आमच्यासारखे आम्हीच (61)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

नेहा : हो गं..मी पण यास्मिनचा पडलेला चेहरा पाहिला होता... पण मी काय म्हणते गीतिका!! हा रशीद जरी यास्मिनला जळवून त्रास देत असला तरी ह्या अश्या जळफळाटा मध्ये एक वेगळाच गोडवा असतो... हो ना😉...

अनुया : वा नेहा वा.. म्हणे गोडवा असतो😏... तुला माहिती आहे का तू प्रज्वलला सतत भेटत होतीस... म्हणजे माझ्या बर्थडे चं सरप्राईज प्लॅन करत होती.... तेव्हा माझे काय हाल झाले होते माझे मलाच माहिती🙄...

नेहा : आलं की नाही😉... पोटातलं ओठात 😂😂😂

अनुया : नेहा!!जा बाई 😏

नेहा : अगं अनुया!! Just kidding....

सायली : नेहा!!ह्या अंजलीचे विचार ऐकून तर मी हात जोडले....

नेहा : हो... खरंच... "अंजली "आपलं तर कधी ऐकत नाही पण स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करते...

अनुया : जाऊ द्या गं.... तिचं नाव जरी ऐकलं तरी माझं डोकं उठतं.... विषय बदला नाहीतर थोडया वेळाने माझं डोकं दुखायला लागेल....

सायली : बरं बाबा टॉपिक चेंज....

अनुया : बाय द वे गीतिका!! सेमिनारच्या वेळेस प्रज्वल कसाकाय आपल्या क्लास मध्ये आला होता... त्याने दुबे सरांची परवानगी घेतली होती का??🤔

गीतिका : अगं अनुया!!कसली परवानगी नी कसलं काय? तूझ्या सेमिनारच्या वेळेस सरांच्या नकळत प्रज्वल  क्लासच्या मागच्या दरवाजातून आत आला... तूझा सेमिनार संपला की क्लास बाहेर गेला....

अनुया : 😳 बापरे माझ्या सेमिनार साठी एवढी मोठी रीस्क प्रज्वलने घेतली...दुबे सरांच्या लक्षात आले असते तर?🤔

नेहा : अगं अनुया!! दुबे सर काही म्हणाले नसते... ते एक सरच तर असे आहेत की सगळ्यांशी फ्रेंडली वागतात... तसेही ते खूप चाणाक्ष देखील आहेत..... त्यांना प्रज्वल क्लास मध्ये आला होता ते कळलेलं देखील असु शकतं....

अनुया : 😳

नेहा : ऐका ना मला स्किट साठी एक गाणं सुचलं... "खुदको क्या समझती है इतना अकडती है".... जेव्हा ताराचा बॉयफ्रेंड तिच्या मागे लागतो तेव्हा....

गीतिका : मस्तच की....

सायली : आपण स्किट ची सुरुवात कॉलेजच्या ऍडमिशन पासून करू... की काय स्वप्न घेऊन तारा कॉलेज मध्ये येते.... मग प्रेमात पडते वगैरे... तीची पूर्ण स्टोरी... आणि शेवटी त्यातून आपण काय बोध घ्यावा हे सर्व....

नेहा : छानच की.... आपण ठरवलं की कसं पटापट सुचत जातं नाही का??

अनुया : हो 😊....

विश्वास आता चांगला अभ्यासाला लागला होता... त्याने आणि त्याच्या गँगने कॉलेजच्या  हायर ऑथॉरिटीची माफी मागून,हॉस्टेल बाकीच्या मुलांसाठी खुले करण्याची विनंती केली... आता आम्ही हॉस्टेल मध्ये कुठलाच आगाऊ पणा करणार नाही आणि ड्रिंक्स वगैरे देखील करणार नाही असे लिहून दिले.....

विश्वासच्या आणि त्याच्या गँग मधील झालेले बदल पाहून कॉलेज मधली शिक्षक मंडळी अचंबित झाली होती... पण त्यांच्यातील बदलमुळे कॉलेज मधील परिस्थितीने  गरीब असणाऱ्या  मुलांना आता त्यांच्या हक्काची रूम मिळाली होती ती देखील अगदी कमी खर्चात...

रोहन : प्रज्वल!! अनुया साठी तू चक्क क्लास मध्ये आला होतास...

प्रज्वल : everything is fair in love.... प्यार किया है भाई.. चोरी नही की...

रोहन : 😳 प्रज्वल!! प्रेमात माणूस डायलॉग देखील मारायला शिकतो 🤔...बरं आहे बाबा आम्ही सायलीच्या प्रेमात देवदास नाही झालो ते...

प्रज्वल : अरे रोहन!! इतक्यातच तू हार मानलीस.... तू प्रयत्न तर करून बघ....

रोहन : नको रे प्रज्वल!! आय रिस्पेक्ट हर थिंकिंग....

प्रज्वल : मग  तुझं कधीच काही नाही होणार... समजलं....

रोहन : प्रज्वल!!😒 का बरं असं म्हणतोस??

प्रज्वल : तू सायलीशी एकदा तरी बोलून बघ....

रोहन : मी.. बोलू... तुला वाटतं तर बोलतो मी...

प्रज्वल : तीला काही वाटत नसेल तर तीला तुझ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण कर... काय रोहन!!तुला आता काय मी छोटया छोटया गोष्टी सांगू का??

रोहन : अरे प्रज्वल!! मी तुला आधी पण सांगितलं होतं आता परत सांगतो.. ती सायली माझ्याकडे...

प्रज्वल : बघत सुद्धा नाही... हेच तुला म्हणायचे होते... तर मला सांग सायली तुमच्या वर्गात सगळ्यात जास्त कुठल्या मुलाशी बोलते.??...

रोहनने थोडा वेळ विचार केला🤔.... 😳 खरंच की... आतापर्यंत हे माझ्या लक्षात कसं आलं नाही... ती माझ्याशीच जास्त बोलते....

प्रज्वल : मग... तुला प्रयत्न करायला काय हरकत आहे...

रोहन : प्रज्वल!! तेरे बात मे दम तो है |

प्रज्वल : पण रोहन एक गोष्ट लक्षात ठेव... सायलीला तू डायरेक्ट प्रपोज न करता आधी तिच्या मनात तुझ्याबद्दल भावना निर्माण कर... म्हणजे मग ती नंतर नकार देणार नाही....

रोहन : हं... बरोबर आहे तुझं... पण तसं खरंच मला जमू शकेल??🤔

प्रज्वल : जमवावं लागेल... त्या शिवाय पर्याय नाही... अर्थातच जर तुझं सायलीवर खरं प्रेम असेल तर...

रोहन : म्हणजे माझं खरं प्रेम आहे तिच्यावर....

प्रज्वलशी बोलून झाल्यावर रोहनने काही वेळ विचार केला आणि सायलीला फोन 📳लावला....

😳 रोहनचा फोन 📳 कश्याला करत असेल... संभ्रमातच सायलीने फोन📳 उचलला....

रोहन : हॅलो सायली!!

सायली : हॅलो...

रोहन : दुबे सरांनी काल जो होम वर्क दिला होता तो मिळू शकेल का?? ते काय आहे ना सेमिनार च्या प्रॅक्टिसच्या गोंधळात तो लिहून घ्यायचा राहिला... आणि उद्या सबमिट करायचा आहे ना....

सायली : अच्छा... ठीक आहे.. मी व्हाट्सअँप वर सेंड करते....

रोहन : ok थँक्स....

सायली :welcome 😊

रोहनचा फोन सायलीला काहीतरी वेगळा वाटून गेला.... याला कुणी मित्र नसतील का? याने मला होम वर्क मागितला.... हं... कदाचीत कुणा मुलाकडे होम वर्क नसेलही.... तसंही मुलं कुठे सिन्सियर असतात म्हणा😊.... सायलीने स्मित करतच रोहनला होमवर्क पाठवला....

क्रमश :
भाग 62 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या