आमच्यासारखे आम्हीच (भाग 57)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

मिशन तारा आणि मिशन हॉस्टेल डे सुरु झालं...

एकदम असं कसं ताराला भेटायचं🤔 नेहाला काहीच सुचत नव्हतं....
नेहाने विश्वासला फोन 📳 लाऊन विचारलं....

विश्वास : चिमणे !! तू श्रावणीला सोबत घेऊन जा... श्रावणी आणि ताराची चांगली ओळख आहे... श्रावणीमुळे ती एका भेटीत तुमच्याशी बोलेल... मी श्रावणीला सांगून ठेवतो....उद्या तुम्ही सोबत जा....

नेहा : अरे वा... हे ईतकं सोपं होईल असं मला वाटलं नव्हतं पण विश्वास दादा!! हे तुझ्यामुळे आता शक्य होणार...

विश्वासला सांगून दुसऱ्या दिवशी ताराला हॉस्पिटल मध्येच  भेटण्याचा प्लॅन ठरला....

 अनुयाला सेमिनार साठी लागणारे मटेरियल प्रज्वलने गोळा केले.... आणि त्याचे पॉईंट्स मेसेंजर वर अनुयाला पाठवून दिले....

अनुया : हे बघ नेहा!! प्रज्वल ने मला सगळं सेमिनारचं मटेरियल पाठवलं....

नेहा : अरे वा अनुया!! प्रज्वलने ईतकं छान मटेरियल तयार केलं आहे जणू त्याचाच सेमिनार आहे...😉

अनुया : हो मग, आता त्याला मला झेलावं लागेल ना 😉
सोपं नाही या अनुयाला सांभाळणं 🙄..

नेहा :  हो ना,त्याला आमचं उदाहरण द्यावं लागेल...

अनुया : म्हणजे??🤔

नेहा : म्हणजे आम्ही तुला कसं संभाळतोय ते 

असं का?? अनुया लाडात येऊन नेहाला मारायला धावली.... आणि नेहा समोर अनुया मागे🏃‍♀️🏃‍♀️ अश्या त्यांच्या रूम च्या कॉरिडोर मध्ये धावत होत्या.....

रशीदने यास्मिनला जेव्हा फोन वर प्रपोज केलं होतं तेव्हा पासून सुरु झालेला यास्मिन च्या मनातील गोंधळ आता सुरु  झाला होता...

यास्मिनला नुकताच रशीद आवडायला लागला होता. पण आता नकार दिल्यानंतर त्याला कसं सांगायचं याचं टेन्शन यास्मिनला आलं...

यास्मिनच्या मनात कुठलाही गोंधळ उडाला की ती नेहाकडे जात असे.... तिच्याशी बोलल्यानंतर यास्मिन बऱ्यापैकी रिलॅक्स होत असे....

यास्मिन नेहाच्या रूमकडे निघाली तितक्यात तिला अंजलीने गाठले....

अंजली : यास्मिन!!रुको... कुठे चाललीस?🤔

यास्मिन : नेहा के रूम मे....

अंजली : क्यूँ??

यास्मिन : ऐसे ही... बोर हो रहा था |तो बात करने निकली...

अंजली : अच्छा... चलो मै भी चलती हूं... मलापण तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे...

यास्मिन : क्या बताना है |

अंजली :जरा धीर धर, मी तिथेच सांगते...

यास्मिन आणि अंजली,नेहाच्या रूम मध्ये आल्या....

अनुया : अंजली!! मी तूझ्या बद्दल काय ऐकलं???

अंजली : 😳बातमी  तुझ्यापर्यंत पोहचली पण...

अनुया : अश्या बातम्या लपत नाहीत... पण का गं अंजली!!तूझ्या वागण्यावरून कधीच वाटलं नाही तो झें... I mean तो विकी तुला आवडतो ते...

यास्मिन : क्या😳 विकी??

अंजली : हा विकी....अगं मी कधी म्हटलं मला तो आवडतो ते... त्याने मला प्रपोज केलं आणि मी त्याला हो म्हटलं ईतकंच... ना तो माझ्या बाबतीत सिरीयस आहे....ना मी त्याच्या बाबतीत सिरीयस आहे ...

अनुया : म्हणजे?? तुम्ही काय टाईम पास अफेअर करत आहात का?

अंजली : हो... टाईम पास अफेअर म्हणता येईल... मस्त फिरायचं खायचं प्यायचं आणि मग सोडून द्यायचं....

अनुया : टाईम पास अफेअर... विचित्र कन्सेप्ट आहे🤔.... पण मग विकीच का? अजून दुसरं कुणी मिळालं असतं की?

अंजली : जाऊ दे....आता त्याचा फायदा नाही....मी हो म्हणाले आता.... आज आमची डिनर डेट होती पण मध्येच त्या विकीला काय हुक्की आली त्याने ती पोस्टपोन केली...

अनुया : अंजली!! विकी ड्रिंक्स वगैरे करतो हे तरी तुला माहिती आहे की नाही....

अंजली : ड्रिंक्स किती कॉमन गोष्ट आहे🙄....तू असं म्हणतेस जसं की प्रज्वल बिलकुलच ड्रिंक्स करत नाही🙄...

अनुया : प्रज्वल ड्रिंक्स नाही करत... पण तू विकीची तुलना प्रज्वलशी का करतेस गं 😡....

अंजली :त्या प्रज्वल सोबत  तुझं पण तर टाईम पास अफेअर सुरु आहे ना .... 

अनुया :अंजली प्लीज... तू काहीही बोलू नकोस 😡 मी तूझ्या चांगल्यासाठी विकी बद्दल बोलत होते... पण मला काय माहिती तू त्याचा उलटा अर्थ काढशील.. तू तुझं टाईम पास काय चालू आहे ना ते तुझ्याजवळ ठेव...

  अनुया!! अगं तुला सेमिनारची तयारी करायची आहे ना ...तू त्या रूम मध्ये जा बरं...वातावरण शांत होण्यासाठी नेहा म्हणाली...

अंजली : मला ते पण एक कळत नाही... या दुबे सरांना तुमच्या विषयी ईतका पुळका का आहे?? उठ सुठ तुमच्या पैकी कुणाला तरी सिलेक्ट करतात....

अनुया : कदाचित त्यांना आम्हीच एलीजीबल वाटत असू😏..

नेहा : अगं अंजली!! दुबे सर म्हणाले ना की सेमिनार सगळ्यांनाच द्यावा लागणार आहे... मग ईथे पुळका येतो कुठे....

तितक्यात अंजलीचा फोन 📳वाजला...चला मी निघते... माझ्या हिरोचा फोन आला आहे 😉 अंजली तोऱ्यातच तिथून निघाली....

अनुया :हुश्श,गेली एकदाची अंजली.... या अंजलीला मध्ये मध्ये काय होतं कोण जाणे..... अंगात आल्यासारखं करते नाही...

यास्मिन : अंगात आल्यासारखं मतलब....

यास्मिनचा आवाज ऐकताच अनुया देखील भानावर आली.....आपण उगाचच यास्मिन समोर बोललो...असा विचार अनुया करायला लागली....

यास्मिन : अंजली और झेंडू ये कब हुआ....

नेहा : तुम्हे झेंडू मालूम है |😂

यास्मिन : हा अब तो ऊस विकीको  सभी झेंडू ही बोलने लगे... झेंडू और झेंडी 😂😂 क्या जोडी है |

अनुया : 😂😂😂 "झेंडी "क्या नाम रखा है |

नेहा : यास्मिन!!और सुनाओ आज हमे याद कैसे क्या किया....

यास्मिन : क्यूँ??याद कर नही सकती??🤔

गीतिका : याद तो कर सकती हो... पर लगता है ईस बार कुछ स्पेशल है |

यास्मिन : अब तूम लोगो से क्या छुपाना... मुझे रशीद अच्छा लगने लगा है | पर मै confused हूं....

गीतिका : confused?? वो क्यूँ??

यास्मिन : पता नही... पर अब शायद रशीद ही मुझे ना बोल दे.... उसके हिसाब से मैने बहोत भाव खाया है ना |इसीलिये....

क्रमश :

भाग 58 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या