्याच मुलींच्या नजरा रोहनवर खिळलेल्या होत्या... त्या मुळे रोहनने पुन्हा त्याची मान लाजून खाली केली....

खरंच रोहनला कुणी रोज किंग केलं असणार... तो काय ईतका हँडसम आहे का?? पूर्ण क्लासच्या मुलींमध्ये तीच चर्चा चालू होती...

Friendship/ rose day सेलेब्रेशन संपलं.... सगळेच जण आपापल्या रूम वर गेले....

अजून महिन्याचे दहा दिवस बाकी आहेत... त्यात होते नव्हते ते पैसे गावी गेलो म्हणून खर्च झाले.... आता मेस चे पैसे, कॅन्टीनचा खर्च कुठून द्यायचा.... पण काय करणार आपण ते पैसे खर्च नसते केले तर मिशन गीतेश ईतक्या लवकर यशस्वी झाले नसते.... प्रज्वलला टेन्शनही आलं होतं आणि मिशन गीतेश यशस्वी झाल्याने एक समाधान ही वाटत होतं.... जाऊदे आता राहिलेले दहा दिवस एक वेळ जेवण जेवायचं आणि रात्री पाणी पिऊन दिवस काढायचे असं प्रज्वलने ठरवलं....

रात्र भर विचार करत  या अडांगावरून त्या अडांगावर होत त्याला थकून झोप लागली...

दुसऱ्या दिवशी प्रज्वल कॉलेज ऑफिस समोरून त्याच्या क्लास मध्ये जात असताना त्याला ऑफिस क्लार्क ने आवाज दिला...

ऑफिस क्लार्क : प्रज्वल!! दोन मिन ईकडे ये...

प्रज्वल : काय?🤔

ऑफिस क्लार्क : हे घे तूझे हजार रुपये तूला परत...

प्रज्वल : 😳 काय झालं?राहू द्या की...

ऑफिस क्लार्क : नको लाजवूस रे... अरे प्रज्वल!!तूम्ही,मी दिलेली  माहिती कुठल्या कामासाठी वापरली हे माझ्या लक्षात आलं आहे...
आम्हाला देखील गीतेश सरांचा खूप राग यायचा.. ज्या ज्या वेळेस ते कुठल्याही मुलीला त्यांच्या जाळ्यात अडकवायचे तेव्हा...
मनापासून वाटायचं या माणसाला आपलं कॉलेजमधून  काढून का टाकत नाही... पण खरं सांगू का?आम्ही फक्त विचार करायचो... तूम्ही मात्र कृती करून दाखवली... असं समजा तुमच्या कृतीला माझा थोडा हातभार लागला.... प्लीज नाही म्हणू नकोस... नाहीतर मला पाप लागेल... हे घे तूझे पैसे तूला परत....

प्रज्वल : 😊 ठीक आहे...

खरंच आपलं मन साफ असलं की आपले सगळे प्रॉब्लेम आपोआपच सुटतात नाही का?🤔असा विचार करतच प्रज्वल त्याच्या क्लास मध्ये गेला...

रोहनने त्याच्या वर्गात प्रवेश केला... वर्गातील सगळ्या मुला मुलींनी टाळ्यांचा 👏👏गजर केला.... तितक्यात नेहा आणि गीतिकाने देखील वर्गात प्रवेश केला... पुन्हा एकदा टाळ्यांचा👏👏 गजर झाला... हे तिघेही अचंबित होऊन वर्गातील मुलांकडे बघू लागले...

विकी : तूम्ही असे बघताय काय? आपल्या एकट्या क्लास ने पूर्ण कॉलेज मधून बाजी मारली... किती मोठी गोष्ट आहे ती... आम्हाला तुम्हा तिघांकडून पार्टी पाहीजे.... हो की नाही... विकी जोरात ओरडला....

रोहन : बाय द वे विकी!! होतास कुठे तू....

विकी : काय करणार?? काही कामानिमित्त अचानक बाहेरगावी जावं लागलं....नाहीतर मीच रोज किंग झालो असतो... हो ना....

रोहन : हो ना... मला पण तसंच वाटतं....

झेंडू आणि रोज किंग 😂😂😂... सदा न कदा हवेत असतो तो....नेहा हळूच गीतिकाला म्हणाली....

विकी : रोहन!! पण तूला रोज किंग कुणी केलं रे?

रोहन : तेच नाही ना माहिती.... विकी तू स्वतःला जेम्स बॉण्ड म्हणतोस ना मग आता प्रूव्ह कर बरं.....

Yes बॉस.. असं म्हणत दोन बोटांचं पिस्तूल करून त्यावर फुंकर मारत विकी म्हणाला....पण ए रोज किंग विषय बदलू नकोस... नेहा!! गीतिका!!तूम्ही पण... आम्हाला तुमच्या विजयाची पार्टी पाहीजे... हो की नाही फ्रेंड्स...

हो... सगळ्यांनी विकीच्या प्रश्नाला उत्तर देत होकार दिला....

 हे आता एक नवीन संकट...नेहा हळूच गीतिका आणि रोहनला म्हणाली...

गीतिका : नाहीतर काय? मला तर कोण कुठला तो रशीद त्याने फुले दिली अन म्हणे मी पार्टी देणार...

तुमचं तर एकवेळ ठीक आहे.. मला तर माहितीच नाही हा प्रकार कुणी केला आहे ते.. अन आता ही पार्टी...

विकी : काय झालं रोहन??... No reply 🤔

नेहा : dear friends..... मला नाही वाटत की आम्ही तिघे मिळून देखील आपल्या पूर्ण वर्गासाठी पार्टीचा खर्च करू शकू....

विकी : कंजूस नेहा!!

गीतिका : ए विकी!! कंजूस कुणाला म्हणतोस 😡

विकी : मी तूला म्हटलो का??

गीतिका : त्याने काय फरक पडतो... पार्टी तर तू तिघांनाही मागत आहेस ना...

नेहा : गीतिका!! विकी !! मी काही बोलू का?

विकी : हूं बोला मॅम😏...

नेहा : तर फ्रेंड्स ऐका.... जर आपल्याला पार्टीच करायची असेल तर ती टी टी एम एम स्वरूपात करावी लागेल...

रोहन :टी टी एम एम म्हणजे 🤔

नेहा : तुझं तू आणि माझा मी... स्वतःचा खर्च स्वतःच करायचा....कारण मला नाही वाटत की आपल्या पैकी कुणीही कमवत असणार ... आपल्या आईवडिलांचे पैसे  आपल्याला अशाप्रकारे उधळण्याचा काहीच अधिकार नाही....

अंजली : कॅरेक्ट...

यास्मिन : सही कहा....

नेहा : काय विकी!! पटतंय का?

विकी : हं.... मग राहूच द्या....

नेहा : अरे तू तर पळवाट काढतो आहेस....फ्रेंड्स, पार्टी करायची तर आपण करू.. लवकरच.. आणि ती ही अगदीच कमी खर्चात...पण आता या क्षणाला तरी आम्ही आमच्या जागेवर बसू शकतो ना....

अंजली : हो....

नेहा आणि गीतिका त्यांच्या जागेवर स्थानापन्न झाल्या

यास्मिन : गीतिका!! एक बात पूछू??🤔

गीतिका : हां...

यास्मिन : रशीदने तूम को प्रपोज किया क्या??

गीतिका : नही रे... क्यूँ??

नेहा : क्या यास्मिन!! जलन 🔥🔥हो रही है क्या??

यास्मिन : जलन🔥🔥, मुझे??🤔 नही तो...

क्रमश :
भाग 49 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
    
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या