आमच्यासारखे आम्हीच (भाग 60)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

सेमिनार छान झाल्यामुळे अनुया भयंकर खूष झाली होती..

हॉस्टेल वर हॉस्टेल डे सेलेब्रेशन ची तयारी सुरु झाली.....
सिनियर मुलींनी त्यांचा डान्स प्लॅन केला... तर नेहाने आणि सायलीने मिळून स्किट चे लिखाण सुरु केले...

सायली : नेहा!!आपण असं करू आपल्या स्किट ची सुरुवात ताराच्या कॉलेजच्या एन्ट्री ने करू...

नेहा : हो चालेल की... अंजली!!यास्मिन!! प्लीज तुम्ही पण काही तरी सुचवा....

अंजली : आपण स्किट मध्ये हिंदी,मराठी पिक्चर च्या गाण्यांचा समावेश करू....

यास्मिन : हा ये सही रहेगा... हम तारा की स्टोरी पुरे गानो मे बया करेंगे....

सायली : एकदम छान आयडिया आहे...

अंजली : आपण काय करू उद्या या वेळेला पुन्हा भेटू तो पर्यंत आपण सहाही मुलींकडे वेळ आहे... प्रत्येकाने ताराच्या बाबतीत  जे जे घडले त्या त्या इव्हेंट वर कुठले गाणे सुचत असतील ते लिहून काढा... आणि उद्या आपण त्याची जुळवा जुळव करू... तत्पूर्वी नेहा आणि सायली तुम्ही ताराला भेटून तीची स्टोरी ऐकली म्हणे....

नेहा : हो....

अंजली : मग ती स्टोरी आम्हाला सविस्तर सांगा म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला गाणे ठरवता येईल....

अनुया : हो गं नेहा!! मी पण सेमिनार च्या टेन्शन मुळे ताराची स्टोरी ऐकली नाही....

नेहा ने आणि सायलीने ताराची संपूर्ण स्टोरी सगळ्यांना सांगितली....

अनुया : बापरे 😳 किती भयंकर.... खरंच माणूस एकदा वाहवत गेलं की वाहवातच जातं नाही का??

सायली : म्हणून मला वाटतं की आपण आता अश्या भानगडीतच नको पडायला....म्हणजे ईतके complications होतच नाहीत.... तसंही आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकायला ठेवलेलं असतं ना... त्यांचा विश्वासघात कश्याला करायचा....

अंजली : अं... त्यात काय?? विश्वासघात... Its natural... सर्व काही नैसर्गिक तर आहे.... आणि त्या "ताराने" त्या गोळ्या खायच्या होत्या की... फार्मसी वर मिळतात त्या... काय नाव आहे गडे त्याचं 🤔... काहीतरी इमेर्जन्सी........ पिल्स... असं काहीसं...

नेहा : अंजली!!असू दे, असु दे... तुझं नॉलेज तुझ्याजवळच असु देत...

अंजली : अगं नेहा!! अगं मी तर अनुयासाठी ही माहिती सांगत होते....

ते ऐकताच अनुयाचं डोकं उठलं....

अनुया : ए अंजली!!तू मला कश्याला मध्ये घेतेस गं😡... तुझं तू बघ ना... मला माझ्या मर्यादा चांगल्याच माहिती आहेत...

अंजली : अनुया!!एकदा प्रेमात पडलं की मर्यादा वगैरे सगळा दिखावा असतो.... समजलं ना....

अनुया : अंजली!! हे तूझ्या बाबतीत असेल... माझ्या बाबतीत नाही 😡....

अंजली : अनुया!!तू तर चिडलीस... मी तर आपलं इन जनरल सांगितलं....ते काय आहे ना. मी तर नेहमी माझ्या पर्स मध्ये त्या गोळ्या ठेवणार... काय सांगावं कधी गरज पडेल....

सायली :😳 अगं अंजली!!पण तुझं तर टाईम पास अफेअर चालू आहे ना... मग त्या साठी पण 🤔

अंजली : अगं तरी पण... आपण हुशार असलेलं बरं....

सायली : 🤦‍♀️... पण तुला या गोळ्यांची वगैरे माहिती दिली कुणी??

अजून कोण देणार??त्या झेंडू ने दिली असेल... अंजलीवरच्या रागाने 😡 अनुया म्हणाली....

अंजली : काहीही काय बोलतेस अनुया!! तू टी व्ही बघत नाही का??

सायली : अगं अंजली!!पण तू ताराच्या बाबतीत काय झालं ते नीट ऐकलं नाही का?

अंजली : हं... तारा चुकली म्हणजे मी चुकणार का??


गीतिका  :तसं नाही गं अंजली!!अगं सायली तसं म्हणत नव्हती.जाऊदे... हॉस्टेल डे च्या दिवशी माझी आई आणि माझी मावशी(आईची मैत्रीण ) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेच ना....त्या वेळेस बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील.....

नेहा : बरं अंजली!!यास्मिन!! उद्या ठरल्याप्रमाणे वेळेवर भेटा.... बघूयात तोवर आपल्याला काय काय सुचतं ते....

यास्मिन : ठीक है |हम आते....

गीतिकाने अंजलीच्या नकळत तू थांब जाऊ नकोस असे यास्मिन ला खुणावले.....

यास्मिनने रूमच्या बाहेर निघाल्यासारखं केलं... अंजली तिथून निघून गेली...

हुश्श निघून गेली एकदाची.... तीची माझ्याशी काय दुष्मनी आहे काय माहिती... प्रत्येक वेळा माझ्याशी पंगा घेत असते... अनुया रागातच म्हणाली....

नेहा : अनुया!! जस्ट चील... तू त्या अंजलीच्या तोंडी नको लागत जाऊ... मला तर वाटतं ना ती मुद्दाम करते... तरी मी तिला मागे किती प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला होता... रडली देखील होती... मला वाटलं ती बदलली असेल...

यास्मिन : हूं.. मगरमछ के आसू और क्या....गीतिका!!तूम शायद मुझसे कुछ कहना चाह रही थी |

गीतिका : कुछ नही... सुबह रशीदने तुमसे ऐसे बर्ताव किया... ऐसे लगा की जानबुझकर अनजान मार रहा था...

पता नही.... शायद रोज डे से तूम उसे पसंद आने लगी हो... यास्मिन डोळ्यात अश्रू 🥺आणून म्हणाली...

गीतिका :तूम तो hurt होगयी यास्मिन!!ऐसा कुछ भी नही....मुझे तो ऐसे लगता की उसने तुम्हे जलाने के लिए किया होगा....

यास्मिन : अब क्या बोलू... सारी गलती मेरी है | शुरु मे मैने बहोत भाव खाया.... और वो बदल भी तो सकता है ना...जाने दो... मेरा नसीब और क्या....

गीतिका : यास्मिन!! मैने तुम्हे इतना बताने के लिए रुकाया था की मेरे मन मे रशीद के बारे मे कुछ भी फीलिंग्स नही है | तो प्लीज कुछ गलत मतलब मत निकलना...

यास्मिन : अरे नही रे.....

गीतिकाचं ते वाक्य ऐकताच यास्मिनला खूप आनंद झाला...चलो निकलती हूँ मै असं म्हणून यास्मिन तिथून निघून गेली...

नेहा : गीतिका!! हे तू चांगलं केलस...यास्मिनला गैरसमज करून घेण्याची आता तरी काहीच संधी उरली नाही... ऍटलीस्ट तुझ्याकडून तरी....

गीतिका : हो गं नेहा!! मी सकाळीच तिचा पडलेला चेहरा बघितला होता...

क्रमश :
भाग 61 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या