नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
...........................................................................
विकी :📳अंजली🍫!! सोड मग ते हॉस्टेल... बाहेर राहायला ये ना...
अंजली : मी लाख सोडायला तयार आहे रे... पण माझे आई,बाबा ते मला बाहेर नाही ना राहू देत😒....
विकी : अंजली!!चल मी ठेवतो फोन... मला जेवण करावं लागेल
अंजली : हं टल्ली झालेला दिसतोस.... ठीक आहे जेवून घे... उद्या बोलू.... बाय...
विकीने लागलीच फोन कट केला....
विश्वासने आता बाकी टाइम पास करणे बंद केले....जवळ जवळ सव्वा महिनाच परीक्षेसाठी राहिला होता....श्रावणीला मिळवण्याची संधी दुसऱ्यांदा चालून आलेली होती... ती संधी आता कुठल्याही किमतीत विश्वासला गमवायची नव्हती....परीक्षा पास झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना श्रावणी बद्दल सगळे सांगायचे असे विश्वासने ठरवले होते... त्या मुळे विश्वास आता चांगला अभ्यासाला लागला होता...
कॉलेज मध्ये देखील सेमिस्टरच्या परीक्षेसाठी अभ्यासाचे वातावरण सुरु झाले होते... जो तो आता स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यासाला लागला होता....
आता फक्त दहाच दिवस राहीले होते त्या नंतर पी एल सुरु होणार होते...
लेक्चरर,प्रोफेसर यांची आपला पोर्शन पूर्ण करण्यासाठी घाई सुरु झाली होती... तर विद्यार्थी यांचं प्रोजेक्ट कंप्लिशन आणि बाकी सबमिशनची तयारी चालू होती... अभ्यासमध्येच संपूर्ण दिवस जात होता....
ज्यांना कशाचीही तमा नव्हती असे काही जोडपे म्हणजेच विकी आणि अंजलीचे मात्र नेहमीप्रमाणे डेटिंग करत होते... ग्रुप प्रोजेक्ट मध्ये त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग देखील नव्हता... नॉमिनल हजेरी देऊन ते तिथून निघून जात असत ...
एके दिवशी विश्वास लायब्ररीत जात असताना त्याला अंजली समोर दिसली..... अंजली दिसताच त्याला ताराच्या व्हिडिओ बद्दल आठवलं... त्याने लागलीच अंजलीला बोलावलं...
विश्वास : excuse me..
अंजली : हॅलो विश्वास!!
विश्वास: काय?? हॅलो विश्वास... सर बीर पुढे काही म्हणायचं असतं की नाही.... मी काय तूझा मित्र वाटतो की काय?😡 सिनियर्स शी कसं बोलायचंय हे आतापर्यंत तू शिकली नाहीस का?
विश्वासच्या अश्या ओरडण्याने अंजली एकदम गोंधळून गेली... आपलं काय चुकलं तेच तिला कळालं नव्हतं....सॉरी विश्वास सर...
विश्वास : हं thats better... काय गं तुला व्हिडीओ viral करायचा फार शौक आला का?
अंजलीला आता समजलं हा विश्वास आपल्याला कश्यावरुन बोलत आहे ते....तिला विकी चे बोलणे आठवले...
अंजली :तुम्हाला त्या तुमच्या नेहाने सांगितले का?🤔
विश्वास : काय फरक पडतो... का गं समजा तू त्या ताराच्या जागी असतीस तर तूला तूझ्या बाबतीत असा व्हिडीओ viral झालेला चालला असता का?
अंजली : मी अशी त्या तारासारखी फसलेच नसते... मग माझा असा व्हिडीओ कसा तयार झाला असता...
हे बेणं डोक्याच्या वरचं आहे.. आणि हिच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही हे विश्वासच्या लक्षात आले...
विश्वास : बरं बरं ते राहू दे... पण या पुढे मला असल्या प्रकारचा अविचारी पणा नाही दिसला पाहीजे....
अविचारी पणा 🤔 मी कुठे केला....जाऊदे या विश्वासशी पंगा नको घ्यायला असा विचार करत अंजलीने नुसतीच होकारार्थी मान हलवली...
सायली!!काय प्रोजेक्ट सबमिशन झालं का?? रोहनने मागून सायलीला आवाज दिला....
सायली : कोण?🤔रोहन होय.... हो आताच सबमिट करून आलो... तुमच्या प्रोजेक्टचं काय झालं...
रोहन : आमचा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला अजून दोन दिवस लागतील... पण आता निदान प्रोजेक्ट मार्गी तरी लागला आहे... थँक्स to यास्मिन...
सायली : यास्मिन!!🤔 अच्छा... हो गीतिकाने मला सांगितलं.. तीने रशीदच्या मदतीने काही आयडिया घेतल्या ते....
सायली!! आज दुपारी माझ्यासोबत कॅन्टीन मध्ये एक कप कॉफी घेशील??थोडं घाबरतच रोहनने सायलीला विचारलं...
सायली : नको रोहन!!तुला आपल्या कॉलेजचं वातावरण माहिती नाही का?🤔 कुणीही एक मुलगा एक मुलगी बोलताना दिसलं की लागलीच त्यांची जोडी जुळवतात....
रोहन : हं... मग याचा अर्थ असा की आपल्या मैत्रीला काहीच किम्मत नाही का? ज्यांच्या डोक्यात चांगले विचारच नाही त्यांचं आपण काय करू शकतो...
सायली :अरे रोहन!!तू तर सिरीयस झालास... बरं ठीक आहे... घेऊ या कॉफी.... पण प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला नेहमी नेहमी असं सोबत कॉफी नाही घेता येणार.....
रोहन : हो चालेल की.... चालेल काय पळेल... मी दुपारी वाट पाहीन... चल आता वर्गात बसूयात...
असं म्हणून रोहन आणि सायली वर्गातील आपापल्या जागेवर जाऊन बसले...
एक लेक्चर झाले.... थोडया वेळाने सगळीकडे गलबला झाल्यासारखे वातावरण झाले.... वर्गातच गोंधळ सुरु झाला... मुलींना काही समजत नव्हते वर्गात हा कसला गोंधळ सुरु आहे...बाजार भरल्यासारखे वातावरण वाटत होते...
तितक्यात विकीचा अंजलीला फोन आला....
मुलींनो ऐका एक ब्रेकिंग news आहे... अंजली जोऱ्यात ओरडली...
सगळ्या मुलीचे कान अंजलीकडे टवकारले गेले ..
अंजली : तुम्ही गेस करू शकता का?? काय news असु शकेल...
नेहा : ए अंजली!! खरंच काही बातमी असेल तर सांग... उगाचच सस्पेन्स क्रिएट नको करूस...
सांगते सांगते असं म्हणून अंजली एकदम तोऱ्यात बोलायला लागली.... कॉलेज कॅम्पस मध्ये कोण आलं माहिती आहे...
गीतिका :कोण??
अंजली :गीतेश सर....
सगळ्या मुली काय 😳... म्हणून एकदम ओरडल्या...
नेहा : त्यांना जामीन मिळाला 🤔
अंजली : हो... कुणी मिळवला माहिती आहे का? त्यांच्या आताच्या बायकोने....
नेहा : हो आता ती तीचे कर्तव्य करणारच....
अंजली : कर्तव्य... अगं चांगलेच कर्तव्य करत आहे ती.... पुढच्यास ठेच.. मागचा शहाणा...
नेहा : म्हणजे?? आता ही म्हण ईथे कशी लागू पडते 🤔
अंजली : अगं आता ती तीचे लग्न रजिस्टर करून घेत आहे...
सायली : ओ... मला वाटलं की तीने त्याला सोडून दिलं असेल....
नेहा : हो मलाही तसंच वाटलं होतं... पण ज्याची त्याची ईच्छा...
क्रमश :
भाग 75 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या