आमच्यासारखे आम्हीच (भाग 67)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
...........................................................................

प्रेमाचा स्वीकार तर ताराकडून झाला होता....
मग वॉल वर त्यांच्या डिनर डेट, बाईक ride असे फोटो टाकले गेले....

सोबत गाणे... चालू होते 
पहला पहला प्यार है
 पहली पहली बार है
जान के भी अन्जाना
 कैसा मेरा यार है ...
उसकी नज़र,
पलकों की चिलमन से मुझे देखती,
उसकी नज़र उसकी हया,
अपनी ही चाहत का राज़ खोलति,
 उसकी हया छुप के करे जो वफ़ा,
ऐसा मेरा यार है पहला पहला प्यार है ...

गाण्यासोबत दोघेही एकमेकांना मीठी मारतात आणि दोघीही स्टेजच्या मागे जातात...

आणि मग ताराला  कोरड्या उलट्या येतात... तारा गोंधळून जाते आणि तीला समजतं की तीची पाळीची तारीख चुकलेली आहे...ताराला ते आठवून एकदम भीती वाटते... आपण काय चूक केली आहे....आणि मग तारा म्हणते ओ नो pregnancy test positive.... मी आता काय करू...
गाणं लागतं....
रोना चाहे रोना पाये

दिल कितना मजबूर है

रोना चाहे रोना पाये

दिल कितना मजबूर है

किसे पता है कौन बताये

रब को क्या मंजूर है....


गाण्यानंतर तारा अजयला भेटते...

तारा : अजय i am pregnant 😭

अजय : dont worry.... तारा... तू टेन्शन नको घेऊस...माझ्या एका मित्राचं असंच झालं होतं तेव्हा त्याने कुठून तरी गोळ्या आणल्या होत्या... त्याच्या मदतीने मी तुला गोळ्या आणून देतो... मग तर झालं...

तारा : हूं...

अजय : अरे काय हूं... Smile करून बोल....

तारा : 😊 हं....

तारा स्टेजच्या मागे जाते....

ऍम्ब्युलन्स चा आवाज येतो.... ताराला डॉक्टर तपसतात... आणि तिच्या घरमालकीणीला विचारतात... ह्या मुलीचं लग्न झालं आहे काय??

घरमालकीण : नाही....

डॉक्टर : तिच्या आईवडिलांना बोलावून घ्या...ताराने  illegal ऍबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे....

ताराचे आईवडील धावत पळत हॉस्पिटल मध्ये येतात...
नंतर वडील रागात निघून जाणे आईवडीलांना लोकांचे सतत वेडे वाकडे बोलने आणि तारा शुद्धीवर येणे.... पण लोक लज्जास्तव तीचे आईवडील तीला घरी घेऊन जातात...

पडदा पडतो... आणि मागून आवाज येतो... भावनेच्या आहारी जाऊन केलेली एक चूक किती महागात पडते म्हणून असे काही पाऊल उचलण्या आधी क्षणभर थांबा.. कणभर विचार करा... तारासारखे स्वतःचे हाल करून घेऊ  नका... ती वाचली... जरुरी नाही की तुम्ही देखील वाचणार??

टाळ्यांचा गडगडाट होतो...नंतर दिव्या कीर्ती मीना यांचा एक वेस्टर्न डान्स होतो...

डान्स झाल्यानंतर.. गीतिकाच्या मम्मी बोलणार आहेत याची अनाऊन्समेन्ट झाली....

गीतिकाची मम्मी बोलायला लागली.... सर्वप्रथम मी आपल्या हॉस्टेल डे च्या शुभेच्छा देऊन रेक्टर मॅम चं खास अभिनंदन करते.. की त्यांनी हॉस्टेलच्या मुलींची  अगदीच योग्य पद्धतीने काळजी घेत आहे...

नंतर मी आपल्या हॉस्टेलच्या मुलींचे अभिनंदन करते की त्यांनी अगदीच गणेश स्तुती, स्किट, गाणे आणि डान्स यांचा अतिशय सुरेख संगम दाखवला आहे...

पण आता एक समुपदेशक म्हणून मी आता थोडंसं हितगुज तुमच्याशी करणार आहे....
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाने विवाह संस्था निर्माण केलेली आहे...

या मुळे काही नियमांसाठी आपण बांधील आहोत....
 तुम्ही जे स्किट दाखवलं त्या मध्ये तुमच्या वयाप्रमाणे तुमच्या माहिती प्रमाणे ते दाखवले आहे...तुम्ही ते बोध होण्यासाठी म्हणून दाखवलं आहे...

पण या व्यतिरिक्त अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या कदाचीत तुम्हाला माहिती देखील नसतील... त्या गोष्टींची मी तुम्हाला माहिती करून देणार आहे....

प्रेम ही अतिशय सुंदर भावना आहे.. बरं त्यात तुमचं अडाणीड वय..

पण या वयात ज्याला तुम्हाला असलेल्या जबादारीची जाणीव  आणि प्रेमाचा समन्वय ज्यांनी व्यवस्थित साधला आहे तोच जग जिंकला आहे...

काय,नाही कळालं ना...

जबाबदारी म्हणजे तुमचं हे शिक्षण.. आणि जर तुम्ही प्रेमात पडले असाल तर त्याला एक विशिष्ट मर्यादा ठेवायला पाहिजे....

तुम्ही ताराचं काय झालं ते बघितलं आहेच पण त्या पेक्षा ही अजून वाईट घडले असते किंवा घडू शकते...

 त्या अजय वर पोलीस केस झाली असेल किंवा होऊ शकेल.. तो जेल मध्ये जाऊ शकेल... ताराला नाही नाही त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील ....नको नको त्या तपासण्या होतील....हे सगळं झाल्या नंतरचा मनस्ताप तो  वेगळाच....

तुमचं जर एखाद्या व्यक्ती वर खरं खुरं प्रेम असेल तर तुम्ही त्याला अश्या पद्धतीने जेल मध्ये अडकवणार नाहीत... बरोबर ना....

अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे गुगल चा वापर करून कुठल्याही प्रकारचे मेडिसिन घेणे किंवा प्रयोग करने असले उपाय तुम्ही करू नका.... ह्या बद्दल माझ्या पेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने माझी मैत्रीण तुम्हाला सांगू शकेल.....

हे घ्या मॅडम!!आता तुम्ही थोडक्यात मार्गदर्शन करा... असं म्हणून गीतिकाच्या मम्मीने डॉक्टरच्या हातात माईक दिला...

मैत्रिणींनो मी काही तुम्हाला जास्त बोर करणार नाही. फक्त काही महत्वाचे मुद्दे सांगते.... आपल्या हॉस्टेल वर सर्वच unmarried आहेत की कुणी लग्न झालेल्या देखील आहेत...

रेक्टर मॅम : काही लग्न झालेल्या देखील आहेत....

डॉक्टर : तुम्हाला माझ्या मैत्रिणीने अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं आहे... त्यात कुठली कसर सोडली नाही... त्यात सांगताना तीने एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे गुगल पाहून गोळ्या, उपचार  घेऊ नका...

कसं आहे ना प्रत्येक औषधाला साईड इफेक्ट असतात... आम्ही ज्या वेळेस कुठल्याही पद्धतीची औषधं तुम्हाला लिहून देतो तेव्हा त्याचा तुम्हाला त्रास तर होणार नाही याचा अभ्यास आम्हाला असतो....

थोडं सोपं करून सांगते... कुठल्याही दोन मुली उभं रहा... आता समजा या मुलीना पाळी येत नाहीये आणि  मी काही पाळी येण्यासाठी औषधं लिहून दिली....ती या दुसरीला लागू होतीलच असे नव्हे... सांगायचा उद्देश हा की या पहिल्या मुलीला पाळी न येण्याचे कारण वेगळे असु शकते आणि दुसऱ्या मुलीला वेगळे... मग एकाच प्रकारचे औषध त्यांना कसं काय लागू होईल....

अश्यातच तुम्ही ईकडे तिकडे टीव्ही वर किंवा गुगल वर  पाहून जर औषधं घेतली तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील....

त्या पेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य नाही का??

मला माहिती आहे अगदीच पहिल्या भेटीत कदाचीत तुम्ही मला तुमच्या समस्या काही मोकळेपणाने सांगणार नाही... म्हणून मी ठरवलं आहे दर तीन महिन्यांनी एकदा तुमच्या हॉस्टेलला भेट द्यायची... आणि तुमच्यासाठी मोफत शिबीर घ्यायचं.... आज तर मी सगळ्यांसमोर बोलत आहे पण तेव्हा प्रत्येकीशी पर्सनल बोलेल....

या वेळेस उशीर झाल्या मुळे फक्त ज्यांना काही खरंच अडचणी आहेत त्यांनी मला भेटा... कार्यक्रम संपल्यावर तुमच्यासाठी मी तास भर थांबायला तयार आहे....

डॉक्टर चे ते वाक्य ऐकताच सगळ्या मुलींनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.....

रेक्टर मॅम ने आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले...

आणि सगळ्या मुली मेस मध्ये जेवायला गेल्या...

क्रमश :
भाग 68 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या