आमच्यासारखे आम्हीच (भाग 56)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................


यास्मिन : अनुया!!थँक यू तुमने मुझे वक्त वक्त पर सब लेक्चर्स के बारे मे बताया... नही तो मै बहोत पीछे पड जाती....

अनुया : हा यास्मिन!!लेकीन तूम ऐसे अचानक घर कैसे चली गयी...

यास्मिन : सच बोलू??🤔 देखो किसी को बताना मत...

अनुया : 😳 क्या कुछ छुपाने की बात है क्या??

यास्मिन : मेरे मामा के बेटे के साथ मेरा रोका होने वाला था.... लेकीन वो इंडिया आया ही नही.... इसीलिये मै थोडा जल्दी वापस आ गयी....

अनुया : यास्मिन!!😳 तूम तो छुपी रुस्तुम निकली... तुमने हमे जाने से पहले ये नही बताया...

यास्मिन : क्या करू?? मुझे इतने जल्द फिक्स करना नही था |अच्छा हुआ वो नही आये...

नेहा :😳 नही आए... तूम तो अभिसेही आप हम करने लगे.......

यास्मिन: क्या करु?? मेरे अम्मी अब्बू ने बोला....

तितक्यात यास्मिनचा फोन📳 वाजला...

😳 उन्ही का फोन है |अब तक बात नही की और अब फोन 📳

असं म्हणून यास्मिनने रूमच्या बाहेर जाऊन फोन📳 घेतला... 

नेहा : किती लवकर यास्मिनचं  लग्न फिक्स करत आहेत ना...

गीतिका :हो ना 🤔... मला तर वाटतं तीला या मामाच्या मुलाशी लग्न करायचं नाहीये... तीला रशीद आवडत असणार...

नेहा : हं मलाही तसं जाणवलं...तू रोज क्वीन बद्दल बोलत होती ना तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते....

मामाच्या मुलाशी बोलून यास्मिन परत रूममध्ये आली. तिचा चेहरा खूप खुलला होता.... तिच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट तेज दिसत होतं....

गीतिका : अरे वा यास्मिन!!तुम्हारे मामाके बेटे ने ऐसी क्या बात कहदी की ये मुरझाया चेहरा अचानक खील उठा....

यास्मिन : 😊 कुछ नही...

नेहा : अगं गीतिका जाऊदे तिला आपल्याला सांगायचं नसेल.🙄..

यास्मिन : ऐसी बात नही है नेहा!!... अच्छा सुनो मै बताती हूं... मेरे मामा के बेटे को कोई और लडकी पसंद है | वो जल्द ही मेरे मामा मामी से उनके बारे मे बात करनेवाला है |इसीलिये वो दुबई से अभी नही आया था |

गीतिका : ओह...

यास्मिन : अरे गीतिका!!उलटा मै खूष हूं... क्यूँकी मै और मेरे मामा का बेटा अच्छे दोस्त है | और हम बढे भी तो भाई बहन जैसा.... दोनो को भी ऐसा रिश्ता मंजूर नही था |अच्छा हुआ वो atleast मामा को बोलने की हिम्मत कर रहा है |

गीतिका : अच्छा तो ये बात है | और,फिर रशीद....

 नही रे गीतिका!! ऐसा कुछ भी नही... यास्मिन एकदम लाजली 🥰🥰

नेहा : ओ हो... क्या बात है यास्मिन!! तूम तो शरमा रही हो...

 नही ऐसा कुछ भी नही असं म्हणून यास्मिन ने तिथून पळ काढला....

सायली : यास्मिनच्या मनात रशीद आहे हे आज स्पष्ट कळालं नाही का?

अनुया : हो तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं....

क्लास मध्ये दुबे सरांनी सेमिनार ची अनाऊन्समेन्ट केली...

दुबे सर : आता दर आठवड्यात शुक्रवारी एक  सेमिनार होईल... त्या साठी एक टॉपिक निवडायचा आहे....
या आठवड्यात एक मुलगा आणि आणि एक मुलगी सेमिनार प्रेझेंट करेल प्रत्येकाला तो प्रेझेन्ट करण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी मिळेल...

आणि हे सेमिनार आता ईथुन पुढे दर आठवड्याला होतील.....

मी या आठवड्यासाठी मुलींमधून अनुयाची निवड केली आहे तर मुलांपैकी रोहनची....

 सर मी पुढच्या वेळेस करते....अनुयाला बिलकुलच स्टेज करेज नव्हतं...त्या मुळे ती सेमिनार टाळण्याचा प्रयत्न करत होती...

दुबे सरांनी अनुयाच्या नकारावरून ते हेरलं आणि म्हणाले...अनुया!!मी आता या लिस्ट मध्ये बदल  करू शकत नाही...तुला सेमिनार प्रेझेंट करावाच लागेल तुझ्यासाठी हा टॉपिक फार सोपा आहे.....

अनुयाला आता शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता....पण मनातून तीला सेमिनार प्रेझेंट कसा करावा याची भयंकर भीती वाटत होती.....अनुयाला खूप टेन्शन आले होते...

अनुया : नेहा!! मी आता कसं करू?🤔 मला तर स्टेज वर गेलं तरी घाम फुटतो...

नेहा : अनुया!! सेमिनार आपल्याला आपल्या क्लासच्या मुला मुलींसमोर द्यायचा आहे... अगदी बिनधास्त बोलायचं त्याला काय घाबरतेस... हे बघ अजून अजून तीन दिवस बाकी आहेत... तूझ्या सेमिनार ची छान तयारी करून घेऊ मग तर झालं..

अनुया :हूं 

नेहा :हूं काय हूं,जस्ट चील...आता जरा चेहऱ्यावर स्माईल येऊ दे बरं....

अनुया कशी बशी सावरली पण तीचे टेन्शन काही जात नव्हते...

कॉलेज सुटल्यावर रोज अनुया आणि प्रज्वल भेटत असत पण सेमिनारच्या टेन्शन मुळे तिला प्रज्वलला भेटण्याचे भान देखील राहीले नव्हते...

प्रज्वल : अनुया !! काय झालं आहे आज?? तुला किती वेळापासून आवाज देत आहे मी...

प्रज्वल ला पाहताच अनुयाच्या डोळ्यात अश्रू तरळले 🥺

प्रज्वल : ए वेडे!!काय झालं?? एकदम डोळ्यात अश्रू वगैरे??

अनुयाने प्रज्वलला तिचा सेमिनारचा प्रॉब्लेम सांगितला...

प्रज्वल : अनुया!!तू सेमिनारला घाबरलीस??🤔 अगं मी तुझी तयारी करून घेतो... मग तर झालं.... आता हस बघू...😍😍



नेहा : बरं ऐका ना...हॉस्टेल डे च्या  स्किट साठी आपण ताराला कधी भेटायचं??

सायली : नेहा!!पण आपल्याला तिला भेटता येईल का??जर तीचे आईवडील तिच्या सोबत असतील तर मला नाही वाटत की ते आपल्याला भेटू देतील....

अनुया : हो आणि पहिल्याच भेटीत ती आपल्याला सगळं काही सांगेल याची गॅरंटी देखील वाटत नाही....

नेहा : बरं उद्या तिला भेटायला जाऊ... तुमच्या पैकी कोण येऊ शकेल...

सायली : या वेळेस मी येते....तसंही अनुयाला सेमिनार ची तयारी करावी लागेल... गीतिका!! तू अनुयाला मदत करशील....

नेहा : ठरलं तर मग... मिशन तारा म्हणजेच मिशन हॉस्टेल डे....

क्रमश :
भाग 57 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या