आमच्यासारखे आम्हीच (भाग 78)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

अंजली : म्हणजे??🤔 तूझ्या डोक्यात काय चालू आहे... आपण आता काय करायचं आहे?

विकी : कल्चरल कमिटी तयार होताना काहीतरी गोंधळ घालू...

अंजली : काहीतरी गोंधळ म्हणजे??

विकी : म्हणजे एक तर त्यांची कमिटी तयार होऊ द्यायची नाही... आणि समजा ती कमिटी तयार झालीच तर त्यांचं कुठलंच काम यशस्वी होऊ द्यायचे नाही....

अंजली : वा विकी वा.... तू तर एकदम मस्तच दिमाग चालवलं आहेस....

विकी : मग... उगाचच नाही मला जेम्स बॉण्ड म्हणत....

अंजली :🙄आता जेम्स बॉण्डचा इथे काय संबंध??

विकी : डायरेक्ट संबंध नाही पण इन डायरेक्ट आहे ना...

अंजली : तो कसा काय?

विकी : काय अंजली!!तुला काय प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते का?? यार तू माझी गर्ल फ्रेंड शोभत नाहीस...

काय म्हणालास??😡 मी तुला शोभत नाही की तू मला शोभत नाहीस... आता कळालं तुला झेंडू का म्हणतात ते 😡 अंजली जाम चिडली होती...

अंजलीच्या त्या वाक्यावर  विकी देखील खूप चिडला....आणि म्हणाला... मी होतो म्हणून... त्या रोहनने तुझ्याकडे ढुंकून तरी बघितलं होतं का??

अंजली : तो तर माझा मूर्ख पणा झाला रे.... तूझ्या म्हणण्यावरून मी त्याला प्रपोज करण्याचं नाटक केलं... नाहीतर मला काय माहिती नव्हतं का की तो सायलीच्या मागे होता....

विकी : बर बर... राहू दे आता....

अंजली : चल निघते मी.... मला पुन्हा भेटायची गरज नाही...

वातावरण चिघळलेले पाहून विकीने क्षणभर विचार केला आणि अरे अंजली तुला जोक समजत नाही का? मी तर गंम्मत करत होतो..

अंजली : असली गंम्मत😡...??मला काय मूर्ख समजतोस की काय? तुमच्या मुलांच्या भाषेत, माझ्या कानात काय बिडी आहे की काय??

विकी : हो बाई तू हुशार आहेस... कोपऱ्या पासून हात जोडतो पण अशी चिडू नकोस... रागावू नकोस माझ्यावर... नाहीतर आपला प्लॅन यशस्वी होऊच शकणार नाही....

अंजली :thats better 😡..

विकी :अंजु पुन्हा एकदा सॉरी... हवं तर मी कान पकडतो... उठबश्या काढू का....

लागलीच विकी कान पकडून उभा राहिला....

अंजलीला विकी कडे  बघून ऑड वाटायला लागलं.... अंजली आजूबाजूला बघायला लागली...
आजूबाजूचे लोकं देखील त्यांच्याकडेच बघत होते...

अंजली : बस बस केलं मी माफ.

विकी :असं रागात नाही.... जरा हसून माफ कर...

काय ड्रामेबाज आहे हा विकी.... जाऊदे अंजली आता सध्या याचा ड्रामा थांबवणं महत्वाचे आहे....असा विचार करून अंजलीने विकीला स्माईल दिली...

दिवसभर आराम करून यास्मिन देखील फ्रेश झाली होती... तापही उतरला होता....

या चौघीही रूमवर आल्यावर यास्मिन त्यांना भेटायला गेली.....

गीतिका :अरे वा यास्मिन!!एका फोन मुळे तू लागलीच एका दिवसात बरी झालीस...

यास्मिन :एक फोन की वजहसे नही... एक tablet की वजहसे ठीक हुई है |वो भी तुमने दी इसीलिये....

गीतिका :अच्छा.. तो फिर.. तुम्हे और कुछ बताने की जरुरत ही नही है ना...

यास्मिन : मतलब??

 रशीद यास्मिनची कशी विचारपूस करत होता... हे गीतिकाने तिला सांगितलं....

सायली :यास्मिन!!अब ये अच्छा चान्स है | रशीद को तुम्हारी बहोत चिंता हो रही थी..

यास्मिन :😳हा क्या??🥰🥰 चलो कुछ तो अच्छा हुआ...

नेहा : यास्मिन!!अब आगे क्या??

गीतिका : अब आगे... मन की बात 😉

यास्मिन : इतने जल्दी🤔ना बाबा... फिरसे डाट दिया तो...

नेहा :  यास्मिन!!अब ऐसे इतने आसानिसे बात नही करना ...थोडा उसे भी फील होने दो....

यास्मिन : मतलब??🤔

नेहा : मतलब ऐसा कुछ करो की वो तुम्हे मीस करे...

यास्मिन : हं... कुछ तो सोचना पडेगा....पर मै क्या कर सकती...

नेहा : और एकदिन कॉलेज को छुट्टी..... तूम कल भी उसे नही दिखी तो रशीद काम से गया समझो...

यास्मिन : सच मे ये फॉर्मुला काम करेगा??🤔.. पर उसके लिए कॉलेज बंक करना पडेगा😒... कुछ भी बोलो नेहा!! ऐसा करने को मेरा दिल नही मानता...

नेहा : गूड गर्ल.... जाने दो फिर... बाद मे और कुछ नया सोचेंगे...

रोहन : बस्स दोन दिवस आता फक्त दोन दिवसच कॉलेज आहे...

प्रज्वल : रोहन!! मी पण अनुया घरी जाण्याआधी एकदा तिच्यासोबत लॉन्ग ड्राइव्ह वर जाणार आहे...

रोहन : 😳काय??करा करा... एका पोराची मज्जा आहे...

प्रज्वल : तसं नाही रे रोहन!!फुल ना फुलाची पाकळी म्हणून तीचा एवढा तरी लाड करावा लागेल ना...

रोहन : अरे प्रज्वल!!अनुया deserve हॅप्पीनेस... तुम्ही जा...

प्रज्वल :हो रे... तो एक दिवस मी पूर्णपणे अनुयाला देणार आहे... बाईक राईड... हॉटेलिंग... आणी जमलं तर डिस्क सुद्धा...

रोहन : छान प्लॅन केला आहेस... काही अडचण आली तर मला सांग..

प्रज्वल : रोहन तुला माहिती आहे का... या डेटचं प्लॅनिंग मी खूप आधीपासून करत आहे...मी बरेच पैसे save केले आहेत... फिरणं कमी करून... पेट्रोलचे पैसे वाचवले आहेत 😉 

रोहन :ग्रेट 👍👍....प्रज्वल!!खरंच रे प्रेम करावं तर असं... आणि अनुया देखील ग्रेट की ती तुला कधीच बाहेर चल म्हणून हट्ट धरत नाही

प्रज्वल : म्हणून तर मी तीला दुखावू शकत नाही... आमच्यातील आर्थिक परिस्थितीच्या फरकाने हजार वेळेस माझ्या मनात विचार येतो... की आपण या पुढे जायला नको ईथेच थांबू या.... पण अनुया!!मला तक्रार करण्याची एकही संधी देत नाही.... मी तीला थांबवणार तरी कुठल्या बेस वर...

रोहन : खरं आहे तुझं...पण प्रज्वल!!मी तर सायलीबद्दल विचार करत होतो... सध्या तरी तीचा कुणी बॉयफ्रेंड नाहीये... तो पर्यंत तिच्या मनावर मला राज्य करायचं आहे...

प्रज्वल : हं.. Go ahead...

रोहन : कठीण आहे रे... ती सायली!!सरळ मला म्हणते कशी मला असल्या भानगडीत पडायचे नाहीये...पण तीला काय माहिती मी तिला भानगडीत पडायला लावणारच 😜😜

प्रज्वल :😂😂 असं का?? बेस्ट लक...

रोहन : थँक्स 😊


 क्रमश :
भाग 79 वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या