आमच्यासारखे आम्हीच (भाग 50)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

पता नही क्या होगा का मतलब??🤔

यास्मिन : अं... कुछ नही आने के बाद मै बताऊंगी... चलो चलती हूं बाय...

अनुया : बाय....

नेहा : यास्मिन खूप हताश वाटत होती... हो ना...

अनुया : हो... मलाही ते जाणवलं.... बरं नेहा!!ऐक ना... "सायली " रोहन मध्ये इंटरेस्टेड असेल का?

नेहा : मला नाही वाटत... पण का गं?? तूला असा प्रश्न का पडला?🤔

आता तुझ्यापासून काय लपवायचं असं म्हणत अनुयाने तिचं आणि प्रज्वलचं सायली बद्दल झालेलं बोलणं नेहाला सांगितलं....

नेहा : अच्छा... असं आहे तर... सायलीने स्वतःहून त्याला बँड बांधला का?..चल आपण तिला छेडून😉 बघू...

सायली आणि गीतिका त्यांच्या रूम मध्ये अभ्यास करत बसलेल्या होत्या...

नेहा : 😳 चक्क अभ्यास...

सायली : अगं काही नाही मी नुसतं पुस्तक चाळत बसले होते.. आपल्या कॉलेज मध्ये एकामागून एक कार्यक्रम चालू आहेत ना... सगळी link तुटल्यासारखं वाटत होतं...

नेहा : अगं सायली!!अभ्यासाचं ईतकं टेन्शन घेऊ नकोस... आता सध्या प्रोजेक्ट आणि सबमिशन महत्वाचे आहेत आणि सेमिस्टरच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पी.एल.😉 मिळते ना... ती पण चक्क एक महिना मिळते...

गीतिका : पी एल.. म्हणजे??

नेहा : पी एल..माहिती नाही?? पी एल म्हणजे प्रीपरेशन लिव्ह....

सायली : अच्छा... चक्क 😳एक महिना🤔...

नेहा : बरं सायली!!ऐक ना... तूला रोहन आवडतो का गं...

सायली : हो...

नेहा : 😳 काय...

सायली : अगं नेहा!!थांब थांब... लागलीच गैरसमज करून घेऊ नकोस.... रोहन मला as a friend आवडतो... चांगला वाटतो... पण काय कारण आहे काय माहिती... तो जरा मोकळा वागत नाही....

नेहा : कदाचीत त्याला तू आवडत असावी.. म्हणून तो मोकळा वागत नसेल....

सायली : असं असेल तर मग तो जसा आहे तसाच राहावं...

नेहा : अगं पण समजा त्याने तूला प्रपोज केले तर?🤔

सायली : ऑफ कोर्स मी नाही म्हणणार...

नेहा : अगं पण रोहन चांगला मुलगा आहे ना...

सायली : पण तू ईतकं ठाम पणे कसकाय विचारत आहेस... तूझ्या कानावर काही आलं आहे का?

नेहा : तसं नाही गं... त्याला तू आवडतेस हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं म्हणून विचारलं...

सायली : नेहा!! तूला सांगू का...
मला सध्या तरी अश्या भानगडीत पडायचे नाहीये...
मी तुम्हाला आधीपण एकदा सांगीतलं होतं..
परत एकदा सांगते... माझ्या आईवडिलांनी मला शिकण्यासाठी हॉस्टेल वर ठेवले तेव्हा माझ्या बऱ्याच नातेवाईकांनी माझ्या आईवडिलांचे कान भरण्याचा प्रयत्न केला....
मुलगी हॉस्टेलला शिकायला जाणार म्हणजे ती मनमानी कारभार करणार...
काय सांगावं ती एखाद्या मुलासोबत पळून पण जाईल.... काय करायचं शिक्षण?? बस झालं...
हिचे हात पिवळे करून टाका... तीला शिकायचं असेल तर तीचे सासरचे शिकवतील...
त्या वेळी माझ्या आईने माझ्या बाजूने स्टॅन्ड घेतला... ही माझी मुलगी आहे... तिचा नंबर मेरीट नुसार लागला आहे.. ती स्वतःच्या पायावर उभी राहिल्या शिवाय मी काही तिचं लग्न करणार नाही..... माझा तिच्यावर संपूर्ण विश्वास आहे...

नेहा : हो तू म्हणाली होतीस...

सायली : नेहा!! आता तूला माहिती आहे का??🤔 तेच नातेवाईक सध्या माझं उदाहरण देत आहेत... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर मी काही चुकीचं वागले तर ..माझ्या नात्यातील कुठलीही मुलगी पुढे शिकणार नाही...

नेहा : हं... तुझं अगदी बरोबर आहे...पण मग रोहन गं... समजा त्याने तूला विचारलं तर...

सायली : देव करो... त्याने मला असलं काहीच विचारू नये... तसंही माझं  सगळं क्लिअर आहे...

अनुया देखील शांतपणे सायली काय म्हणते ते ऐकत होती....

विश्वास आणि विन्याचा कॉलेज मधला उपद्रव आता थांबला होता....खूप दिवस झाले कॉलेज मधून काही बोलावणे आले नाही म्हणून चक्क इन्स्पेक्टरच कॉलेज मध्ये अंदाज घेण्यासाठी आले...

इन्स्पेक्टर साहेब!!आता तुमचे एक काम कमी झाले... तुम्हाला आमच्या कॉलेज मध्ये चक्कर मारायची गरजच नाही....असं म्हणत दुबे सरांनी विश्वास आणि त्याची गँग आता चांगल्या कामात सक्रिय झाले आहेत.. आणि आता त्यांच्याविरुद्ध आमची काहीच तक्रार नाही हे दुबे सरांनी इन्स्पेक्टरला सांगितलं....

दुपारची वेळ होती इंटरमिशन नंतर चौघीही कॉलेजच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या.... तितक्यात एकदम धपकन आवाज आला... कुणी तरी खाली फरशीवर पडल्याचा आवाज होता... आवाजाच्या दिशेने चौघीही धावल्या....

अनुया : अरे ही तर सलमा दीदी आहे... ती कसंतरी  करत आहे...

नेहा : अगं तीला भुरं आलं आहे... चला तीला लवकर  हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल...

सायलीने हॉस्टेलच्या बाहेर असलेल्या ऑटो वाल्याला ताबडतोब फोन लावला.....

सलमा आता शांत झाली होती... अर्धवट शुद्धीवर आलेल्या सलमाला कसं बसं सावरत चौघीनी हॉस्पिटल मध्ये नेलं...

सलमाने नेहमी चालू असलेल्या गोळ्या घेतल्या नव्हत्या म्हणून तीला हा त्रास झाला होता.. डॉक्टरने सलमा ला ऍडमिट करून घेतलं...तीला सलाईन आणि इंजेक्शन दिलं गेलं...चौघींची खूप धावपळ झाली....

नेहाने सलमाच्या घरी फोन करून सांगितल्यावर तीचे पुण्यातील नातेवाईक हॉस्पिटल मध्ये येईपर्यंत चौघीनाही हॉस्पिटल मध्ये थांबावे लागले...

सायली : बापरे 😳 रात्रीचे नऊ वाजून गेले....इथल्या धावपळीत लक्षातच नाही आलं....

अनुया : आता आपलं काहीच खरं नाही..... हॉस्टेल बंद झाले असणार 😒

नेहा : आणि मेस ही😒...

गीतिका : आतापर्यंत काही जाणवत नव्हतं पण हॉस्पिटलच्या बाहेर आल्या आल्या खूप भूक लागली आहे..

नेहा : ते समोर बघा... पावभाजी स्टॉल आहे... तिथून पावभाजीचे पार्सल घेऊन जाऊ....

सायली : तू पार्सल सांग तोवर मी ऑटो बोलावते.... योगायोगाने दुपारचा ऑटो त्यांना मिळाला....

चौघी जणी हॉस्टेलच्या जवळ गेल्या...पण ज्याची भीती होती तेच झाले होते...

 हॉस्टेलचे gate बंद झाले होते...

तरीही कारण सांगितल्यावर रेक्टर मॅम आपल्याला हॉस्टेलमध्ये एन्ट्री देतील असा विश्वास चौघीनाही वाटत होता...

चौघीही हॉस्टेलच्या gate जवळ गेल्या... तिथे उभ्या असलेल्या watchman ने परमिशन स्लिप बद्दल विचारलं...

पण या चौघीना परमिशन स्लिप असा काही प्रकार माहितीच नव्हता....

क्रमश :
भाग 51 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या