नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
गीतिका : अच्छा!!म्हणजे मी ईतकी care घेतली त्याचं काही नाही का? जो होता है अच्छे के लिए होता है... म्हणे..
यास्मिन : अरे नही रे गीतिका!!तूम तो नाराज हो गयी...
गीतिका : 😂😂 just kidding dear....चलो अब तुम्हे थोडा अच्छा मालूम हो रहा है... मै दुसरे लेक्चर के लिए निकालती हूं... और कुछ लगा तो कॉल करो... मै मोबाईल vibrate mode पे रख दूंगी....
गीतिका निघून गेली...
रशीदचा विचार करत करतच यास्मिनला झोप लागली...
झाला बाबा एकदाचा प्रोजेक्ट वेळेत सबमिट...रोहन आणि त्याचा ग्रुप एकदम रिलॅक्स झाला होता.....
रोहन :गीतिका मॅडम!!तुम्ही आता येत आहात काय??
गीतिका : सॉरी सॉरी रोहन!!ते ना यास्मिन...
रोहन :अरे हो यास्मिन सुद्धा नव्हती...आता तुम्हा दोघांना आम्हाला ट्रीट द्यावी लागेल... आम्ही तुम्हाला असं फ्री नाही सोडणार
गीतिका : अरे हो... पण त्या साठी यास्मिन सोबत हवी ना... यास्मिनची तब्येत ठीक होऊ दे मग एक ट्रीट नक्की
रोहन : काय झालं आहे यास्मिनला??..
यास्मिनच्या तब्बेती बद्दल गीतिकाने रोहनला सांगितले....
रोहन : ठीक ठीक आहे... आता ट्रीट पेंडिंग राहिली....
क्लास संपला सगळ्या मुली हॉस्टेल कडे निघाल्या... रशीद त्यांच्या बाजूलाच घुटमळत होता.... हे गीतिकाने हेरले..
गीतिका : रशीद!! तुम्हे कुछ पूछना है क्या??
रशीद : अं नही...
गीतिका : अभी बुखार उतरगया है |यास्मिन अब आराम कर रही है |
रशीद : अं.. अच्छा...
उगाचच फोन कानाला लावत रशीद तिथून निघून गेला...
नेहा : गीतिका!! भारीच गं... तुला कसं कळालं की रशीदला यास्मिनच्या तब्यतीविषयी विचारायचं आहे....
गीतिका : अगं मी यास्मिनसोबत होते तेव्हा त्याचा यास्मिनला फोन आला होता... बरं रशीदचं तर कळालं पण रोहन... ह्याला काय झालं आहे... तो बघ तो समोरून येत आहे..
सायली :आज काल त्या रोहनचं असं झालं आहे ना... काहीतरी कारण काढून बोलायचं नाहीतर भेटायचं... पण त्याला काय माहिती की मला कश्यानेच फरक पडणार नाही.... बघ आता समोर गेल्यावर मला कसा थाबवतो तो... इतक्या दिवसात मला रोहन विषयी पूर्ण अभ्यास झाला आहे....
अनुया : हं... बरोबर आहे... सायली खरंच की रोहन आपल्याच दिशेने येत आहे....
सायली : बघा मी म्हणाले नव्हते का?
रोहन या चौघींच्या जवळ आला... आणि त्याने आवाज दिला... गीतिका!!
सायली आ वासून😳 रोहन कडे पाहत बसली....
गीतिका :काय?
रोहन : काही नाही तुला मी परत आठवण करून द्यायला आलोय...
गीतिका : कश्या बद्दल??
रोहन : अगं ट्रीट बद्दल... बघ लागलीच विसरून गेली ना...
गीतिका : रोहन 🤦♀️ तू पण ना... एकदा सांगितलं ना मी ट्रीट देणार... देणार म्हणजे देणार.... आणखी काही.
रोहन : नाही नाही.... आणखी काही नाही....
रोहन निघून गेला..
गीतिका रोहनकडे बघून हसायला😂😂 लागली...
सायली : काय गं गीतिका!!ईतकं हसायला काय झालं??
गीतिका : अगं सायली!! रोहन दिसतो तेवढा साधा नाही...
सायली : म्हणजे?🤔
गीतिका : तू रोहनला बरोबर ओळखलस... पण शहाण्याने तुला हूल दिली..
सायली : हूल दिली... म्हणजे??
गीतिका : म्हणजे असं की तो मुद्दाम तूझ्या जवळ आला... आणि मला बोलला... तूझा अपेक्षा भंग व्हावा म्हणून तो असं वागला...
सायली : ओ आय सी.... पण त्याने काय होणार आहे...
गीतिका : काही नाही... असले अपेक्षाभंग झाले की एक वेगळीच हुरहूर आपल्या मनाला लागते ना... हे त्या पट्ठ्या ला माहिती आहे...
सायली : अच्छा...
नेहा : पोरींनो.. ते बघा विकी आणि अंजली...
बाईक वर कसे चालले आहेत....
अनुया : त्या अंजलीला कधी अभ्यासाचं टेन्शन येत नसेल का?? जेव्हा पाहावं तेव्हा त्या विकीसोबत फिरत असते...
नेहा : खरंच गं...मला तर फक्त काळजी वाटते की त्या अंजली सोबत काही वाईट घडू नये....
सायली : कसं आहे ना नेहा!! ह्यात स्वतःचं स्वतःला काय कारायचे कुठे थांबायचे हे कळणं फार महत्वाचे असतं...
नेहा : खरं आहे तुझं म्हणणं...जाऊद्या चला रूम वर आता आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक मिळणार आहे..त्या दृष्टीने अभ्यास करावा लागेल...
अंजली आणि विकी कॅफे कट्ट्यावर बसले..
अंजली :विकी!!पाह्यलं का ती चौकडी आपल्या कडे कशी पाहत होती...जळकुकडे नुसते....
विकी : हो ना...आणि आपले त्या चौकडीला डिस्टर्ब करण्याचे सगळे प्लॅन फसले..
अंजली :नाहीतर काय... काय तर म्हणे लेडीज representative....
विकी : हो ना म्हणून तर मी तो ताराचा व्हिडिओ viral केला होता....
अंजली : हो आणि मी शूट करायला लावला होता... पण तो विश्वास... त्या विश्वासने माझा डाव हाणून पाडला...तो रोहन पण फार शहाणा निघाला... तो पण आपल्या प्लॅनने फसला नाही....
विकी : अंजु!! आपल्याला आता ही फर्स्ट सेमिस्टर होईपर्यंतच वेळ आहे... तो पर्यंत जर नेहा आणि रोहन हे दोषी ठरले तरच आपल्याला representative होण्याचा चान्स आहे ... एकदा का gathring झाली की मग आपल्याला काहीच करता येणार नाही ना...
अंजली : विकी!! तुझं सगळं खरं आहे पण तो विश्वासच ज्याच्यामुळे आपला पॅनल तयार झाला होता तोच तर फितूर झाला आहे....मग आपल्याला कसं काय करता येणार?? आणि झालं आता चार पाचच दिवस राहीले आहेत... नंतर पी एल सुरु....
विकी : हो बघू यात आता काही करायला जमतं का ते... नाहीतर परीक्षा संपल्यावर gathring पर्यंत चा जो काळ मिळेल तेव्हा काही तरी करू... असं काही तरी करू की विश्वास देखील काहीच करू शकणार नाही....आणि बरोबर नेहा आणि रोहन त्यात अडकले पाहीजे.... ते कसे त्या पदासाठी योग्य नाहीत हेच आपल्याला पूर्ण कॉलेज मध्ये पटवून द्यावे लागेल....
क्रमश : भाग 78 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या