नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
गीतिकाची मम्मी आता घरी जाण्यासाठी निघाली ...
गीतिकाची मम्मी : गीतिका!! बेटा तुमचा स्किट खूप छान झाला... I am proud of you girls...
नेहा :काकू तुमचं आणि डॉक्टर काकूंचं देखील आम्हाला हवं तसं मार्गदर्शन मिळालं...
गीतिका : हो मम्मा!!आम्हाला तर आज खूप proud फील होत आहे....
गीतिकाची मम्मा : चला आम्ही निघतो.... डॉक्टर काकूंना उद्या सकाळीच ओ पी डी आहे.... बाय द वे गीतिका!!जरा इकडे येतेस का??
गीतिका : हो मम्मा!!
नेहा : चला गं काकू गीतिकाशी बोले पर्यंत आपण रूम मध्ये जाऊ....
गीतिकाची मम्मा : गीतिका!! रशीद ची बहीण अगदीच योग्य वेळेला माझ्याजवळ आली... तीने अजूनही एक दिवस उशीर केला असता ना तर तिचं नक्कीच काहीतरी बरं वाईट झालं असतं.... पण ह्या रशीदला माझ्याबद्दल कशी काय माहिती होती...
गीतिका : अगं मम्मा!!तू या कार्यक्रमा साठी येणार आहेस हे हॉस्टेलच्या सगळ्या मुलींना माहिती झालं होतं... सलमा दीदी त्याची बॅचमेट आहे.कदाचीत तीने त्याला तुझ्याबद्दल सांगितलं असावं.. काही का असेना मम्मा रशीदला तूझ्यामुळे खूप मोठी मदत मिळाली... मला त्याने लागलीच येऊन सांगितलं सुद्धा की तूझ्या एका कॉन्सेलिंग सेशन ने तिच्यात किती फरक पडला आहे ते....
यास्मिन : नेहा!! मैने गीतिका के मु से रशीद का नाम सुना... ये दोनो रशीद के बारे मे कुछ बात कर रहे है |
नेहा : यास्मिन!! हम फिल्मो मे देखते है की जो कोई प्यार मे होता है उसे वो जिसे प्यार करता है वही हर जगह दिखाई देता है |लेकिन तुम्हे तो उसका नाम सुनाई दे रहा है |
यास्मिन : अरे नही नेहा!! मैने सच मे रशीद का नाम सुना
नेहा : अच्छा बाबा!! तूम उसे आने के बाद पूछ लेना....
कार्यक्रम अगदीच सुंदर झाल्यामुळे हॉस्टेलच्या सगळ्या मुली खूप खूष झालेल्या होत्या.. त्यात मेसमध्ये देखील जेवणाचा फिस्ट सहीत स्पेशल मेनू असल्यामुळे सगळ्यांचे जेवण देखील छान झाले होते....
प्रज्वल आणि रोहनच्या मोबाईल मेसेंजरची रिंगटोन वाजली....
दोघांनीही मोबाईल बघितला 😳,
रोहन : प्रज्वल!! हा व्हिडिओ बघ...
प्रज्वल : तुला पण आला.... मला सुद्धा आला आहे हा व्हिडीओ...
रोहन :लेडीज हॉस्टेल ची कुठलीही बातमी लपत नाही... या मुलींच्या हॉस्टेल डे सेलेब्रेशनचे स्किट किती लवकर viral झाले नाही....
प्रज्वल : व्हिडीओ तुला कुणी पाठवला आहे..
रोहन : अरे आमच्या मुलांच्या ग्रुप मध्ये टाकला आहे... दुसरा तिसरा कुणी नाही झेंडू ने share केला आहे...
प्रज्वल : अच्छा म्हणजे याचा सोर्स अंजली आहे... कमाल आहे त्या अंजलीला व्हिडीओ viral करण्याची ईतकी घाई का झाली आहे...
रोहन : काही नाही रे...मला तर वाटतं की अंजलीला उगाचच चर्चेत राहण्याची सवय आहे...हे बघ प्रज्वल सायली 😍😍... समजूतदार आईचा रोल केला आहे...
प्रज्वल : माझी अनुया,खडूस घरमालकीण पण किती गोड दिसत आहे 😍😍... पण आता हा व्हिडीओ पूर्ण कॉलेज मध्ये viral झाला असेल... नाही का?
रोहन : हो ना... तसं यात काही गैर दिसत नाही... पण तारा 🤔 इथे तर तिच्या नावाचा उल्लेख आहे... ते जरा अयोग्य वाटत आहे...
प्रज्वल :अरे हो यार... हे तर माझ्या लक्षातच नाही आलं... आपल्या कॉलेज मधील सज्जन पणाचा आव आणणारी मुले... त्या ताराचा नको तितका उद्धार करतील...मी अनुयाशी बोलू का?..
रोहन : पण या मुळे कदाचीत अनुया टेन्शन मध्ये येईल??
प्रज्वल : हो ना... म्हणून मी विचारच करत आहे... पण तरी देखील या चौकडी पर्यंत ही गोष्ट पोहोचायला हवी... त्यांनी चांगल्या इंटेंशन नी केलेलं काम आता कश्या पद्धतीने कॉलेज मध्ये पसरत आहे...
रोहन : ती" अंजली "चांगलीच खराब निघाली.... नाही का?
प्रज्वल : आपल्याला अंजलीला संपूर्ण पणे दोष नाही देता येणार... कारण तीने हा व्हिडीओ तिच्या बॉयफ्रेंडला पाठवला... कदाचीत अनुयाने देखील मला पाठवला असता... पण खरा viral केला तो झेंडूने ... झेंडूचे इंटेंशन खराब आहे...
मी जरा अनुयाच्या कानावर घालतो... बघूयात ती काय म्हणते ते??
असं म्हणून प्रज्वलने अनुयाला फोन लावला....
अनुया : हॅलो प्रज्वल!! ईतक्या उशिरा फोन 📳 झोपला नाहीस अजून 🤔
प्रज्वल : अगं अनुया!!एकाच वेळी किती प्रश्न विचारणार आहेस तू?🤔 मला थोडं बोलू देशील का?? जरा महत्वाचे बोलायचे होते....
अनुया : हं... बोल...
प्रज्वल : तुमच्या स्किट चा व्हिडिओ....
अनुया : सॉरी प्रज्वल!!मी तो व्हिडीओ तुला पाठवू शकत नाही... कारण मला मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्यायचा नाहीये....
प्रज्वल : काय करू अनुया तुझं मी आता😡....
अनुया : का काय झालं??
प्रज्वल : तो व्हिडिओ मुलांपर्यंत पोहोचला सुद्धा....
अनुया : काय 🤔?? असा कसा पोहोचला??... आम्ही तर सर्वांनी ठरवलं होतं की अगदी कुणालाच हा व्हिडीओ पाठवायचा नाही... ओ got it... हे काम नक्कीच त्या अंजलीने केले असणार.... त्या झेंडूला हा व्हिडीओ पाठवला असणार..... अरे प्रज्वल!!ती तारा सध्या कुठल्या मनस्थितीतुन जात असणार... तीला जर कळाले की हा व्हिडिओ कॉलेज मध्ये viral झाला तर ती परत कॉलेज मध्ये येऊ शकेल का??प्रज्वल मी फोन 📳ठेवते... बघते काही करता येतं का ...
अनुया : नेहा!! उठ
नेहा : झोपू दे ना यार... खूप थकवा आला आहे ..
अनुया : नेहा!! लवकर उठ... आपल्या स्किटचा व्हिडीओ मुलांमध्ये viral झाला आहे....
नेहा : काय 😳
अनुया : तुला आठवतं अंजलीने तिच्या रूम पार्टनरला व्हिडीओ शूटिंग घ्यायला लावली होती...असं म्हणून प्रज्वल अनुयाशी काय काय बोलला हे अनुयाने नेहा ला सांगितले ...
नेहाने दोन मिनिट विचार केला आणि विश्वासला फोन लावला
क्रमश :
भाग 69 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©® swanubhavsaptarang
0 टिप्पण्या