आमच्यासारखे आम्हीच (भाग 51)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

नेहा :परमिशन स्लिप म्हणजे काय??

वॉचमन  :  तुम्हाला हॉस्टेल ला उशीर होणार  होता  म्हणून तुम्ही रेक्टर मॅम ची परवानगी घेतली होती का?

नेहा : नाही...

वॉचमन :मग आता तुम्हाला रेक्टर मॅम ला भेटावं लागेल...

वॉचमनने फोन करून रेक्टर मॅमना बोलावले....

रेक्टर मॅम : तुम्ही चौघीही.... आणि ईतका उशीर... जरा वेळेचं भान ठेवायचं ना😡....

नेहाने त्या चौघीनाही हॉस्टेलला परत यायला उशीर का झाला याचे स्पष्टीकरण दिले...

रेक्टर मॅम : पण तरीही तुमच्याकडे फोन📳 होताच ना... तुम्ही मला एखादा मेसेज किंवा फोन करूच शकत होता ना.😡....

सॉरी मॅम... चौघीही एकसुरात म्हणाल्या....

आता माझी बिलकुल इच्छा नसताना तुम्हाला आपल्या हॉस्टेलच्या वॉर्डन कडे जावे लागणार आहे....असं म्हणून रेक्टर मॅमने चौघीनाही वॉचमन सोबत वॉर्डनकडे पाठवलं....

चौघीनींही आतापर्यंत वॉर्डन सरांना कॉलेजच्या ऍडमिशनच्या दिवशीच पाहिले होते....

यांचा वॉर्डन म्हणजे अंदाजे 55 वर्ष वय मोठा रागीट😡 दिसणारा चेहरा आणि झुबकेदार मिश्या.

वॉचमनने वॉर्डन सरांच्या घराची बेल वाजवताच कोण आहे रे?अश्या भारदस्त आवाजातच दरवाजा उघडला...

वॉचमन : सर!!आज या चौघीही हॉस्टेल गेट बंद झाल्यावर  आल्या आहेत....

वॉर्डन : हं 😡... तुम्हाला काय नऊ वाजेपर्यंतचा वेळ पुरत नाही का?.... की संध्याकाळचा पिक्चर बघण्यासाठी गेले होते का?😡...

नेहा : नाही सर....

तितक्यात काहीतरी कामानिमित्त माने सर देखील वार्डनला भेटायला आले....या चौघीना पाहून अचंबित झाले..


माने : हूं उशिरा आल्या वाटतं🤔... अरे तुम्ही चौघी तर माझ्या दुपारच्या लेक्चरला देखील दिसल्या नाही 🤔 ...

गीतिका :हो सर!!आम्ही तुमचं लेक्चर अटेंड करायलाच निघालो होतो... पण तितक्यात सलमा दीदी ला भुरं आलं नी आम्ही तीला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो...

ते ऐकताच वॉर्डन अजूनच चिडले....खोटं बोलू नका😡... तुम्ही लोकं कॉलेज बंक करून पिक्चर बघायला जाता... हॉटेल मध्ये जाता, बॉयफ्रेंड बरोबर फिरता आणि मग उशीर झाले की असली कारणं सांगता 😡 थांबा आता उद्या तुमच्या पालकांनाच भेटायला बोलावतो....

नेहा : सर!! तुम्ही बोलवायचं तर बोलावू शकता... पण आम्हाला खरंच उशीर सलमाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यामुळे झाला आहे.

वॉर्डन :तसं असतं तर तुम्ही फोन 📳करून सांगू शकला असता...

नेहा : सॉरी सर... आमची खूप धावपळ झाली... त्या धावपळीत फोन 📳करण्याचं लक्षच नाही राहिलं...

वार्डन : हो का तू  तूझ्या घरी असंच वागतेस का?
आई वडिलांना फोन 📳करून सांगतेस ना.... ते काही नाहीही तुम्हाला ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे... या पुढे तुम्हाला नऊ वाजल्यानंतर पाच मिनिटही उशीर होणार असेल तर माझ्या आणि रेक्टर च्या सहीची परमिशन स्लिप तुमच्या जवळ असायला हवी... समजलं ना😡....

चौघीनींही होकारार्थी मान हलवली....

वार्डन : आता तुम्ही जाऊ शकता... पण मी तरीही उद्या सकाळी फोन 📳लाऊन तुमच्या पालकांना सांगणार आहे.... समजलं...

चला गं पोरींनो असं म्हणून वॉचमन चौघीना सोबत घेऊन हॉस्टेलच्या गेट कडे आला...

सायली : कुठे मला वाटलं होतं की आपलं कौतुक होईल... पण कौतुक तर सोडा पण आपल्याला शिव्या खाव्या😏 लागल्या...

गीतिका : नाहीतर काय... कुणाचं काहीच चांगलं करण्याचा लाग नाही 🙄

नेहा : पण काय करणार??🙄 आपण त्या सलमाला असं सोडून तर जाऊ शकत नव्हतो ना ....

अनुया : नाहीतर काय?? म्हणे पिक्चर बघायला जाता..वेळ न पाळता दुसऱ्या मुली जात असतील🙄....पण आता हे सर आपल्यालाच बोलले....

तितक्यात चौघीही हॉस्टेलच्या गेटजवळ पोहोचल्या...

वॉचमन : तुम्हाला मस्टर वर सही करण्यासाठी रेक्टर मॅम📳 च्या ऑफिसला जावं लागणार...

अनुया : आणि आता काय 🥺... अजून बोलणे ऐकावे लागणार वाटतं... आज सकाळी सकाळी कुणाचं तोंड पाहिलं होतं कोण जाणे?🤔

रेक्टर मॅम : आलात का? या... बसा....

चौघीही ऑफिस मधल्या बाकावर बसल्या...

रेक्टर : वॉर्डन सर काय म्हणाले??

अनुया : काही नाही आम्हाला झापलं 🙄

गीतिका : हो ना आम्ही उलट इमर्जन्सी मॅनेज केली... त्याचं कौतुक तर केलं नाहीच... पण आम्हाला वॉर्निंग दिली... आणि आमच्या पालकांजवळ कंप्लेंट करणार आहेत... आमचं तर ठीक आहे.. पण सायली, सायलीच्या आईवडिलांना काय वाटेल 🤔

रेक्टर : तुम्ही सलमाला अगदी योग्य वेळेवर दवाखान्यात नेलं.. ते कौतुकास्पद आहेच...पण तरीही तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुमची यात काहीच चूक नाही...

नेहा : म्हणजे??🤔

रेक्टर : म्हणजे.... मी आता जरा स्पष्टच बोलते.... तुम्ही सलमाला हॉस्पिटल मध्ये नेलं ऍडमिट केलं तीचे नातेवाईक येईपर्यंत तीची सेवा केली हे सगळं मान्य...पण तुम्हाला एकीलाही मला किंवा कुठल्या सरांना कळवावं असं का  नाही वाटलं ?तूमची काहीच जबाबदारी नाही का?? तुमचे आईवडील आमच्यावर विश्वास ठेऊन तुम्हाला आमच्या हाती सोपवतात... मग आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा कसा जाऊ देऊ....
गीतिका!! तूच मला आता सांग जर समजा हीच गोष्ट कळंबोलीला घडली असती तर तू काय केलं असतं...

गीतिका : हो मी मम्मा नाही तर पप्पाला उशीर होईल म्हणून सांगितलं असतं...

रेक्टर : मग तेच ईथे का नाही केलं??

गीतिका : सॉरी मॅम

रेक्टर :या असं आधी घडलेलं आहे म्हणून आम्ही जरा सावधगिरी बाळगतो... मुली खोटं बोलून बाहेर मुक्कामी रहात होत्या. आणि एक दिवस ते उघडकीस आलं... चक्क आमची फसवणूक झाली.... तेव्हापासून आम्ही खूप स्ट्रिक्ट राहात आहोत ...खरं तर मी तुम्हाला माझ्या स्तरावर मॅनेज करू शकले असते.. पण जबाबदारीची जाणीव करून देणं हे माझं काम होतं म्हणून मी तुम्हाला वॉर्डन सरांकडे पाठवलं होतं...

नेहा : हो मॅम!!आता आम्हाला समजलं... आमची चूक झाली... या पुढे असं नाही होणार...

हो मॅम... अनुया आणि सायली एकसुरात म्हणाल्या....

रेक्टर : गूड... जा आणि लवकर पावभाजी खा... तुम्हाला खूप भूक लागली असेल ना...

नेहा :😳 तुम्हाला कसं...

रेक्टर : 😄अगं ईतका घामघमाट सुटला आहे की...

ठीक आहे मॅम येतो आम्ही असं म्हणून चौघीही गीतिका च्या रूम मध्ये गेल्या....
क्रमश :
भाग 52 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
 :
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या