आमच्यासारखे आम्हीच (भाग 75)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

त्या गीतेश सरांना काहीच वाटत नसेल का? लागलीच कॉलेज मध्ये सुद्धा आले.... जाऊदे बाबा आपलं नशीब बलवत्तर होतं म्हणून आपण त्याच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचलो..... बापरे नाहीतर आपला नंबर लागलाच होता😱... क्षण भर विचार करून गीतिकाला घाम सुटला....

गीतिका : अंजली!!पण ते गीतेश सर कश्यासाठी आले आहेत ते काही कळालं का??

अंजली : काहीतरी ऑफिसचं काम आहे म्हणे... विकी सांगत होता गीतेश सर नुसतं तोंड लपवून होते आणि मान खाली घालून...

गीतिका : त्यांनी पुढे असं काही वागू नये म्हणजे झालं...

अंजली : आता ते चांगली जेलची हवा खाऊन आले आहेत...कदाचीत परत त्यांची हिम्मत होणार नाही....

सायली : गीतिका ऐक ना....

गीतिका : काय गं सायली??

सायली : मला काय योग्य आणि काय आयोग्य हे समजतच नाहीये...

गीतिका : का आता काय झालं...

सायली :रोहनने दुपारी कॅन्टीन मध्ये कॉफी ऑफर केली आहे...

गीतिका : ओ हो... तो बात यहातक आ पहुची... मग आता तुझं काही खरं नाही...

सायली : गीतिका!!जा बाबा... मी तुला विचारत आहे अन तू मला चक्क चिडवत आहेस....मला खूप टेन्शन येत आहे...जाऊदे मी त्याला नको म्हणून सांगते..

गीतिका : अगं सायली!! तू तर पॅनिक झालीस... मी तर असंच म्हणत होते... अगं कॅन्टीन मध्येच जात आहेस ना... आपण मित्र मैत्रिणी कधीच कॅन्टीन मध्ये जात नाही का तसं...

सायली : हो गं.... पण i  know की रोहन मला फक्त as a friend बघत नाहीये.... म्हणून थोडं ऑड वाटत आहे....

गीतिका : सायली!! पण तूझ्या मनात काही नाही ना... तू त्याच्याशी तेवढी क्रिस्टल क्लियर रहा.... मग तो कुठलाही गैरसमज करून घेणार नाही.... तसंही रोहन खूप सेन्सिबल मुलगा आहे... त्रास देणाऱ्यातला नाही....

यास्मिन देखील वर्गात बसलेली होती... अजून लेक्चरर आले नव्हते... क्लास मधली सगळी मुले लेक्चरर ची वाट पाहात होते... तितक्यात क्लासच्या खिडकी बाहेरून रशीदने यास्मिनला आवाज दिला.....

यास्मिनचं लक्ष नव्हतं... गीतिकाने रशीदला बघितलं आणि यास्मिनला रशीद आल्याचं सांगितलं....

यास्मिन : गीतिका!! कुछ भी मत बोलो.... रशीद मुझे क्यूँ आवाज देगा....

गीतिका : अरे बाबा यास्मिन!!वो देखो अरे वहा दरवाजे पे नही खिडकीमे....

यास्मिन एकदम आश्चर्यचकित झाली....खिडकी जवळ गेली... रशीदने प्रोजेक्टची काही माहिती काढली होती ती तिच्याजवळ दिली.... तितक्यात लेक्चरर आले.... रशीद निघून गेला...

गीतिका : क्या बात है यास्मिन!!लगता है कुछ कुछ होने लगा है 😜😜

यास्मिन : गीतिका!! ऐसा कुछ भी नही... वो ये डोकमेंट्स देने आया था....

गीतिका : बताओ, बताओ.... ये डॉकमेंट्स तो वो व्हाट्सअँप भी कर सकता था.... पर नही किया... तुम्हारे बाकी टीम मेट्स को दे सकता था... पर उसने तो तुम्हे ही चुना.... क्यूँ??🤔...

यास्मिन : गीतिका!!तूम भूल गयी क्या??मैने ही रशीद को फोन करके प्रोजेक्ट के बारे मे पूछा था |

गीतिका : हं... हो सकता है |...

सायलेंस प्लीज.... सरांच्या आवाजाने आता दोघीना शांत बसावं लागलं....

ठरल्या प्रमाणे रोहन आणि सायली कॉफी घेण्यासाठी कॅन्टीन मध्ये गेले...

रोहन ती जागा चांगली आहे तिथे बसू.... रोहन एका बाजूच्या खुर्चीकडे बोट दाखवून सायलीला म्हणाला...

दोघेही त्या जागेवर जाऊन बसले.... रोहन ने आवाज दिला ए छोटू!!दोन कॉफी आण बरं....

सायली : आता पी एल मध्ये खूप अभ्यास करावा लागेल नाही का??....

रोहन : सायली!! आपण अभ्यास सोडून बोलू या का... म्हणजे अभ्यासाचा विषय निघाला की मला जरा टेन्शन येतं...

सायली : बरं!!तू बोल...

रोहन : सायली!!तूझा कुणी बॉयफ्रेंड आहे...

सायली : काय 😳? बॉयफ्रेंड... नाही तर... आणि मला अश्या भानगडीत देखील पडायचं नाहीये...

रोहन : अगं पण कुणी आवडत तरी असेल ना...

सायली : रोहन!! खरं सांगू मला ना कार्तिक आर्यन आवडतो....

रोहन : सायली!!काही पण...

सायली :अरे नाही..खरंच....

रोहन : म्हणजे तुला आतापर्यंत कुणीच नाही आवडलं का? आपल्या कॉलेज मध्ये... आपल्या क्लास मध्ये....

सायली : नाही...


विचारू का हिला... तुझं माझ्याबद्दल काय मत आहे.... नको ती ठाम पणे नाही म्हणत आहे ना जाऊ दे.... आज कॅन्टीनची कॉफीच गोड मानून घेऊ या असा विचार करून रोहन शांत बसला ....

तितक्यात कॉफी आली...शांतपणे दोघांनीही कॉफी घेतली...

सायली : रोहन!! निघते मी...

रोहन : ओके... आणि थँक्स...

सायली : थँक्स 🤔....

रोहन :कॉफीसाठी थांबलीस म्हणून....

सायली : वेलकम 😊 चल निघते मी बाय..

रोहन : बाय...

रूमवर आल्या आल्या रोहन गाणं गुणगुणु लागला...धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना 

प्रज्वल : क्या बात है रोहन?? आज स्वारी लय आनंदात आहे...

रोहनने प्रज्वलला कॅन्टीन मधल्या भेटीबद्दल सांगितलं...

प्रज्वल : अरे वा.... रोहन!!मस्तच की... आणि बरं झालं तूझ्या मनातलं तू सायलीला आताच सांगितलं नाहीस... आता काय कर तू आधी तिच्याशी घट्ट मैत्री कर... तुझी तीला सवय होऊ दे आणि मग तूझ्या भावना तिच्यासमोर व्यक्त कर....

रोहन : ओके लव्ह गुरु 🙏😜 जशी आपली आज्ञा

क्रमश :
भाग 76 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇


नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या