नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
अच्छा मै समझ गयी | वैसे भी मै गीतिका पे नही खुद पे गुस्सा हूं | कभी कभी लगता है की मै रशीद को वक्त पे समझ नही पाई | और कभी कभी लगता है की मै सही थी | दिमाग का दही हो रहा है यार | इसीलिये मै चिडचिड कर रही हूं | यास्मिन तीची बाजू मांडत होती...
सायली : हा लेकीन अब अपने को प्रॅक्टिस के लिए चलना चाहिए नही तो कभी न चिडनेवाली नेहा भी अपने पे गुस्सा होगी|
यास्मिन : हा चलो जल्दी....
दोघीही स्किट च्या प्रॅक्टिसला गेल्या....
आता ईथुन पुढे कितीही महत्वाचे कारण असु देत स्किट ची प्रॅक्टिस आधी करायची आणि मग बाकीचे कामं करायचे असे नेहाने फर्मान सोडले....
हॉस्टेल डे च्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्यामुळे सर्व मुली हॉस्टेल ला डेकोरेशन करण्यासाठी लागल्या...
तिथल्या सफाई कामगारांनी सकाळीच हॉस्टेल कसं लक्ख केलं होतं...
नेहा आणि दिव्या नी खूप सारे फुगे आणले होते.... ते रूम प्रमाणे वाटून प्रत्येक मुलीला फुगे फुगवायला लावले...
त्यातील काही मुलींनी जागोजागी बलून डेकोरेशन केले... हॉस्टेल अगदीच सुशोभीत केले होते....
हॉस्टेल च्या एंट्रन्स वर सुशोभीत अशी रांगोळी काढली होती. होती...
हॉस्टेल च्या पॅसेज मध्ये ओटा होता त्यालाच त्यांनी स्टेज बनवले होते... तर प्रत्येक मुलींनी आपापल्या खुर्च्यावर नाव टाकून त्या तिथे मांडल्या होत्या....
प्रमुख पाहिन्यांसाठी रेक्टर मॅमने खुर्ची आणि टेबल ची व्यवस्था केली होती तर माईक आणि साऊंड सिस्टिम साठी सगळ्या मुलींकडून कलेक्शन करून त्याची मांडणी केली होती.... गणाऱ्यांसाठी कराओके म्युसिक सिस्टिम ठेवली होती....
कार्यक्रम छोटा जरी असला तरी त्यात कसली कसरच ठेवली नव्हती...
गीतिका देखील तिच्या मम्मा ची वाट पहायला लागली होती... तसं तीची मम्मा आणि डॉक्टर मावशी सकाळीच निघाल्या होत्या....निघताना त्यांनी गीतिकाला कॉल केला होता...
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गीतिकाची मम्मा असल्यामुळे या चारही मैत्रिणींना त्यांचा खूप अभिमान वाटायला लागला होता...
हॉस्टेलचं डेकोरेशन अगदीच दुपारी पूर्ण झालं..... मध्ये थोडा वेळ होता... मुलींनी दुपारचं जेवण करून आराम केला... आणि ज्या ज्या मुली हॉस्टेल डेच्या कार्यक्रमात भाग घेणार होत्या त्यांचा मेक अप सुरु झाला...
गीतिकाची आई आणि मावशी दोघीही हॉस्टेलला आल्या... त्या दोघीसाठी रेक्टर मॅम ने वेगळी बडदास्त ठेवलेली होती....
कार्यक्रमाला सुरुवात झाली.... सूत्र संचालनासाठी दिव्या उभी राहिली...
दिव्याने हॉस्टेल डे चा इतिहास थोडक्यात सर्वांसमोर मांडला.... आणि नंतर रेक्टर मॅम, गीतिकाची मम्मी आणि मावशी यांनी सरस्वती पूजन केले....
पूजन झाल्यावर गणेश स्तवन च्या नृत्याने सुरुवात झाली.
.
गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥
गाण्याच्या या सुराने सगळेच मंत्र मुग्ध झाले होते... जणू काही त्या गीताच्या स्वराने पूर्ण हॉस्टेलला व्यापून घेतले होते.. सोबतही सगळे जण स्टेजवरील नृत्य एंजॉय करत होते....
आता यांच्या स्किटची अनाऊन्समेन्ट झाली....
पडदा उघडला गेला.... तारा आणि तीचे आई वडील स्टेज वर आले...
तारा एक ट्रॅव्हल बॅग सोबत घेऊन तिच्या आई वडिलांच्या पाया पडते... ताराचे वडील आशीर्वाद देतात आणि म्हणतात तारा तू तर आमचा मुलगा आहेस... यशस्वी भव ...
मग मागच्या वाल वर एक ट्रॅव्हल्स रस्त्यावरून जाताना तिचा फोटो देखील मागच्या वॉल वर दिसतो...
नंतर कॉलेज चा फोटो येतो..
तारा वरती ईकडे तिकडे बघते... आणि म्हणते वा किती भव्य दिव्य कॉलेज आहे मग बॅकग्राऊंड गाणं वाजतं...त्यावर तारा थिरकते....
पापा कहते है बडा नाम करेगा,
बेटा हमारा ऐसा काम करेगा
वो ज़िन्दगी में,
कल क्या बनेगा हर इक नजर का,
सपना ये है..
कोई इंजिनियर का काम करेगा
बिज़नस में कोई अपना नाम करेगा
मगर ये तो, कोई ना जाने के मेरी मंज़िल, है कहाँ ..
पापा कहते हैं बड़ा नाम करेगा....
आपले आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा दिवस उगवला.... आई!!बाबा!!आता मी मन लाऊन अभ्यास करणार😊....माईक जवळ येऊन तारा बोलते
तारा चालत चालत हॉस्टेल ला येते...
नंतर दुसरा सीन.... तारा कॉलेज मध्ये येते....समोरून एक मुलगा अजय (अंजली ) येतो.... ताराचे सोंदर्य बघून तो ताराला विचारतो..
हो, चेहरा है या चाँद खिला है ज़ुल्फ़ घनेरी शाम है क्या ) - २ सागर जैसी आँखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या ...
गूड मॉर्निंग सर.. अगदी वाकून घाबरलेल्या सहमलेल्या ताराने त्याला wish केलं..
अरे रुको मै भी फ्रेशर हूं 😂😂
दोघेही मनसोक्त हसतात😂😂.....
अशी त्यांची ओळख होते.......
ताराला अजय अगदी पहिल्याच भेटीत आवडतो😍😍 पण ती त्याला ते दाखवत नाही..आणि अजय मात्र ताराच्या मागेच लागतो....आणि तारा त्याच्या कडे मुद्दाम दुर्लक्ष करते.. कधी कधी त्याच्या कडे रागाने😡 बघते..... गाणं वाजतं त्यावर अंजली तिच्या मागे मागे डान्स करते...
खंबे जैसी खडी है, लड़की है या छड़ी है
शोला है फुलझड़ी है, पट्टाखे की लड़ी है
आँखों में गुस्सा है, लबों पे गाली है
देखो ज़रा देखो यारों, खुद को समझती है क्या??
तारा तरी देखील अजय कडे लक्ष देत नाही...आणि अजय काही तारा चा पिच्छा सोडत नाही....शेवटी तो फिल्मी स्टाईल ने हातात poison ची बॉटल घेतो आणि गाणं वाजतं
ऐलान यहा करने आया
मैं आज यहाँ मरने आया
रुसवा तुझे मैं कर जाऊँगा
खा के ज़हर अब मर जाऊँगा
खा के ज़हर अब मर जाऊँगा
मैंने प्यार तुम्हीं से किया है (तुरुरुरु)
मैंने दिल भी तुम्हीं को दिया है (तुरुरुरु)
अब चाहे जो हो जाए
मैं दुनिया से अब ना डरूं
तुझी से मैं प्यार करूँ
मग काय आधीच ताराला अजय आवडत असतो पण ती त्याला टाळत असते... त्याच्या अश्या प्रकारे प्रपोज केल्यावर तारा देखील त्याला होकार देते....तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात आणि मग ती ते अश्रू पुसते आणि गाणं वाजतं
हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे
हम से मिला करो हम से मिला करो
कोई शिकवा अगर हो और शिकायत अगर हो
हम से गिला करो हम से गिला करो
जान मैंने भी प्यार किया है
हाँ मैंने भी प्यार किया है
क्रमश :
भाग 67 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
.
0 टिप्पण्या