आमच्यासारखे आम्हीच (भाग 54)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

रेक्टर मॅम ने घेतलेली मिटिंग संपली... सगळ्या जणी आपापल्या रूम वर गेल्या....

सायली : नेहा!! मला एक कल्पना सुचली आहे. आपण जर ताराची भेट घेऊन एक स्किट तयार केलं तर...

गीतिका : अगं पण ती आपल्या ओळखीची नाही.. ती आपल्याशी बोलेल याची काय गॅरेंटी??

नेहा : का नाही बोलणार... आपण जर श्रावणी मॅम ला एका भेटीत बोलायला लावलं तर तारा ला का नाही....सायली!!स्किट ची आयडिया छान आहे.... आणि तारा सोबत नेमकं काय घडलं हे देखील आपल्याला कळेल...

अनुया : आणि तो ट्रेझर हंट काय प्रकार आहे गं....

नेहा : अनुया!! अगं तो गेम नाही का?? तु ते झी मराठी वरचं होम मिनिस्टर पाहिलं का कधी... आदेश बांदेकरचं....

अनुया : हो....

नेहा : त्यात ते अन्नपूर्णा ची मूर्ती शोधण्यासाठी काही क्लू ठेवतात ते...

अनुया : अगं नेहा!! ते मला कळालं होतं... पण आपल्या हॉस्टेल वर हा गेम फार विशिष्ट पद्धतीने खेळला जातो म्हणे... त्यात मनोरंजन तर होतेच पण काहीतरी महत्वाची माहिती मिळते.

नेहा : हो का?😳

अनुया :हो....

अंजली ने रोहन ला फोन 📳लावला

अंजली :हॅलो रोहन!! मी अंजली...

रोहन : बोल अंजली काय म्हणतेस?

अंजली : आज कॉलेज सुटल्यावर कॅन्टीन मध्ये येशील का? मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं....

रोहन : काय?

अंजली : आपण भेटून बोलू...चल ठेवते फोन 📳 बाय...

रोहन : बाय...

अंजली आपल्याला प्रपोज करणार याचा अंदाज रोहन ला आला.....

रोहन : प्रज्वल!! तुझं आणि अनुयाचं सायली बद्दल बोलणं झालं का?

हो रोहन!! सायलीच्या मनात सध्या फक्त अभ्यास आहे. असं सांगून सायली,नेहा आणि अनुया ला काय बोलली हे प्रज्वलने रोहनला संगितले...

रोहन : अच्छा... असं आहे तर🤔....

प्रज्वल : रोहन!! तूला आता अंजलीचा फोन 📳आला होता ना....

रोहन : अं... हो...

प्रज्वल : कदाचीत ती तुला प्रपोज करणार असेल...

रोहन : जर विकी खरं बोलत असेल तर तसं असू शकतं...

प्रज्वल : मग तू  तीला होकार देणार की नकार... हे बघ सायली काय तूझ्या आयुष्यात येईल असं  मला तरी वाटत नाही🙄... रोहन च्या मनात खरंच सायली आहे की तो टाईम पास करतो हे जाणून घेण्यासाठी प्रज्वल मुद्दाम तसं त्याला बोलला...

रोहन : आता सायली नाही म्हणते म्हटल्यावर अंजलीला होकारच द्यावा... हो ना....

प्रज्वल : अं... हो... बापरे 😳 रोहन किती लवकर बदलला. याला बदलायला  एक क्षण पण लागला नाही.

रोहन : काय हो म्हणतोस प्रज्वल!! तुला वाटतं का...की मी इतक्या सहजा सहजी बदलेल... सायलीला जर तिचं म्हणणं खरं करायचं असेल तर मी तीची इंजिनियरिंग पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार आहे.. आणि अंजली बद्दल म्हणशील तर जी व्यक्ती माझ्या मनातच नाही त्या व्यक्तीला मी होकार देऊन काय करू... सायलीशी नुसतं बोलताना देखील मला जो आनंद मिळतो तो आनंद मला अंजली सोबत राहून मिळणार आहे का,?...

प्रज्वल : मला तेच बघायचं होतं😍... पण तूझ्या प्रेमाच्या कॉन्सेप्ट अगदी क्लिअर आहेत... गूड...

रोहन : 😊 त्याला नाव अफेअर जरी असलं तरी खऱ्या अर्थाने मला सायली आवडतेच 😍की....

प्रज्वल : बरं बाबा!!कळलं😊...

कॉलेज कॅम्पस मध्ये नेहा आणि विश्वासची भेट झाली 

विश्वास : ए चिमणे!!

नेहा : विश्वास दादा!! कुठे गायब झाला आहेस?आता काय बाबा 🤔श्रावणी वहिनी मुळे बहिणीला विसरून गेला आहेस ...

विश्वास : श्रावणी वहिनी 🙄 ईतक्या लवकर??

नेहा : आज काय,नी उद्या काय ती माझी वहिनी होणार आहेच ना....

विश्वास : हो... पण आता आधी फायनल एक्साम... मगच बाकी सगळं...

नेहा : अरे वा दादा!! श्रावणी वहिनी मुळे मला तुझं अपडेटेड व्हर्जन बघायला मिळत आहे.😉 खरंच प्रेमात माणूस ईतका बदलतो?🤔

विश्वास : काय करणार?? कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना...🙄 आता चिमणी सारखी बहीण आणि श्रावणी सारखी प्रेयसी हवी असल्यावर गुंडगिरी सोडावी लागणार ना...

नेहा : बरं विश्वास दादा!! तूला ताराबद्दल काही माहिती आहे का? कदाचीत तुमची बॅचमेट असेल ना ती...

विश्वास : ताराला मी ईतकं ओळखत नव्हतो... पण काल जेव्हा तीची चर्चा ऐकली तेव्हा ओझरती आठवली... आधी आम्ही एकाच बॅच मध्ये होतो. पण नंतर ती पुढे गेली तीची फिल्ड ही वेगळी त्या मुळे नंतर असा काही संबंध नाही आला...

नेहा : बरं चल...निघते मी...लेक्चर ची वेळ झाली....

कॉलेज सुटले.... रोहन कॅन्टीन कडे निघाला... रोहन अनिच्छेने कॅन्टीन मध्ये जाऊन बसला...

तितक्यात कॅन्टीनमध्ये अंजली देखील आली...

अंजली : थँक्स😊....

रोहन : थँक्स कश्या बद्दल🤔...

अंजली : भेटायला आल्या बद्दल 😍..

रोहन : बोल... काय बोलायचं होतं??

अंजली : तूला विकीने सांगितलं आहेच ना...

रोहन : हे बघ अंजली!!तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल... उगाचच गैरसमज नको म्हणून म्हणतोय...

अंजली : रोहन!!are you interested in me? I mean do  you like me?

रोहन : हे बघ अंजली!! तू वाईट नको मानू.. पण मला आताच अश्या भानगडीत पडायचं नाही....आणि मी तुला कधीच अश्या नजरेने कधीच बघितलं नाही...

अंजली : मग बघ ना😍...मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर.. कॉलेजच्या ऍडमिशन च्या दिवशीच मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं.

रोहन : अंजली!! सॉरी....

अंजली : रोहन!! का रे तुला सायली आवडते का??सायली मुळे तु मला नकार देत आहेस ना..

रोहन : अंजली!! तसं काही नाही पण मला खरंच आता या भानगडीत पडायचे नाही...

अंजली : बरं ठीक आहे... पण मी आयुष्यभर तूझी वाट पाहायला तयार आहे...

रोहन : अंजली!!प्लीज तू खरंच माझा विचार नको करू...

अंजली : तू काहीही म्हण पण मी तुझी वाट पाहणारच...

अंजली रोहणचे  काहीच ऐकत नाही हे पाहून रोहनने चल निघतो मी असं म्हणून काढता पाय घेतला....

क्रमश :
भाग 55 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या