नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
यास्मिन च्या मनात चलबिचल तर होतच होती ..पण ती आता काहीच करू शकत नव्हती... तिच्या अम्मी अब्बू ने तिच्या मामाच्या मुलासोबत तिचं का फिक्स केले याचा क्षणभर रागही 😡येऊन गेला होता...
प्रज्वल : काय रोहन!!मग रोज डे च्या दिवशी सायलीला प्रपोज वगैरे केलं की नाही....
रोहन : नाही रे....प्रपोज केलं असतं तर मी तूला सांगितलं नसतं का?
प्रज्वल : पण का?नाही केलं
रोहन : अरे ती सायली!! नाकासमोर सरळ चालणारी मुलगी... आता नेमकीच कशीतरी friendship झाली आहे...पण प्रज्वल!! सायलीने स्वतःमाझ्या जवळ येऊन मला friendship बँड बांधला आहे.बरं का
प्रज्वल : ओ हो... मी बोलून बघू का? I mean अनुयाची मदत घेऊन...
रोहन : 😳 बाप रे... पण ती नाराज झाली तर...नको... नकोच...
प्रज्वल : बरं मग असं करतो.. Atleast तिच्या मनात काय आहे ते मी काढून घेतो मग तर झालं....
रोहन : हो चालेल... पण जरा सावध राहून.... फक्त सायली दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या...
प्रज्वल : बरं बाबा... बरं, रोहन!! काही थांगपत्ता लागला का??
रोहन : कसला??
प्रज्वल : अरे तू कॉलेजचा रोज किंग झाला त्याचा...
रोहन : नाही ना... मला तर काहीच कळत नाहीये...
तितक्यात विकी त्यांच्या रूम कडे पळत येताना दिसला....
रोहन पत्ता लागला... धापा टाकतच विकी म्हणाला...
रोहन : 😳 काय? कोण?
विकी : मला आधी पाणी दे...
प्रज्वल : हे घे पाणी... ईथे कॉटवर बैस... आणि आता निवांत सांग....
विकी : बघ मी म्हणालो होतो ना... मी जेम्स बॉण्ड 007 आहे म्हणून.... दोन बोटांची पिस्तूल करत विकी रोहनला म्हणाला....
रोहन : विकी!! बस कर बरं आता जास्त ताणू नकोस...
विकी : "अंजली " अंजली ने तूला रोज किंग केलं...
रोहन : काय 😳... पण ते कसं शक्य आहे...
विकी : का शक्य नाही... मी पण जर दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे ऐकले असते तर माझाही विश्वास नसता बसला.. पण मला स्वतः अंजलीने संगितलं...
प्रज्वल : 😳कहानी मे twist...
विकी : twist म्हणजे...
प्रज्वल : अं... काही नाही.... जरा आश्चर्य वाटलं....बरं अंजलीने काय सांगितलं..
विकी : अंजलीने तूला ऍडमिशनच्या दिवशी पहिल्यांदाच बघितलं... तेव्हापासून तू तीला आवडतोस.... तू तीला फॉर्म भरण्यासाठी तीला पेन मागितला होतास ना अगदी तेव्हापासून... ती मला म्हणाली... मला त्याचा वेंधळेपणा खूप आवडला.... त्याचं घाई घाईत ऍडमिशन साठी येणं काय...नी त्याचे डोकमेंट्स सगळे व्यवस्थित जमावलेले नव्हते... ऐनवेळी ते जमवणं आणि पेन विसरणं सगळं काही...
ते ऐकताच रोहन मटकन कॉट वर बसला.... देवा!! आता हे काय नवीन संकट🤦♂️
विकी : रोहन!! असं शॉक लागल्यासारखं काय करतोस...
मी तूझ्या जागी असतो तर आनंदाने नाचलो असतो... अंजली काही दिसायला वाईट नाही...
रोहन : अरे विकी!!काही ही काय बडबडतोस?
विकी : म्हणजे??🤔मी आता काय बडबडलो??
रोहन : मी काय अंजलीच्या दिसण्यामुळे शॉक नाही झालो.. पण मला आतापर्यंत एकदाही तसं काही जाणवलं नाही...आणि तीने मला अगदी ऍडमिशनच्या दिवसापासून लक्षात ठेवलं आहे..
विकी : हं.. ते मात्र खरं आहे...
तितक्यात विकीचा फोन 📳वाजला....
चला निघतो मी....😉 ओली पार्टी आहे...
प्रज्वल : गेला एकदाचा... रोहन!! आता तूच सांग... मी अनुयाला सायली बद्दल विचारू की कसं...
रोहन : हो हो... का नाही...
प्रज्वल : नाही..मला वाटलं तूझा विचार बदलला असेल 😉
रोहन : असा कसा विचार बदलेल...बरं ऐक ना मला थोडं बाहेर जाऊन यायचं आहे... मी जाऊन येतो....
प्रज्वल : ठीक आहे....
प्रज्वलने अनुयाला फोन 📳लावला...
अनुया : हॅलो...
प्रज्वल : हॅलो अनुया!!माझ्या शायरी ला काय जबरदस्त उत्तर दिलेस गं तू😍😍....
अनुया : तुझ्याकडूनच शिकले🤩🤩...
प्रज्वल : हो का.. आम्हाला माहितीच नव्हतं...बरं अनुया!!काय म्हणतोय रोज डे...
अनुया : काही नाही... नेहा तर आधीच जमिनीवर आहे... गीतिकाला देखील विशेष आनंद झाला नाही...
प्रज्वल : आणि "सायली "?🤔
अनुया : सायलीचं काय.?..
प्रज्वल : तिच्या मनात नाही का कुणी...
अनुया : आतापर्यंत तर ती असं काही बोलली नाही... पण प्रज्वल!! तू आज हे का विचारत आहेस....
प्रज्वल : सहजच....
अनुया : मला नाही वाटत तू सहजच विचारत आहेस... तू रोहन साठी विचारत आहेस का??
प्रज्वल : 😳 तूला कसं माहिती??🤔
अनुया : 😊 त्याच्या वागण्यावरून समजतं ते....पण खरं सांगू का प्रज्वल!!सायलीच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही... पण मला नाही वाटत की ती अफेअर वगैरे करेल....
प्रज्वल : तरीही... तू अंदाज घेशील का प्लीज... पण तीला कळू देऊ नकोस...
अनुया : बरं मी बघते....
प्रज्वल : आणि अजून एक....
अनुया : काय??
प्रज्वल : शायरी जुगलबंदी तर झाली 😍😍 पण मला कधी ऐकायला मिळणार?😍😍
अनुया : काय 🤔... आम्ही नाही जा 😍😍.... तसंही मला तरी कुठे ऐकायला मिळालं??
प्रज्वल : हं इतकंच ना.... रोहन आला ठेवतो फोन....
अनुया : आता का? मला आताच ऐकायचं...
यास्मिन : अनुया!! मै अंदर आऊ क्या?
अनुया : यास्मिन आली.. मी फोन 📳ठेवते....
प्रज्वल : आता का? मला पण आताच ऐकायचं...
अनुया : हूं..
यास्मिन : प्रज्वल से बात कर रही हो 😉 चलने दो, चलने दो...मै बादमे आती हूं...
अनुया : अरे यास्मिन!!रुको मेरी बात हो गयी...
प्रज्वल!!बाय पुन्हा बोलू....
प्रज्वल : आता सुटलीस... नंतर सोडणार नाही मी...
अनुया : बरं... आता फोन 📳 ठेऊ??
प्रज्वल : ओके, बाय...
अनुया : बाय...
यास्मिन : अनुया!!मै बाद मे भी आ सकती थी |बाद मे मुझे गाली मत देना...
अनुया :अरे नही... हमारी तो बाते चलतीही रहेगी... तूम सुनाओ... तुमने हमे कैसे याद किया....
यास्मिन : मै तीन चार दिन के लिए मेरे घर जा रही हूं... मुझे क्लास वर्क भेजोगी ना... और updates देते रहना...
अनुया : यास्मिन!! ऐसे अचानक घर....
यास्मिन : अब्बू ने बुलाया है | पता नही अब आगे क्या होगा....
क्रमश :
भाग 50 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या