नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
कॉलेजभर आपलीच चर्चा आहे याचा विकी आणि अंजलीला अभिमान वाटायला लागला होता🤨....
ज्या मुलामुलींनी अंजली आणि विकीला ओळखलं होतं ते त्या जोडीला अगदी समर्पक जोडी असं म्हणायला लागले होते.
तर जे कोणी त्या दोघांपैकी एकाला ओळखत होते ते त्याच्या पार्टनर साठी हळहळ व्यक्त करीत होते....
नेहाचं स्किट साठी प्लॅनींग सुरु झाली.... तर अनुयाची सेमिनारची जय्यत तयारी चालू होती.... प्रज्वल आणि गीतिकाने मिळून अनुयाची स्टेज वर छान प्रॅक्टिस केली होती....
शुक्रवार उजाडला सकाळपासूनच अनुयाच्या हृदयात धडधड होत होती....सेमिनार चांगला होईल ना असा विचार करत अनुयाने सकाळीच देवाची पूजा केली..
अब ये रशीद तो शायद मुझसे कभी बात नही करेगा.. हा ये ठीक रहेगा असा विचार करत यास्मिनने रशीदला गुडमॉर्निंग मेसेज केला....आणि त्याच्या रिप्लाय ची वाट पहात बसली . त्या साठी दर पाच मिनिटांनी ती तिचा मोबाईल चेक करत होती....
कॉलेज कॅम्पस मध्ये यास्मिन आणि चौघी सोबत जात असताना यास्मिनला समोर रशीद😍 दिसला.. त्याला पाहून यास्मिनचा चेहरा खुलला😊... हे काय 🤔🤫रशीद तर आपल्या कडेच चालत येत आहे... हं आता कळालं याने मला गूड मॉर्निंग मेसेज चा रिप्लाय का नाही दिला... कारण या रशीदला मला भेटून बोलायचं होतं...
हॅलो गीतिका!! गूड मॉर्निंग,कैसी हो...रशीद यास्मिनच्या जवळ येऊन गीतिकाला म्हणाला.....
गीतिका : गूड मॉर्निंग रशीद सर
यास्मिन : गूड मॉर्निंग रशीद 😊
रशीद : हं गूड मॉर्निंग....गीतिका!! फ्रेशर्स पार्टी तो कब की हो गयी तो अभी भी तूम मुझे "सर "क्यूँ बोल रही हो... सिर्फ रशीद ही अच्छा रहेगा ...
गीतिका : अच्छा ठीक है | रशीद
रशीद : साउंड्स गूड....
ये रशीद मुझसे कैसा बर्ताव कर रहा है | मुझे खाली रुडली गूड मॉर्निंग बोला और गीतिकासे कितना अच्छे से बात कर रहा है 😒,
उसे अब गीतिका पसंद आने लगी है शायद.. हं हो सकता है... वो गीतिका दिखने मे भी मुझसे ज्यादा सुंदर है | उसे रोज क्वीन क्या बनाया हर बार गीतिका गीतिका करते दिख रहा है |😏 यास्मिन रशीदच्या वागण्यामुळे परेशान झाली होती....
अनुया थोडी घाबरतच वर्गात पोहोचली... वर्गात तीने आजवर कधी नजर फिरवली नव्हती पण आज तीला तिचा वर्ग खचाखच भरला होता....बापरे😳 आज तर सगळेच हजर दिसत आहेत... देवा मला स्टेज वर सर्वांसमोर बोलण्याची शक्ती दे....
दुबे सर क्लास मध्ये दुबे सरांनी सर्वप्रथम रोहन ला सेमिनार प्रेझेंट करायला सांगितला... रोहनने अगदी निडरपणे सेमिनार प्रेझेंट केला... त्यात त्याला दिलेल्या विषयाचे प्रत्येक पॉईंट त्याने कव्हर केले होते. कुणाला प्रश्न विचारायला जागाच ठेवली नव्हती....
अनुयाचं मात्र रोहन काय शिकवतोय याच्याकडे लक्ष लागलं नव्हतं... फक्त सुरुवातीला रोहन किती निडरपणे सेमिनार प्रेझेंट करतो आपण पण अश्या प्रकारे करू शकू का अशी भीती तिला वाटत होती....
दुबे सरांनी अनुयाचं नाव घेतलं...
अनुया घाबरत घाबरतच स्टेज वर पोहोचली...
पण सेमिनार कशावर द्यायचा अनुया क्षणभरासाठी ब्लँक झाली.... तिला काहीच आठवेनासे झाले... तिला एकदम घेरी आल्यासारखे वाटले... पण तीने कसंबसं स्वतःला सावरलं...
अचानक शेवटच्या बेंच वर तिला प्रज्वल😍 बसलेला दिसला... त्याला पाहून तिचा चेहरा एकदम खुलला😊... आणि मग अनुयाने बोलायला सुरुवात केली... प्रज्वल आणि गीतिका कडे बघून जसा सराव तीने केला होता परत त्यांच्या कडे बघून तीने सेमिनार प्रेझेंट केला ... अनुयाने दिलेला सेमिनार अगदी रोहनने प्रेझेंट केलेल्या सेमिनारच्या तोडीस तोड होता....
अनुयाचं प्रेझेंटेशन संपलं आणि संपूर्ण क्लास मध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला...
टाळयांच्या गडगडाटामुळे अनुयाला समजून चुकलं की तिच्या सेमिनारचं प्रेझेंटेशन चांगले झाले आहे....
स्टेजच्या खाली उतरल्यावर सर्व मुलं आणि मुली अनुयाचं अभिनंदन करत होती....
अनुयाने नजरेनेच प्रज्वलला थँक्स 😍म्हटले....
गीतिका : अनुया!! किती छान बोललीस तू 😊अन म्हणे स्टेज करेज नाही... यावर कुणीतरी विश्वास ठेवेल का ....
सगळ्यांच्या कौतुकाने अनुया भारावून गेली होती
आणि मनात विचार केला खरंच आज गीतिका आणि प्रज्वल जर माझ्या आयुष्यात नसते तर माझे काय हाल झाले असते🤔....
यास्मिन : नेहा अब अपने को स्किट की तय्यारी करनी पडेगी ना... वो झेंडी को भी स्किट को लेना है क्या??🤔
नेहा : झेंडी 🤔 ओ अंजली...😂😂 यास्मिन!! झेंडी का वैसे कुछ मतलब नही निकलता... कुछ मतलब वाला नाम बोलो यार 😉
यास्मिन : पर क्या नाम रख सकते....मुझे तो कुछ सुझ नही रहा...
नेहाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली" फुलझडी " नाम कैसा रहेगा...
यास्मिन : "फुलझडी " 😂😂😂क्या नाम रखा है | वैसे भी वो झेंडू इतनी इर्रिटेटिंग नही है | एकदम करेक्ट नाम दिया है...
नेहा : यास्मिन सुनो अब हॉस्टेल जाने के बाद पहला काम स्किट को तय्यार करना... हम चार, तूम और फुलझडी मिलके स्किट करेंगे....
यास्मिन : ठीक है नेहा!!
अंजली : नेहा!!यास्मिन!! काय खुसूर फुसूर करता आहात गं🤔... जरा मला तरी कळू द्या...
नेहा : काही नाही... तुझं नामकरण करत होतो...
😳 अल्ला ये नेहा भी | इसे बिलकुल ही किसी बात का डर नही... यास्मिन विचार करत होती...
अंजली : माझं नामकरण?? ते कशाला😡... आणि काय नामकरण केलं
नेहा : अगं अंजली!!तू तर लागलीच चिडलीस.... आपल्याला स्किट करायचं आहे त्यातील तुला कुठले पात्र द्यावे याचा विचार करत होतो... त्या पात्राच्या नामकरणा बद्दल बोलते आहे मी....है की नही रे यास्मिन😉
यास्मिन : अं.. हा.. हा
क्या हुशार है ये नेहा!! झट से जबाब दे दिया 😳 यास्मिन नेहा कडे बघतच बसली...
क्रमश :
भाग 60 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या