नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
गीतिका : वा सायली!!आज गालातल्या गालात हसत आहेस... कुछ खास बात 😍😍
सायली : काही नाही गं... रोहनने दुबे सरांनी दिलेलाहोम वर्क मागितला होता मी सेंड करत होते....
गीतिका : रोहन😳....
सायली : गीतिका!! थांब पुढे काही बोलू नकोस... या बाबतीत माझ्या आयडिया अगदी क्लिअर आहेत...
गीतिका : या बाबतीत म्हणजे???
सायली : तुला हेच म्हणायचं होतं ना की रोहन मला आवडतो का?
गीतिका : अगं नाही.... मला म्हणायचं होतं रोहन किती चांगला मुलगा आहे...ज्या मुलीला तो मिळेल तिचं नशीब किती चांगलं असेल नाही....
सायली :🤦♀️ मागे नेहाने विचारलं मला वाटलं तू पण तेच विचारत आहेस...
गीतिका : नाही नाही.. मला तर वाटलं चोराच्या मनात चांदणे 😜😜
सायली : गीतिका.. जा बाबा...
सलमा बरी होऊन रूमवर आली....
यास्मिन : सलाम वॉलेकूम सलमा बाजी!!.
अब कैसी हो...
सलमा : सलाम वॉलेकूम यास्मिन!! अब मै अच्छा महसूस
कर रही हूं ...अच्छा हुआ ये चारो तुम्हारी सहेलीया मुझे ऐनवक्त पर हॉस्पिटल लेके गयी....
यास्मिन : वो चारो भी बहोत अच्छे है | कभीभी मदद के लिए तैयार रहते है |
सलमा : हा.. सही कहा.... वैसे यास्मिन!! Congrats... तुम्हारा रोका हुआ ना🤔....
सलमाचे ते वाक्य ऐकताच यास्मिनचे डोळे पाणावले🥺...
नही बाजी म्हणत यास्मिनने तिच्या मामाच्या मुलाबद्दल सलमा ला सांगितले....
सलमा : ओ... यास्मिन!! फिर तो तुम्हारे साथ बहोत बुरा हुआ...
यास्मिन : नही बाजी!! उलटा अच्छा हुआ वैसे भी इतने जल्दी मुझे रोका नही करना था |और मेरे मामा के बेटे को और कोई लडकी पसंद है |
सलमा : और तुम्हे 😉?? रशीद 🤔
यास्मिन : अं मुझे 🤔....कुछ भी क्या बाजी🥰🥰....
सलमा : अरे तुम्हे तो शरम आ रही है | 😜😜
आता आपल्या मनातली चोरी पकडली जाईल अशी भीती वाटल्याने... बाजी मै अभी आई असं म्हणून यास्मिन रूमच्या बाहेर पडली....
छान निवडलेले गाणे घेऊन आता या सगळ्यांची स्किट ची प्रॅक्टिस जोरदार सुरु झाली होती..
नेहा : चला आपण स्किट चे पात्र ठरवू या... ताराचा रोल कोण करणार?
अनुया मी म्हणणार तितक्यात अंजली बोलली....
अंजली : मी तारा च्या बॉयफ्रेंडचा रोल करते... मस्त शर्ट पॅन्ट घालावा लागेल मेक अप ही कमी....
अंजली आणि माझा बॉयफ्रेंड 🤔 नो...नो वे.... दुसऱ्या कुणाला तरी करू देत ताराचा रोल.... या अंजलीला पाहून माझ्या चेहऱ्यावर रागच 😡येत राहील....
नेहा : अनुया, यास्मिन सायली गीतिका... बोला की...
गीतिका : नेहा तू किंवा सायली करा ना ताराचा रोल...हे बघा तुम्ही दोघी सलमाला भेटल्या ना तसंही माझी आई पण त्या कार्यक्रमाला हजर असणार आहे तर अधून मधून मलाही तिच्याशी संवाद साधावा लागेल.....
सायली : अगं मी आणि अंजली जोडा जरा विजोड दिसतो..माझी उंची जास्त आहे म्हणून... मला वाटतं नेहा तू एकदा अंजलीच्या बाजूला उभी रहा बरं... परफेक्ट.... परफेक्ट जोडा वाटत आहे....
नेहा : बरं बाबा मी तारा... अंजली तारा चा बॉयफ्रेंड सायली ताराचीआई... तर गीतिका ताराचे वडील.
यास्मिन :मै और अनुया??🤔
नेहा :यास्मिन!!तूम तारा की डॉक्टर..
नेहा :अनुया!! तू घरमालकीण....
नेहा : सगळयांना सगळ्यांचे पात्र आवडले आहेत ना.... कुणाला जर पात्रांची अदलाबादल करायची असेल तर आताच सांगा.... मग पुन्हा पात्र बदलले जाणार नाहीत....
अंजली : ते काय आहे ना नेहा!! मुख्य पात्र मीच झाले असते पण काय करू आपल्या स्किट मधला मुख्य पात्रच बदनाम झालेला आहे🙄... मी आयतीच बदनाम का होऊ🙄...
नेहा : अगं अंजली!!हे स्किट आहे... आणि जर आपण हे स्किट आपल्या मैत्रिणींनी यातून काही चांगला बोध घ्यावा या साठी तर आपण करत आहोत ना...
अंजली : हो बाई नेहा!!तू महान आहेस... तुझ्यासारखी मी महान नाहीये... तुला कोपरापासून नमस्कार... अंजली कुत्सितपणे म्हणाली....
हो मग आहेच मी महान 😊 नेहाने स्मित करून उत्तर दिलं....
नेहाच्या या अनपेक्षित सडेतोड उत्तराने अंजली एकदम शांत झाली तर सायली गीतिका आणि अनुया अवाक😳 होऊन नेहा कडे बघू लागल्या..
बरं सांग सुरुवातीला काय करायचं आहे... अंजलीने वातावरण आपल्या विरोधात जात आहे याचा अंदाजा घेऊन विषय बदलला...
नेहा :सुरुवातीला ताराची एन्ट्री दाखवू आणि काही डायलॉग .. तीला आपल्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले... ती खूप खूष आहे... तिच्या आईवडिलांनी तीला मुलासारखे वाढवलेले असते... आणि गाणं वाजेल... पापा कहते है बडा नाम करेगा.... आणि ताराच्या डोळ्यात आनंदाश्रू....
अनुया : वा नेहा!! मस्तच सुरुवात
नेहा : हो अशीच काहींसी सुरुवात ठेऊ....
अंजली : ए आज साठी ईतकंच...होम वर्क पण आहे ना... ते कम्प्लिट करायचं राहिलं आहे ... नेहा!! आपण रोज एक वेळ ठरवू म्हणजे कुणाची अशी तारांबळ उरणार नाही...
.नेहा :कॉलेज सुटलं की हॉस्टेल वर यायचं फ्रेश होऊन लवकर जेवण करून कधी दोन तास कधी तीन तास अशी प्रॅक्टिस करू या .
यास्मिन : हा ये ठीक रहेगा... मेरा तो रोल आखरी मे है ना...
नेहा : हा यास्मिन!! पर कल या परसो तक पुरे डायलॉग कंप्लिट करेंगे... आज के लिए ईतनाही....
यास्मिन : ठीक है... मै निकलती हूँ.....
अंजली : चला उद्या भेटू.... गूड नाईट...
गूड नाईट स्वीट ड्रीम्स.... सगळ्याच जणी एकसुरात म्हणाल्या.....
क्रमश :
भाग 63 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या