नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
रोहन : प्रज्वल!! मला सायली साठी काहीतरी सुचव ना....
प्रज्वल : तुझं प्रोजेक्ट सबमिशन चं काय?? त्या साठी मदत घेता येईल की..
रोहन : तुला वाटतं का ही आयडिया मला सुचली नसेल...सायलीचं प्रोजेक्ट वेगळं आहे ना....
प्रज्वल : हं... तरीही विचारायचं... तुमचं प्रोजेक्ट कसं करत आहात मला तर काहीच सुचत नाहीये...काय रोहन?? तुला पण साध्या साध्या गोष्टी सांगाव्या लागतात...
रोहन : ते काय आहे ना प्रज्वल!! हा माझा पहिलाच अनुभव आहे ना 😉
प्रज्वल : असं का... जसं की आम्हाला खूप अनुभव आहे😜....
रोहन : 😜 मला काय माहिती....
प्रज्वल : बरं?? असं का....तू असं म्हणत आहेस की मला खुप अनुभव आहे😡....
हं...माझ्या पेक्षा जास्त अनुभव तर आहेच ना...तूम तो मेरे गुरु हो...सिर्फ गुरु ही नही लव्हगुरु हो😍....प्रज्वलचा चिडलेला चेहरा पाहून रोहन म्हणाला
प्रज्वल : चढवा चढवा... अजून हरबऱ्याच्या झाडावर चढवा....
रोहन : तसं नाही रे प्रज्वल!!खरंच....रागावणार नसशील तर एक विचारू का?
प्रज्वल : विचार ना...
रोहन : तुझं आणि अनुयाचं जमल्यापासून मी बघतोय की तुम्ही एक तर फोन वर बोलता,लायब्ररी मध्ये किंवा कॉलेज कॅन्टीन मध्ये भेटता... तुम्हा दोघांना वाटत नाही का की बाहेर डेट करावी... बाहेर कुठेतरी भेटावं....
प्रज्वल : असं कसं वाटत नाही....मी पण तर माणूसच आहे ना... पण रोहन!! मी अनुयाला मोठे मोठे स्वप्न नाही दाखवू शकत... आजही जरी आमचं जमलं असलं तरी मला एक अनामिक भीती आहेच... त्यात अनुया ठरली धनाड्य माणसाची मुलगी... उद्या जर तिच्या वडिलांपर्यंत माझ्या अफेअरची गोष्ट पोहोचली तर ते काय रिऍक्ट होतील??
आणि तसंही अश्या प्रकारची डेटिंग मला तरी परवडणारी नाहीये.... मात्र मी,पी.एल. च्या आधी एकदा अनुया सोबत बाहेर जाणार आहे... तुला माहिती आहे रोहन!! अनुयाचा सगळ्यात चांगला गुणधर्म काय आहे??
रोहन :काय?🤔
प्रज्वल : ती कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट करत नाही....ती मला कधीच म्हणत नाही की आपण बाहेर भेटू... ईतकं जास्त वेळ भेटू किंवा ईतका जास्त वेळ फोन वर बोलू... माझ्याशी बोलताना ती तिच्या श्रीमंतीचा कधीच आव आणत नाही....
रोहन : 😳 ग्रेट.... प्रज्वल!!मग खरंच तीची कमाल आहे.
. आपण तीची बर्थडे पार्टी बघितली ना...तीने त्यासाठी एक लाख रुपये आरामात खर्च केले असतील....
प्रज्वल : हो ना... म्हणून ज्या वेळेस मी अनुयाचा विचार करतो मला सगळ्याच गोष्टी अशक्य वाटायला लागतात.. पण जेव्हा अनुया समोर येते... मला त्या सगळ्या विचारांचा विसर पडतो....पण भीती वाटतच रहाते..तितक्यात प्रज्वलचा फोन 📳वाजला....बघ रोहन!!मनापासून आठवण केली की कसा फोन 📳आला....
बरं तू बोलून घे... मी जरा फेरफटका मारून येतो.....
फेरफटका मारता मारता सायलीला ही पिंग करावं असा विचार करून रोहनने त्याचा फोन 📳खिश्यात टाकला आणि रूमच्या बाहेर पडला....
रोहनचा फोन??🤔 आजकाल रोहन कसा काय फोन📳 करत आहे असा विचार करत करत सायलीने फोन उचलला....
सायली : हॅलो 📳
रोहन : हॅलो 📳
सायली!!तुझं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलं आहे..
सायली : जवळ जवळ होत आलं आहे....
रोहन : मला उद्या बघायला मिळेल का??
सायली : अरे पण तूझा प्रोजेक्टचा विषय वेगळा आहे ना..माझं सॉफ्टवेअर चं आहे आणि तुझं काहीतरी मशीनचं आहे ना...
रोहन : हो गं ..पण मी प्रोजेक्ट ची अजून सुरुवातही केली नाही... मला जाम टेन्शन येत आहे... म्हटलं तुमचे प्रोजेक्ट बघून काही आयडिया येते का ते बघणार आहे....
सायली : हो गीतिका पण तुमच्या टीम मध्ये आहे ना. ती पण हेच म्हणत होती....
खरं तर प्रज्वल ने रोहनला प्रोजेक्टची बरीचशी आयडिया दिली होती.... पण सायलीशी फोन व📳र बोलण्यासाठी हा बहाना रोहनने केला होता..
पण याची तिळमात्रही शंका सायलीला आली नाही.....
यास्मिन सतत रशीदचा विचार करत होती.... आता बस्स झालं आपल्या मनातलं रशीदला सांगून टाकू... पण सांगायचं तरी कसं?? डायरेक्ट फोन करू की एखादा मेसेज करून टाकू... सततच्या विचाराने यास्मिनच्या डोक्यात नुसता भूगा झाला होता....
करू का नको करू, करू का नको करू असा विचार करत यास्मिन ने एक i love you चा मेसेज असणारी आणि एक i miss you चा मेसेज असणारी image थरथरत्या हाताने रशीदला व्हाट्सअँप वर सेंड केली.
मेसेज केल्या केल्या तीला दोन्हीही इमेजेस वर दोन निळ्या right चीन्ह दिसलं देखील..
ते पाहताच आता यास्मिनला धडधड व्हायला लागलं होतं...
आता रशीद काय म्हणेल?? याची भीती तीला वाटायला लागली होती... आपण इमेजेस पाठवल्या याचा तीला पश्चाताप व्हायला लागला होता.... पण रशीदच्या विचाराने डोकंच काम करत नव्हतं.... तश्यातच आपण हा मेसेज केला.... असा विचार करत असताना रशीदचा यास्मिनला फोन आला....
रशीद : सलाम वॉलेकूम!!
यास्मिन : वॉलेकूम सलाम!!
रशीद : ये तुमने क्या मेसेज डाले है |😡
यास्मिन : क्या हुआ....
रशीद : तुम्हे क्या मै avilable लग रहा हूं क्या ??...जब चहा नही बोला... जब चाहा मुझे ऐसे मेसेज किये... अब तुम्हारा तुम्हारे मामाके बेटे के साथ नही जमा तो मेरे पीछे पड गयी क्या??
रशीदच्या अश्या बोलण्यामुळे यास्मिन एकदम हेलावून गेली....आपण अश्या प्रकारे काडीमात्र विचार केला नव्हता. आणि मामाच्या मुलासोबत आपलं जमूच नये असं वाटलं होतं... काल तर रशीद फोन 📳वर चांगला बोलला होता... मला वाटलं की तो मला समजून घेईन.... पण त्याने तर सगळा उलटाच अर्थ काढला.... असा विचार करत यास्मिनने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली...
रशीद : हॅलो, हॅलो.....
यास्मिन : अं... हॅलो.... सॉरी मुझे ये नही करना चाहिए था रखती हूं फोन असं म्हणून यास्मिनने फोन 📳ठेवला....
आणि हुंदके देत रडायला लागली.
क्रमश :
भाग 73 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या