आमच्यासारखे आम्हीच (भाग 70)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

क्लास मध्ये आता यास्मिनने ठरवून या चौघी पासून दूर बसणेच पसंत केले.....
चौघीनाही यास्मिन मधील हा बदल प्रकर्षाने जाणवला...

अंजली : काय गं गीतिका!! तू त्या यास्मिनला आज काय केलं आहेस?? बॅघ ती कशी दूर जाऊन बसली आहे...

गीतिका : मी काही नाही केलं बाई....

अंजली : असं कसं काही नाही.. पूर्ण कॉलेजला माहिती झालं आहे की....

गीतिका : 🤔 काय??

अंजली : तुझं आणि रशीदचं जमलं ते...

गीतिका : अंजली!!काहीतरीच काय बोलतेस तू??😡...

अगं मी काहीतरीच बोलत असेल तर तू हिला विचार?? हो की नाही गं... बाजूला बसलेल्या मैत्रिणीला अंजलीने विचारले....

तीने होकारार्थी मान हलवल्यावर गीतिका म्हणाली पोरींनो ही अंजली आहे ना... नेहमी फालतूचे विचार करत असते... तिच्या डोक्यातच घाण आहे... रशीद फक्त न फक्त आपला सिनियर आहे...

अंजली : हो का... मी फालतू काय?? अन तू... माहिती न कुणाच्या नादी लागली होतीस ते.... त्या गीतेश??

नेहा : अंजली तो विषय काढायचा नाही...

अंजली :हो का??अन का गं म्हणे आपला सिनियर आहे.... सिनियर काय रोज क्वीन बनवत असतात काय??

गीतिका : अंजली तू शांत बस बरं...

अंजली : मला शांत करून काय होणार आहे... कॉलेज मध्ये चर्चा झाली ती झालीच ना.....

यास्मिनला रशीद आणि गीतिका सोबत पाहून गीतिका चा ईतका राग 😡आला होता....ती त्या दोघांमध्ये चाललेला वाद बघून थोडीशी सुखावली 😊होती....

यास्मिनचा खुललेला चेहरा पाहून अंजलीला आणखी जोर चढला.... आणि अंजली म्हणाली... यास्मिन!!तुम्हे भी लगता है ना की गीतिकाने तुम्हारे साथ ये अच्छा नही किया...अगर गीतिका के मन मे कुछ ऐसा वैसा नही है तो फिर वो तुम्हे क्यूँ नही बता पा रही है?

अंजलीने बरोबर निशाणा साधला होता आता यास्मिन देखील आपल्या कडूनच बोलणार कारण शत्रू चा शत्रू हा मित्र असतो नाही का??असा विचार करून अंजली अजूनच यास्मिनचं नाव घ्यायला लागली....

आता या चौघीचं लक्ष यास्मिन कडे लागलं.... तिच्या चेहऱ्याच्या हावभावामुळे ती अंजली कडून बोलणार याचीजणू खात्रीच वाटायला लागली होती...

यास्मिन : अंजली!! तुम्हारी बात हो रही थी ना... तूमने मुझे क्यूँ बीच मे लाया...

अंजली : अरे यास्मिन!!ऐसे क्यूँ कर रही हो... ये तो ऐसे हुआ.. ज्याचं करावं भलं ते म्हणतं आपलंच खरं...

यास्मिन : क्या कहा!! इसमे मेरा क्या भला कर रही थी तूम??

अंजली : क्यूँ?? तूम नही जानना चाहती की रशीद??..

यास्मिन : नही... इसमे अब रशीद कहा से आ गया...

अंजली : अच्छा, इतना तूम उनकी साईड ले रही हो... तो फिर इतना दूर जाके क्यूँ बैठी??

यास्मिन : मेरी मर्जी🤷.... मै यहाँ बैठु नही तो वहा बैठू...उस्का कुछ भी मतलब निकालने वाली तूम कोन होती हो....

अंजली : यास्मिन!! तूम पछताओगी ....जब ये सब तुम्हारे से धोकाधडी करेंगे ना तब मेरे पास मत आना....

चौघीही जणी यास्मिन आणि अंजलीचा वाद बघत होत्या... यास्मिन आपल्या बाजूने बोलत आहे हे ऐकून सुखावल्याही होत्या...

यास्मिनला सांगून टाकावं का सर्व... म्हणजे यास्मिनचा आपल्यावर कणभरही रोष राहणार नाही...असं गीतिकाला क्षणभर वाटूनही गेलं... पण काय करणार??
आईचे प्रोफेशनल इथीक्स आणि रशीदने आपल्यावर ठेवलेला विश्वास या दोघांनाही तडा कसा जाऊ देणार?? काय यार हे माझ्यासोबतच का? नेमकं त्या रशीदची बहीण काय निघावी.....
बरं रशीदला यास्मिन अशी वागत आहे हे सांगणं पण योग्य नाही... काय करावं काहीच सुचेनासे झाले आहे...

नेहा : गीतिका!! गीतिका!!अगं कुठल्या तंद्रीत आहेस ...कॉलेज मधून हॉस्पिटल मध्ये येईपर्यंत तू एक शब्दही बोलली नाहीस... मला तर वाटलं होतं की तू यास्मिन ला थँक्स म्हणशील....

गीतिका : अं... थँक्स??🤔 अरे हो...कुठे आहे यास्मिन??

नेहा : अगं ती कधीची गेली.... जरी तीने अंजलीला काही बोलू दिलं नाही तरी तीचा आपल्यावर पण राग असावा असं तिच्या वागण्यावरून स्पष्ट दिसत होतं....

गीतिका : नेहा!!मी काय करू?? माझी तर परिस्थिती ईकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे....

नेहा :गीतिका!!जाऊ दे... तुझं मन साफ आहे ना... मग आज झालेला गैरसमज उद्या दूर होईल.... त्याची काळजी तू नको करूस... सगळ्यात महत्वाचे म्हणजे अंजलीच्या शब्दांना यास्मिन बळी नाही पडली.... खरं सांगावं तर तिच्या बिचारीच्या मनात काय चलबिचल चालू असेल ना हे फक्त न फक्त तिलाच माहिती....

गीतिका : हो... पण मी देखील बांधील आहेच ना... मला सांग ना नेहा!!आतापर्यंत मी तुमच्या पासून कधी काही लपवले का? गीतेश सरांबद्दल आपली मते मतांतरे होती म्हणून आणि त्या वेळेस अंजलीचा प्रभाव असताना देखील अनुयाला का होईना मी सांगितले होतेच ना...

नेहा :गीतिका!!तू खूपच इमोशनल झालीस...अगं नको काळजी करू सगळं काही ठीक होईल.....

गीतिका अक्षरशः रडकुंडीला आली होती....तीला नुसतं रडावसं वाटत होतं... तितक्यात अचानक यास्मिन गीतिकाच्या रूम मध्ये आली...

ओ गीतिका!! आय लव्ह यू...आय लव्ह यू सो मच....यास्मिन धावत पळतच गीतिकाच्या रूम मध्ये आली...गीतिका मुझे रोक लो नही तो मै खूशी से पागल हो जाऊंगी.....

गीतिका : 😳 यास्मिन!! तू ठीक तो है ना... तूम ऐसे बर्ताव कर रही हो की जैसे रशीदने तूझे फिरसे प्रपोज किया...

रशीद : 🙄 वो क्या प्रपोज करेगा... प्रपोज तो अब मै उसे करुंगी 😉....

गीतिका : मतलब???

यास्मिन : मुझे आज क्लास मे तेरा बहोत ही गुस्सा आया था

गीतिका : पता है 🙄

यास्मिन : इसीलिये मैने गुस्से गुस्से मे रशीद को फोन लगाया...

क्रमश :
भाग 71 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या