नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
यास्मिन :मैने रशीद को डायरेक्ट पूछा... क्या हुआ तूम ऐसे कैसे कर सकते हो.... तूम और गीतिका...मेरा इतना सुनीतेही रशीद आगे बोला... यास्मिन!! मुझे नही लगा की तूम भी मेरे बारे मे ऐसा सोचेगी.... मै और गीतिका बस दोस्त है...
फिर मैने उसे पूछा की तुमने तो गीतिकाको रोज क्वीन बनाया था ना.... फिर मै ऐसा वैसा नही सोचुंगी तो और क्या सोचुंगी...
तो रशीदने कहा... की मैने उसे लटकाके रखा था... और बादमे एकदम से नही बोला इसीलिये वो मुझ पे गुस्सा हुआ था....
फिर मैने उसे सॉरी कहा.....तो उसने कहा की दोस्ती मे नो सॉरी नो थँक यू ओके....
गीतिका!! सॉरी यार मै तूम पे फालतू का गुस्सा हो रही थी....
गीतिका : चलो यास्मिन!!देर आये दुरुस्त आये....मेरा बहोत बडा टेन्शन अब दूर होगया है | पर यास्मिन!!और कुछ बात हुई की नही 😉
यास्मिन : अरे हा गीतिका!! उसने कहा की तुमने स्किट मे मस्त acting की.... मैने पूछा तुम्हे कैसे मालूम?🤔तो उसने कहा की मैने तुम्हारा व्हिडिओ देखा... लेकीन पता नही बादमे जिसने share किया था उसने डिलीट कर दिया.
वो ना ये ऊस फुलझडी का काम था... उसने उस झेंडू को भेजा था असं सांगून स्किटच्या व्हिडीओ बद्दल गीतिकाने यास्मिनला सांगितलं...
यास्मिन :सच मे यार नेहा बहोत ही ग्रेट है | उसके उमर के हिसाब से वो सच मे बहोत ही ज्यादा mature है | जो हम करनेकी सोचते है |नेहा बिना डरे ही कर लेती है | नेहा जैसी दोस्त जिसे मिली उसके साथ कभीभी गलत नही हो सकता...
गीतिका : ये तुमने सही कहा......
सायली :अरे वा यास्मिन!!तूम और गीतिका... अच्छा लग रहा है की तूम हस के बात कर रही हो.... रशीदने फिरसे प्रपोज किया क्या??
यास्मिन : कहाँ??शायद अब मुझेही पहल करनी पडेगी😒...
गीतिका : यास्मिन!! सिर्फ पंधरा दिन बाकी है | तुम्हे जल्द ही पहल करनी पडेगी...
यास्मिन : पंधरा दिन... मतलब...
गीतिका : भूल गयी क्या... पंधरा दिन के बाद पी.एल. स्टार्ट होने वाली है |
यास्मिन :अरे हा...
रोहन : प्रज्वल!!पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस बाकी आहेत नंतर पी.एल.स्टार्ट होणार आहे म्हणे...
प्रज्वल : हो रे...आपली पी एल मध्येच तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ भेटतो.....
रोहन : त्या आधी मला असं काहीतरी करावं लागेल की पी एल मध्ये सायली मला मीस करेल....
प्रज्वल : हं.... काय माहिती मी अनुया शिवाय एक महिना कसं काय राहू शकेल??
रोहन : अन मी सायली शिवाय??😒
प्रज्वल : रोहन!!आता तू काय करणार आहेस??
रोहन : तेच तर... काय करावं तेच सुचत नाहीये.... अरे प्रज्वल ह्या अश्या खेळपेक्षा डायरेक्ट प्रपोज करणं बरं... एक घाव दोन तुकडे...
कोण कुणाला प्रपोज करणार आहे? जरा आम्हाला तरी कळू द्या...विकीने त्याच्या केसांवरून हात फिरवत यांच्या रूम मध्ये एन्ट्री मारली....
विकीला बघताच रोहनने डोक्यावर🤦♂️ हात मारला... हा विकी मला काहीच करू देणार नाही असं वाटत तर होतं पण आता साधा विचारही करू देत नाहीये....
विकी :अरे रोहन!!काय विचार करतोस?? कुणाला प्रपोज करणार आहेस?? मी देतो की टिप्स... ती जी कुणी असेल ती तुला लागलीच होकार देईल... सांग ना....
रोहन : काय रे प्रज्वल!!🤔 सांगून टाकू का ह्याला...
प्रज्वल :😳 काय?? विकीच्या नकळत प्रज्वलने रोहनला नकारात्मक खुणावलं...
रोहन : काय?? सांगून टाकू... मला ना... मला ना... दीपिकाला प्रपोज करावंसं वाटतं....
विकी : दीपिका 🤔 कोण दीपिका?? आपल्या क्लास मध्ये तर कुणीच दीपिका नाहीये... दुसऱ्या क्लास मध्ये आहे की कुणी सिनियर आहे... अं अं अं....🙄
रोहन : अरे विकी!!असं काय करतोस तू पण तर ओळखतो... दीपिकाला...
विकी : काहीही काय म्हणतोस रोहन!! मी नाही ओळखत कुठल्या दीपिकाला....
रोहन : चल लाव पाचशे पाचशे ची शर्यत....
विकी : हं... लाव शर्यत!! 😏 मी नाही ओळखत म्हणालो ना....
रोहन : तू नाही ओळखत... दीपिका पदुकोण ला...
विकी : काय 😳?? काहीही काय रोहन??
रोहन : चल काढ पाचशे रुपये....
विकी : तू काय दीपिका पदुकोणला प्रपोज करणार होतास??
रोहन : तू रूम मध्ये येण्यापूर्वी मी फक्त विचार करत होतो... पण तू भेटल्यावर खात्रीच झाली.... की तूझ्या मदतीने मी नक्कीच दीपिकाला प्रपोज करेल....
रोहन!!आज तू घेतलेली दिसत आहे....
मी नंतर येतो असं म्हणून विकीने काढता पाय घेतला....
रोहन :अरे विकी कुठे चालला आहेस... थांब थांब i need you...
प्रज्वल : 😂😂😂हा हा हा रोहन ... मस्त पकवलं आहेस त्याला...आज पहिल्यांदा त्याचा डाव त्याच्यावरच उलटला...
रोहन : 😂😂😂 मग नाही तर काय... उठसूट आपल्या रूम मध्ये येतो आणि आपल्याला पकवत असतो... आता आपल्या रूम मध्ये येताना तो झेंडू जरा विचार करूनच येईल
प्रज्वल : काही नाही रे रोहन!!असल्या व्यक्ती ना कधीच सुधरत नसतात....तो परत उद्याच ईथे हजर होतो की नाही ते बघ....
रोहन : हं... तुझंही खरं आहे म्हणा...आता पर्यंत कितीदा तरी आपण त्याच्याशी वाकडं बोललो आहे... तरी देखील आपल्या दोघांचेही अपडेट घ्यायला तो येतोच ना.... आपण बाहेर रूम करून राहात असलो तरीही ह्या विकी मुळे काहीच गोपनीय रहात नाही..
क्रमश :
भाग 72 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या