आमच्यासारखे आम्हीच (भाग 69)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

नेहा : हॅलो विश्वास दादा!!

विश्वास : हॅलो चिमणे!!काय गं... सगळं काही ठीक आहे ना... इतक्या उशिरा फोन केला आहेस ते...

नेहा : हो विश्वास दादा!!जरा गोंधळ झाला आहे....असं म्हणत नेहाने विश्वास ला स्किट च्या व्हिडिओ बद्दल सांगितले...

बोलता बोलताच विश्वासने त्याचा मोबाईल डाटा ऑन केला...त्याच्या ग्रुप वर त्याला तो व्हिडीओ दिसला...

विश्वास : नेहा!! मला काय करायचं आहे ते समजलं आहे तू फोन ठेव.... चल बाय...

फोन ठेऊन विश्वासने विन्याला आणि त्याच्या तीन चार मित्रांना  उठवले....

विश्वासने विन्या ला आणि बाकी गँग च्या मुलांना हे व्हिडीओ कोण viral करत आहेत त्यांना ते डिलीट for everyone हा प्रकार करायला सांगा... व्हिडीओ viral होऊन अर्धा तास झाला आहे... आपल्या जवळ वेळ कमी आहे.... मी जरा त्या विकी कडे बघतो....

विश्वास डायरेक्ट विकीच्या रूमकडे गेला .. विकी झोपेतच होता...धाडधाड त्याच्या रूमच्या दरवाजावर  थापा मारल्या....
विकीने घाबरूनच दरवाजा उघडला...

विश्वास : ए विकी आताच्या आता हा व्हिडीओ डिलिट for everyone कर... आणि कोण कोण फॉरवर्ड करू शकतं त्यांना वॉर्निंग टाक.... की जर हा व्हिडीओ फॉरवर्ड किंवा share केलेला आढळून आला तर गाठ माझ्याशी आहे...
विश्वासने विकीकडे असलेला आणि त्याने share केलेला व्हिडीओ डिलीट करायला लावला होता.. आणि त्याच्या मित्रांचे नंबर घेऊन विश्वासने फोन वरच सगळ्यांना वॉर्निंग दिली...

विन्या ने बाकी मुलांना फोन करून, रूम मध्ये जाऊन, धमाकावून व्हिडिओ viral होण्यापासून थांबवले....

विश्वास आणि विन्याने संपूर्ण शहानिशा करून घेतल्यावर विश्वासने नेहाला फोन लावला....

नेहा : हॅलो!!
.
विश्वास : चिमणे!! काम झालं बर का?? आता व्हिडीओ viral होणारही नाही आणि आधी जे viral झाले होते ते देखील डिलीट झाले आहेत. बरं झालं नेहा!! तू अगदी वेळेवर सांगितलंस... म्हणून सगळं लवकरच आटोक्यात आणता आलं...

नेहा : थँक्स अ लॉट विश्वास दादा...तू खूप मोठं काम केलंस नाहीतर तारा खूप हर्ट झाली असती,..

विश्वास : अगं चिमणे!! पण हे असं कसं झालं... शक्यतोवर असल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ बनवायचेच नाही ना... म्हणजे मग viral होण्याचा प्रश्नच येत नाही....

नेहा : हो रे दादा!! आम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं नाही... तसं ठरलं ही होतं... पण ती अंजली आहे ना तीने तिच्या रूम पार्टनरला व्हिडीओ शूटिंग करायला लावली...अन हा सगळा घोळ झाला....

विश्वास : असं आहे का?? या अंजलीला जरा बघावं लागेल मग....

नेहा : म्हणजे??😳 तू आता काय करणार आहेस 🤔

विश्वास : काही नाही गं चिमणे!!काही काळजी नको करू..मी काही करणार नाही....चल सुखाने झोप आता... आधीच खूप उशीर झाला आहे...

सकाळी उठल्या उठल्या अंजलीने तीचा मोबाईल चेक केला.... विकी ने काही मेसेज करून डिलीट केलेले होते...

अंजली : विकी चे डिलीट केलेले मेसेज??🤔 विकी तर असं कधी वागत नाही... असा विचार करून अंजलीने विकीला फोन 📳लावला...

अंजली : हॅलो विकी!!

विकी : हॅलो अंजु!!

अंजली : काय रे?? तू मेसेज केलेले आणि डिलीट केलेले दिसत आहेत....

विकी : हो ते तूझ्या व्हिडीओ बद्दल सांगायचं होतं... असं म्हणून विकीने रात्री काय घडलं ते अंजलीला सांगितलं....

अंजली : असं आहे का?? त्या विश्वासला नेहाने सांगितलं असेल.. आज काल फार त्या विश्वास दादाच्या नावाने  उड्या मारत असते.... त्या नेहाला जरा बघावं लागेल 😡

विकी : अंजु!!कृपा करून तुमचा हॉस्टेल डे हा विषय नकोच... नाहीतर तो विश्वास माझी वाट लावेल....

अंजली : बरं बाबा!! मी हॉस्टेल डे च्या बाबतीत नाही काही करणार...

नेहा :चला आज कॅन्टीन मध्ये नाश्ता करू.. खूप भूक लागली...

गीतिका : हो तसंही आपण सकाळचा नाश्ता फार कमी वेळेस कॅन्टीन मध्ये करतो... ओ... अनुया सायली नेहा तुम्ही जरा कॅन्टीन मध्ये बसा मी जरा रशीद शी बोलून येते...

गीतिका रशीद जवळ गेली

नेहा :सायली!! गीतिकाने तुला काही सांगितलं का??

सायली : कश्या बद्दल रशीद बद्दल का?exact काय आहे ते नाही सांगितलं... पण मला ती म्हणाली की रशीद चा काही फॅमिली मॅटर आहे... पण माझ्या आईच्या इथीक्स मुळे मला काही तुम्हाला सांगता येत नाही आणि त्याला स्वतःला तो गोपनीय ठेवायचा आहे.

नेहा : अच्छा असं आहे तर... पण या सर्वामुळे यास्मिन गीतिकाबद्दल गैरसमज करून घेत आहे त्याचं काय??

अनुया : हं... आता तू बघ गीतिका रशीदला किती वेळेस भेटत आहे... यास्मिनच काय कॉलेजची कुठलीही व्यक्ती त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेणारच ना....

नेहा : मला वाटतं यावर एकच उपाय आहे की रशीद ने यास्मिनला तो गीतिकासोबत काय बोलतो हे सांगायला पाहीजे....

सायली : नेहा!! यास्मिनने आधी रशीदला दिलेला नकार त्या मुळे आता तो जरा भाव खाणारच ना... तसंही तो मला काही लंपट वाटत नाही... चांगला वाटतो...

अनुया : सायली!! हे मात्र खरं बोललीस तू....रशीद मला देखील चांगला वाटतो... तसंही त्या सलमा दीदी ने यास्मिनला रशीद बद्दल तो चांगला आहे असं  सांगितलं होतच ना...

लवकर ऑर्डर करा गं... मला जाम भूक लागली आहे.... गीतिका तिघींजवळ येऊन बसली....

यास्मिनच्या नजरेतून आजही गीतिका आणि रशीद सुटलेले नव्हते.... आता स्किटही होऊन गेले होते... कुठलाही समजूतदार पणाचा आव आणण्याची गरज उरली नव्हती...

आपल्या प्रश्नाला काडीमात्र उत्तर मिळत नसल्याने यास्मिन मात्र आता गीतिकावर जाम चिडली होती....
क्रमश :
भाग 70 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇http://www.swanubhavsaptarang.com/2020/10/blog-post.html

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे
©® swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या