आमच्यासारखे आम्हीच (भाग 55)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

सुटलो बाबा एकदाचा, या अंजलीच्या तावडीतून असा विचार करत  रोहन त्याच्या रूमवर गेला.

प्रज्वल देखील रोहन काय बातमी घेऊन येईल हे  बघण्यासाठी रूमवरच थांबला होता..

रोहन : अरे प्रज्वल!! तू रूमवरच... बाजारात जाणार होतास ना...

प्रज्वल : हो... पण काय करणार?? तूझ्यात आणि अंजलीत काय बोलणं झालं हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला थांबवलं 😉

रोहन : विकीने संगितलं ते खरं आहे रे... अंजलीनेच मला रोज किंग केलं होतं...

प्रज्वल :अच्छा.. मग आज काय प्रपोज का??

रोहन : हो ना... प्रपोजच... तिला नाही म्हणताना वाईट वाटत होतं रे😒... ती खूप सिरियस झाली होती... तिला मी म्हणालो की मी तुला तश्या दृष्टीकोनातून बघितलं नाही... तर ती मला आता बघ असं म्हणाली....

प्रज्वल : 😳 बापरे... चांगली बोल्ड आहे रे अंजली मग...

रोहन : हं... पण मला जरा काळजी वाटते रे... देव करो,ती जास्त इन्व्हॉल्व्ह वगैरे झालेली नसावी.... तसंही माझ्या बाजूने मी कधी तिच्याकडे बघितलं देखील नव्हतं....

प्रज्वल : हं मग कशाला तीची काळजी करतोस??

रोहन : तसं नाही रे...तिथून निघताना मला ती म्हणाली मी आयुष्यभर वाट पाहील म्हणून....

प्रज्वल : 😳 अरे बापरे... 🤔रोहन!! अरे तो विकी पळत पळतच आपल्याकडे येत आहे बघ...

रोहन : अरे देवा!! आता हा विकी कसलं संकट घेऊन येत आहे काय माहिती🙄... हा विकी रूमवर येताना दिसला की मला धडकीच भरते...

विकी : रोहन!! येऊ का आत....

रोहन : बोल विकी!! आता काय बातमी आणली आहेस 🤔

विकी : बातमी नाही, ब्रेकिंग न्यूज आहे... पण 🤔 तुला कसं माहिती की मी काही बातमी आणली आहे म्हणून...

रोहन : तू असं धावत पळत तेव्हाच येतो जेव्हा एखादी बातमी तुला द्यायची असते....सांग काय ब्रेकिंग न्युज  आहे??

विकी : न्युज सांगण्या आधी,तुला मी थँक्स म्हणतो....

रोहन : थँक्स.🤔 कश्या बद्दल??

विकी : तू अंजलीला नकार दिल्याबद्दल....

रोहन : म्हणजे??🤔

विकी : तू तिला नकार दिला की लागलीच तीने मला होकार दिला....आमचं जमलं 😇😇

रोहन : 😳 काय??पण तू अंजलीला कधी प्रपोज केलं?

विकी : मग काय तर.... तू कॅन्टीन मधून निघून गेला...की मी अंजलीला कॅन्टीन मध्ये गाठलं...तिला विचारलं काय झालं??तीने तूझ्या नकाराबद्दल सांगितलं की मग लागलीच मी तिला विचारलं??आय मीन प्रपोज केलं अंजलीने लागलीच मला होकार दिला... आज संध्याकाळी आमची डिनर डेट पण आहे...

 😳 ग्रेट.... जाऊदे बरं झालं एकदाचा या अंजलीपासून पिच्छा सुटला....असा विचार करत रोहन म्हणाला...

विकी : चल निघतो मी... परत एकदा थँक 😍😍यू सो मच...

प्रज्वल : रोहन!! हे मी काय ऐकतोय?😂😂

रोहन : 😂😂 बघ आता तूच...

प्रज्वल : हे असं झालं मग... तू नही तो और सही आणि और नही तो और सही 😇😇😝😝

रोहन : पण काहीही म्हण... एकदम शॉकिंगच ना.... अगदी तासा भरा पूर्वी ती मला म्हणत होती की ती आयुष्यभर  माझी वाट पाहायला तयार आहे. आणि एका तासातच 😂😂

प्रज्वल : मग काय आयुष्यभर तीने तुझी वाट पाहायला हवी होती का??

रोहन : बिलकुल नाही.... अंजलीने जे केले ते कदाचीत योग्यच केले असेल....

प्रज्वल : कदाचीत म्हणजे??

रोहन : भावनेच्या भरात तीने काही चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणजे झालं....कितीही केलं तर मुली इमोशनल असतात रे...

प्रज्वल : रोहन!! किती साधा भोळा आहेस रे तू... मला सांग आपल्याला तूझ्या रोज किंग बद्दल तुला माहितीकुणी दिली??

रोहन : विकी ने....

प्रज्वल : कश्यावरुन त्या दोघांचं आधीच काही जमलं नसेल...

रोहन : असं पण काही असू शकतं का? मग तीला मला प्रपोज करायची गरजच काय होती...

प्रज्वल : ते नाही सांगता येणार... पण मला तर विकी आणि अंजली हे दोघेही बेरकी वाटतात... त्यांना न कुणाचं चांगलं व्हावं असं वाटतच नाही... अंजली त्या चौकडी सोबत देखील असेच खेळ खेळत असते... कदाचित तुला सायली आवडते हे अंजलीला माहिती असावं... आता माझं आणि अनुयाचं जमलं तिला वाटलं असेल कदाचित तुझं आणि सायलीचं जमेल....आणि तिला ते जमू द्यायचे नसेल तर....

रोहन : 😳 प्रज्वल!! हे ऐकून तर माझं डोकं गरगरायला😇😇 लागलं आहे...

प्रज्वल : आतापर्यंत अंजली त्या चौकडीशी जे काही वागली आहे ना त्यावरून मी हा अंदाज बांधत आहे....

रोहन :तसं असेल तर ते फारच खतरनाक आहे...

प्रज्वल : हूं... मला तर हे देखील वाटतं तुला जर ही चौकडी सोडून दुसरं कुणी आवडत असतं ना तर अंजलीने तुला
ना रोज किंग केलं असतं, ना प्रपोज....

अरे बापरे 😳 ... मला तर आता काय बोलावं तेच सुचत नाहीये....

प्रज्वल : जाऊदे... वाचलास तू.... आता त्या खुशीत मला फर्स्ट क्लास एक कट स्पेशल चहा पाज बघू....

रोहन : चहा काय... नाश्ता पण करवतो चल टपरीवर जाऊ....

यास्मिन गावाहून परत आली.... आल्या आल्या ती या चौघीना भेटायला आली.... चौघीही नेहा, अनुयाच्या रूम मध्ये गप्पा मारत अस्ताव्यस्त पहुडल्या होत्या....

अनुया : अरे यास्मिन!!तूम कब आए??

यास्मिन : अभी आधे घंटे पहले... जस्ट फ्रेश होके तुमसे मिलने आई हूं.... सलमा बाजी के बारे मे सुना मैने... थँक यू... आप सब उसे हॉस्पिटल लेके गये....

नेहा :अरे हा यास्मिन!!अब सलमा दीदी की तबियत कैसी है |

यास्मिन : अब पहले से बहोत बेहतर है |

गीतिका : यास्मिन!!रोज डे के दिन तुम्हे रशीदने प्रपोज किया था ना??🤔

यास्मिन :😳तुम्हे कैसे पता??नेहा ने बताया होगा... उसे मालूम था ना...

गीतिका : नही रे...रोज डे के दिन की बाते क्या छुपती है क्या?

यास्मिन : हा प्रपोज किया था... उससे पहले भी एक बार फोन पे प्रपोज किया था ... लेकीन मैने उसे रोज डे के दिन "ना" बोला ...

गीतिका : अच्छा तो फिर इसीलिये शायद उसने मुझे रोज क्वीन बनाया... अगर तूम उसे हा कहती तो शायद तूम बन जाती...

ते ऐकून यास्मिनच्या डोळ्यात पाणी आले🥺... तीने ते शिताफीने लपवण्याचा प्रयत्न केला....पण चाणाक्ष नेहाच्या नजरेतून ते काही लपले नाही.

क्रमश :
भाग 56 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या