नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
आता स्किट प्रॅक्टिस जोरात सुरु झाली होती...सोबतच सिनियर मुलींची डान्स प्रॅक्टिस ही सुरु झाली होती...
क्लासमध्ये गेल्या गेल्या रोहनने सायलीला आवाज दिला...
रोहन : सायली!!
सायली : अं.. रोहन तू??🤔
रोहन : कालच्या होम वर्क बद्दल थँक्स...
सायली : काय रे रोहन!! फक्त एवढ्यासाठी थँक्स🤔 ... पुन्हा माझी अशी मदत नको वाटतं??
रोहन : सायली!!🥰 तसं नाही गं
सायली : मग कसं....
सायली जरा ईकडे येतेस का?? गीतिकाने सायलीला आवाज दिला....
सायली : हो आले... रोहन!!गीतिका माझी वाट पहात आहे...मी निघते...
काय यार या गीतिकाला सायलीला आताच आवाज द्यायचा होता का... थोडासा बोर होऊन रोहन त्याच्या जागेवर जाऊन बसला ...
गीतिका :सायली!! ह्या रोहनचं ना नक्की काहीतरी बिघडलं आहे का??
सायली : श्श 🤫आताच काही बोलू नकोस भिंतीलाही कान असतात....
गीतिका : हम्म...
सायली : गीतिका!! रोहनचं तर माहिती नाही पण रशीदचं नक्कीच काहीतरी बिघडलं आहे....
गीतिका : 🤔 काय??
तो बघ तिकडून येत आहे.... सायलीने समोर तोंड करून गीतिकाला दाखवलं.....
गीतिकाने मान वळवली.....
रशीद : गीतिका एक मिनिट थोडा बाजूला येतेस का??मला तुझ्याशी थोडं महत्वाचे बोलायचं होतं....
गीतिका : अरे वा रशीद!! ईतकी pure मराठी.... आले एक मीन....
रशीद : गीतिका!! तू कळंबोली ला राहतेस ना....
गीतिका : हो...
रशीद : मुझे मराठी बोलने मे जरा दिक्कत हो रही है | मैने हिंदी मे बात की तो चलेगा ना....
गीतिका : हा हा... वैसे भी हम यास्मिन 😉से हिंदी मे ही बात करते है |
रशीद : यास्मिन से 🥰... सुनो गीतिका!!बात थोडी पर्सनल है | और बहोत जरुरी भी....
गीतिका : पर्सनल 😳.... क्या....
रशीद च्या बोलण्याने गीतिका जरा घाबरली....
रशीद : गीतिका तुम्हारी माँ कॉन्सलर है ना...
गीतिका : हा....
रशीद : तो वो मेरे बहन का कॉन्सेलिंग कर सकेंगी क्या?
मेरी बहन भी कळंबोलीमे रहती है | उसके in laws जो है वो बहोत खराब है | उसका हसबँड भी उसकी कभी सुनता नही है... मेरे अम्मी अब्बू भी मेरे बहन को समझ नही रहे.... मै अभी पढ रहा हूं इसीलिये मै मेरे दम पर कुछ कदम नही उठा पा रहा हूं....पर तुम्हारी अम्मी अगर उसे कॉन्सेलिंग करेंगी तो शायद वो डिप्रेशन मे जाने से बच जायेगी...
बेचारी मेरी बहन,मै उसकी सून लेता हूं इसीलिये फोन करके मेरे पास रोती रहती है |
गीतिका : तो ये बात है | रशीद!!तूम कल ही तुम्हारे बहन को मम्मा के पास भेजो... और फिस देने की जरुरत भी नही है | मेरी मम्मा ऐसे काम फ्री मे करती है... बस तूम इतना करो की उसे मेरे मम्मा के ऑफिस भेजो... सर आये... मै तुमको ऑफिस ऍड्रेस व्हाट्सअँप करती हूं...
रशीद और गीतिका इतनी देर बात कर रहे है 🙄... और गीतिकाने मुझसे कहा की उसके दिल मे रशीद के लिए कुछ फीलिंग्स नही है 😏... अच्छा खासा हस हस के तो बात कर रही है.... यास्मिन गीतिका आणि रशीद ला एकत्र बोलताना बघून सैरभैर झालेली होती..
गीतिका धावत क्लास कडे येताना रशीदने पुन्हा गीतिका ला आवाज दिला.... गीतिका!!
गीतिका : क्या??
रशीद : प्लीज ये मेरे बहेन की बात किसी को मत बताना.... माझ्या घराचा मामला असा चार चौघात डिस्कस झालेला मला नाही आवडणार....
गीतिका : रशीद!! Dont worry... ऐसी बाते confidential रखना जानती हूँ मै....
रशीद : many many थँक्स....
गीतिका पळतच क्लास मध्ये येऊन बसली.... तिच्या आधी नुकतेच माने सर वर्गात आले होते.... पळून आल्यामुळे तीला धाप लागली होती.... यास्मिन सहीत नेहा अनुया सायली यांचे लक्ष गीतिका काय बोलते याच्याकडे होते... पण तितक्यात माने सरांनी शिकवायला सुरुवात केली..
सर्वांचे लक्ष माने सरांकडे गेले....
क्लास झाला की अंजली या चौघीजवळ आली.आणि म्हणाली... बाकी मस्त चाललं आहे तुमच्या ग्रुपचं... एकीकडे रोहन आणि एकीकडे रशीद. वाह 😏
अंजली : काय ग सायली!!आता दोनच दिवसापूर्वी तू मला म्हणाली होतीस ना की मी असल्या भानगडीत पडणार नाही... एक तर तुझ्यामुळे त्या रोहन ने मला नकार दिला... अन तू बरी सज्जनपणाचा आव आणतेस 😏
सायली : माझ्या मुळे नकार??🤔अंजली!! काहीही काय बोलतेस??
पहा पहा ही सायली!! किती साळसुद पणाचा आव आणते...जसं की हिला काहीच माहिती नाही....बाजूच्या मुलींकडे बघून अंजली म्हणाली.....
अंजली चारचौघांमध्ये बोलत आहे हे पाहून गीतिकाला अंजलीचा राग आला....
गीतिका : अंजली!! उगाचच कुठलेही अर्थ लाऊन बोलू नकोस....
अंजली : ओ मॅडम!! तुम्ही तर बोलूच नका... आधी गीतेश सर काय... त्यांच्या झटक्यापासून मन नाही भरलं की दुसऱ्या रशीद नावाच्या झटक्यासाठी तयार.....
यास्मिन : क्या??🤔 गीतेश सर???
अंजली : यास्मिन!! तुम्हे नही पता🤔... तूम तो इन्की खास दोस्त हो ना... फिर तुम्हे कैसे पता नही....चू चू चू.... मतलब तूम उनकी खास दोस्त नही हो....
यास्मिन : गीतिका!! ये अंजली क्या कह रही है?😡
आधीच यास्मिनला गीतिकाचा राग आलेला होता आणि त्यात भरीस भर म्हणून अंजलीने गीतेश सरांचा उल्लेख केला....
गीतिका : यास्मिन!! तूम ये अंजली की बात मत सुनो...हॉस्टेल पर जाने के बाद मै तुम्हे सबकुछ बताती हूं....
अंजली : का?? आता ईथे का नको... ईथेच सांग ना... की सांगण्याची हिम्मत नाही....
नेहा ह्या तिघींचे बोलणे बाजूच्या बेंच वर बसून ऐकतच होती.... अंजली बोलायला लागली की आज काल सगळ्यांना तीचे वेडेवाकडे बोलणे खटकत असे... पण शक्यतोवर तिच्या तोंडी लागायचे नाही असेच सगळ्यांना वाटे... पण आता नेहाला तीची बडबड असह्य झाली...
आणि म्हणाली : अंजली!! हिम्मतीचा प्रश्न नसतो... पण ते काय आहे ना कुठे काय बोलावं हे आम्हाला चांगलं समजतं....
नेहाने प्रेमाणे शालीतुन जोडे मारणे काय असते याचा अनुभव अंजलीला करून दिला....
क्रमश :
भाग 64 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या