नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
गीतिका : हो.. पण तूझ्या जागी कुणीही असतं तर तसंच वागलं असतं...
यास्मिन : हा ना.. मतलब मै,गलत नही थी ना....
नेहा : नही....
दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर लागलीच नेहा आणि सायली हॉस्पिटल मध्ये ताराला भेटायला गेल्या.
हॉस्पिटल मध्ये श्रावणी आधीच आली होती... श्रावणीने नेहा आणि सायली कशासाठी भेटायला आल्या याची कल्पना ताराला देऊन ठेवली होती.
पण तारा काही नेहा आणि सायलीला सांगण्यासाठी तयारच झाली नाही..
नेहा : श्रावणी मॅम ने तुम्हाला सांगितलं असेलच ना...
तारा : हो सांगितलं... तुम्ही माझ्या स्टोरी वर स्किट करणार आहे म्हणे... करा,माझी होती नव्हती बदनामी तुम्ही आपल्या हॉस्टेल वर करा....
नेहा : नाही हो तारा मॅम!! आमचा स्किट करण्याचा उद्देश म्हणजे पुढच्यास ठेच मागचा शहाणा.... आणि तसंही आम्ही जरी हे स्किट सादर करणार असलो तरी त्याला फक्त तुमच्या स्टोरीचा बेस घेणार आहोत.... तुमच्या नावाचा उल्लेख कुठेही येऊ देणार नाही.....
श्रावणी : अगं तारा!! Dont take it otherwise... तुला गीतेश सरांचं प्रकरण माहिती आहे ना.... त्या वेळेस जर मी या मुलींचं ऐकलं नसतं ना तर अजूनही त्या गीतेशचा कॉलेज मध्ये मन मानी कारभार चालू असता....
तारा : म्हणजे???
श्रावणीने ताराला मिशन गीतेश बद्दल सांगितले आणि या मुलींनी कसं ते अमलात आणलं ते देखील सांगितले....
तारा : बापरे 😳 या मुली म्हणजे अगदी डेरिंग बाज मुली आहेत तर🤔....
श्रावणी : हो... आणि त्या ज्या ठरवतात ते करण्यामागे त्यांचा हेतू देखील चांगला असतो....
ठीक आहे मग...सांगते मी असं म्हणत ताराने सांगायला सुरुवात केली....
मी जेव्हा थर्ड ईयर मध्ये गेले तेव्हा एका मुलाने मला प्रपोज केलं (सॉरी मी तुम्हाला त्याचं नाव नाही सांगू शकत,कारण कितीही केलं तरी आमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे).... सुरुवातीला मी खूप आधेवेढे घेतल्यावर मग त्याला होकार दिला.....
मग काय आमचा प्रेम प्रवास सुरु झाला.... आम्ही बेभान झालो.... दोघांनाही एकमेकांबद्दल तीव्र आकर्षण होते त्या मुळे दोघेही आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल काहीच विचार न करता आम्ही वागू लागलो... जणू काही आम्हाला नीती ची चाड च राहिली नव्हती....
कॉलेज बंक करून दूर दूर पर्यंत बाईकची राईड घ्यायचो...पिक्चर बघायला जायचो.... हॉटेलिंग करायचो.... पण सततच्या अश्या वागण्याने आमच्या अभ्यासावर आणि निकालावर परिणाम व्हायचा तोच झाला...
मला थर्ड ईयर ला केटी लागली.... त्यात आता कॉलेज बंक करण्यावर सुद्धा रिस्ट्रिक्शन येऊ लागले होते....त्यात हॉस्टेलचे नियम देखील कडक झाले होते...
त्या कारणामुळे मी माझ्या आई वडिलांशी खोटे बोलून हॉस्टेल सोडले आणि रूम केली .... हॉस्टेल सोडल्यावर मला आता कसलेच बंधन राहीले नव्हते... माझ्या बॉयफ्रेंड ला तर ते अजून चांगलं झालं...
मग काय,🤔 आम्ही दोघांनीही मर्यादा ओलांडल्या... आणि त्याचा परिणाम हा असा झाला... मला दिवस गेले.....दिवस गेलेले कळाल्यावर मी सैर भैर झाले... काय करावे काहीच सुचेनासे झाले....
माझा बॉयफ्रेंड मात्र निश्चिन्त होता... त्याला याचे काहीच देणे घेने नव्हते...
शेवटी त्याने मला ऍबॉर्शन कर असे सुचवले... फार्मसी वाल्या कडून काही गोळ्या आणून दिल्या. पण माझा गर्भ पडला नाही....
मग मी गुगल वर जाऊन सर्च केल्यावर काही आयुर्वेदिक औषधी वापरली.. काही चित्र विचित्र प्रयोग केले... परीणामी त्याचे इन्फेक्शन होऊन मला ताप यायला लागली... आणि एक दिवस मी जागीच चक्कर येऊन कोसळले... बरं झालं त्या वेळेस माझ्या रूमचा दरवाजा उघडा होता... घरमालकीनीने ताबडतोब मला ऍडमिट केले.....माझे आईवडील येईपर्यंत त्या माझ्या जवळ होत्या...
पण माझ्या ऍबॉर्शन बद्दल समजताच त्या देखील हॉस्पिटलमधून निघून गेल्या आणि माझ्या आईवडिलांना रूमचे भाडे भरायला सांगून रूम रीकामी करायला सांगितली....नाही नाही ते बोलल्या ....माझ्या आईवडिलांचा अपमान केला....माझे वडील तर निघून गेले....माझ्यासाठी आई माझ्या वडिलांच्या शिव्या खाऊन देखील थांबली...
पण आता मी स्थीर झाल्यावर माझे वडील मला घरात घेणार नाहीत...नातेवाईकांमध्ये देखील माझीच चर्चा आहे... मला कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही... असं म्हणून तारा ने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली....
नेहा : रडू नकोस गं तारा दी!! तुला हर्ट करण्याचा आमचा हेतू नव्हता....
तारा : पण आता हे ऐकून तुम्ही काय करणार??
नेहा : निश्चित असं नाही सांगता येणार...पण या स्टोरी वरून हॉस्टेलच्या बाकीच्या मुलींना सावध करता येईलअसं काही तरी करू ...
पण तारा दी!!तू काळजी करू नकोस...या मध्ये आम्ही कुठेच तूझ्या नावाचा उल्लेख करणार नाही....
तारा : नेहा!! मी तर म्हणते तू माझे नाव येऊ दे... त्या शिवाय तुमच्या स्किटला वजन येणार नाही....
नेहा : थँक्स दी 😳
तारा : अगं त्यात थँक्स कशासाठी?? तुम्ही श्रावणीची मदत घेऊन मिशन गीतेश यशस्वी केलं... तसंच मला ठेच लागली म्हणून बाकी मुलींना सावध करण्याचे काम मी करत आहे...
नेहा : चला आम्ही निघतो... स्किट चा व्हिडीओ तुम्हाला पोस्ट करेल....
तारा : हो मी वाट पाहीन....
अनुयाचं सेमिनारचं पाठांतर झालं होतं.... पण आता तिला भीती होती स्टेज ची.... प्रज्वल आणि गीतिका नी क्लास च्या रिकाम्या हॉल मध्ये अनुयाची स्टेजवर प्रेझेंट करण्याची प्रॅक्टिस करण्याचे ठरले....त्या मुळे अनुयाचं टेन्शन बऱ्यापैकी कमी झालं होतं ....
विकी आणि अंजलीच्या अफेअर ची चर्चा पूर्ण कॉलेज मध्ये पसरली होती...
क्रमश :
भाग 59 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या