नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
नेहाच्या चपराकाने अंजली शांत झाली....पण यास्मिनने मात्र गीतिका बद्दल गैरसमज सुरु करून घ्यायला सुरुवात केली होती....
हॉस्टेल वर पोहोचल्या पोहोचल्या यास्मिन ने गीतिकाला रशीद तिच्याशी काय बोलला हे विचारले.....गीतिका!!आज तूम और रशीद बहोत देर तक बात कर रहे थे |🤔
गीतिका : यास्मिन!! कुछ नही...बस या ऐसेही....
यास्मिन : अच्छा गीतिका!! मै समझ गयी....तुम्हे बताना नही तो मत बताओ 😏
गीतिका : यास्मिन!! तूम तो बुरा मान गयी... पर उसने कुछ ऐसा वैसा नही कहा |
प्रज्वल :काय मग रोहन!! काय म्हणतोस कुठपर्यंत आली गाडी 🤔??
रोहन : प्रज्वल!! आता तर मैत्री होईल.... सायली को पाना मतलब लंबी रेस जितना... समझे..
प्रज्वल : ओहो..आता तर तू डायलॉग मारायला लागला आहेस😄😄...
रोहन : हो मग ... ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला... वाण नाही पण गुण लागला 😉... समझे 😂😂😂
प्रज्वल: बरं बरं... समजलं बरं 😂😂....
रोहन : चल प्रज्वल!! आज हा नेहमीचा डब्बा खाऊन खूप बोर झालो आहे... आपण हॉटेल मध्ये जेवायला जाऊ... आज माझ्याकडून तुला पार्टी...
प्रज्वल : पार्टी?? किस खूशी मे???
रोहन : अरे तू मला समजावून सांगितलं म्हणून तर मी एक एक पाऊल उचलत आहे.... मैत्रीचा हात पुढे करण्याची हिम्मत करत आहे.... नाहीतर मलाच माहिती नाही माझं काय झालं असतं ते....
प्रज्वल : काय झालं असतं... तू अंजलीला किंवा तिच्यासारख्या एखाद्या मुलीला होकार दिला असता 😜😜😜
रोहन : प्रज्वल!! काहीही काय मस्करी करतोस रे.... माझ्या प्रेमाच्या संकल्पना अगदी क्लिअर आहेत😍😍... त्या मुळे मी असला फालतू घोळ कधीच केला नसता....
प्रज्वल : रोहन!! अरे तुला मी असंच चिडवलं ...
रोहन : its ok dear... मला माहिती आहे...बरं चल हॉटेल मधलं जेवण आपली वाट पाहात आहे😉...
विकी आणि अंजलीची नेमकी त्याच हॉटेल मध्ये डिनर डेट चालू होती
रोहन : अरे यार... प्रज्वल!!ते बघ ते जोडपं🙄....
प्रज्वल : रोहन!! त्यांना आपण दिसण्या आधी आपण त्या गार्डन रेस्टोरंट मध्ये जाऊ... नाहीतर ते दोघेही आपल्याला पकवतील.....
विकी आणि अंजलीच्या नकळत प्रज्वल आणि रोहन बाजूला असलेल्या गार्डन रेस्टोरंट मध्ये जाऊन बसली...
बसल्या बसल्या रोहन प्रज्वलला म्हणाला... ही दोघे काय गप्पा करत असतील बरं??🤔
प्रज्वल : एकमेकांना इरीटेट करण्याची स्पर्धा करत असतील 😜😜😜
रोहन : मला तर वाटतं ना ते इकडच्या गोष्टी तिकडे करत असतील....जाऊदे करेनात का? आपल्याला काय करायचं?🤔 नाहीतर त्यांच्या बद्दल बोलता बोलता आपण इरीटेट होऊन जाऊ 😉
.... अंजली हॉस्टेलच्या मुलींचे काय चालले याचे प्रत्येक अपडेट्स विकी जवळ देत असे...
त्याचा फायदा विकी सोबत असणारी काही घाणेरड्या विचारांची मुले घेत असत....अंजली आणि विकी ची भेट झाली की दुसऱ्या दिवशी विकीचे मित्र त्या त्या मुलींना टॉन्टिंग करत असत....
हॉस्टेल वरच्या मुलींना आपल्या हॉस्टेल मधल्या गोष्टी या असल्या फालतू मुलांकडे सीसी टी व्ही कॅमेऱ्या सारख्या कश्या कळतात ह्याचं मात्र कोडं उलगडत नसे....
अंजली:मला वाटतं ना गीतिका आणि रशीदचं नक्कीच काहीतरी चाललं आहे... नुसतं वाटतच नाही.. मला तर खात्री झाली आहे... आज बघितलं नाहीस का तू... आपल्या क्लास समोर दोघेही किती वेळ बोलत होते ते...
विकी : असु शकेल... एरवी सुंदर मुली बुद्धीने तितक्या हुशार नसतात... आधी तो गीतेश आणि आता रशीद 😏
अंजली : म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?? मी सुंदर नाही😡😡....
विकी : अगं अंजली!! मी असं कुठे म्हटलं... तू तर मला सगळ्यात सुंदर वाटतेस 😍😍
अंजली : म्हणजे काय म्हणायचं आहे??😡😡 मी बुद्धीवान नाही 😡😡....
विकी : अगं मी तसंही कुठे म्हटलं आहे?? काही exception असतात ना... ज्यांना दोन्हीही असतं....जसं की तू...
अंजली : बरं बरं हरबऱ्याच्या झाडावर नको चढवूस....समजलं ना...
विकी : 🤦♂️ तुम्ही मुली ना....किती कठीण असतात काहीच समजत नाही....
अंजली : मुली म्हणजे?? तू किती मुलींना डेट करतोस.😡😡..
विकी : अंजली!!आता तू मला शब्दात पकडणार आहेस का??😡
अंजली : सॉरी सॉरी... तुला राग आला का.... मी तर असंच....
विकी : बरं राग राग खेळणं राहू दे.... जरा लवकर ऑर्डर कर... मला खूप भूक लागली आहे....
अंजलीने जेवण ऑर्डर केलं.....
अंजली : बरं विकी ऐक ना... Next डेट ला आपण डिस्क, पब मध्ये जाऊयात ...
विकी : तुला चालेल 😳...
अंजली : न चालायला काय झालं 🤔... पळेल😜....
रोहन : चल प्रज्वल आता जाता जाता जरा त्या जोडप्याची गंम्मत घेऊ.
प्रज्वल : नको रे बाबा!! आपण इरीटेट होऊ....
चल तर 😉असं म्हणत रोहनने प्रज्वलचा हात पकडला विकी आणि अंजलीच्या दिशेने त्याला घेऊन गेला....
रोहन : hi अंजली!!hi विकी??
अंजलीने रोहनला प्रपोज केल्यापासून आज प्रथमच ते दोघे समोरासमोर आले होते... रोहनला पाहून अंजलीला अपराध्यासारखं वाटलं....
रोहन : काय मग विकी... तू आम्हाला पार्टी नाही दिलीस 😜.....
विकी: पार्टी?? कसली पार्टी??🤔
रोहन : this is not fair... तुमचं जमल्याची..... Infact मला तर तुम्ही दोघांनीही पार्टी दिली पाहीजे...
रोहन पुढे काही बोलणार ईतक्यात प्रज्वल रोहन ला म्हणाला:रोहन !! चल लवकर.... मला अर्जंट काम आहे....
रोहन : काय रे प्रज्वल!! विकीला मी चांगली अद्दल घडवणार होतो.... पण तुला ईतकं काय महत्वाचे काम होते
प्रज्वल : मला काहीच महत्वाचे काम नव्हते.... पण तुला आवरणे खूप जरुरी होते... चल आपण त्या टपरी पर्यंत थोडं चालत जाऊ... म्हणजे आपलं बोलणंही होईल..
रोहन : म्हणजे मला काही कळालं नाही रोहन गोंधळून म्हणाला...
प्रज्वल : रोहन!!हे अंजली किंवा विकी सारखे लोकं असतात ना एक तर ते कधीच कुणाचे नसतात.
रोहन : हं ते तर माहिती आहे....
प्रज्वल : आणि त्यांना कधीच अद्दल घडत नसते... म्हणजे आपण त्यांना अद्दल घडवण्या मागे एक चांगला हेतू असतो पण ते नेहमी त्याचा उलटाच अर्थ काढतात आणि बदल्याची भावना मनात ठेवतात....
रोहन : बरं तरी त्याचा ईथे काय संबंध??🤔
प्रज्वल : मला माहिती आहे... पुढे तू अंजली आणि विकी ला म्हणणार होतास की तुमचं हे जे काही सुरु आहे ना ते माझ्या मुळेच तर आहे...
रोहन : 😳 तुला कसं माहिती??
प्रज्वल : तू त्यांना पार्टी मागितली ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं... पण तुला माहिती का अश्याने ते दोघेही डिवचले गेले असते....
रोहन : मी तर चांगल्या विचाराने त्यांचं अभिनंदन करणार होतो... बरं झालं तू मला तिथून बाहेर काढलं...
दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये कॉलेज सुटल्यावर रशीद गीतिकाला भेटायला गेला....
क्रमश :
भाग 64 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या