आमच्यासारखे आम्हीच (भाग 80)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

बाईक राईड सुरु झाली... मनातल्या गोष्टी ओठावर येऊन कित्येक दिवसांनी जणू कुठलेही बंधन आज त्यांच्यावर नव्हते असं प्रज्वल आणि अनुयाला वाटत होतं...

खरंच असं स्वछंदी फिरण्यात एक वेगळीच मजा आहे याचा अनुभव दोघेही घेत होते...

प्रज्वल :अनुया!!खरंच गं असं फिरायला किती मज्जा येत आहे नाही??

अनुया :हो... मस्त वाटत आहे... पण प्रज्वल!!आता तरी सांग ना आपण कुठे चाललोय??

प्रज्वल :अनुया!!तूझा माझ्यावर विश्वास आहे ना?🤔

अनुया : हो... म्हणून तर डेस्टिनेशन माहिती नसताना देखील मी तुझ्यासोबत येत आहे ना...

प्रज्वल : हो गं...

अनुया : सांग ना... कुठे जातोय आपण..

प्रज्वल : अगं हो हो... सांगतो... आपण पानशेत धरणाला भेट देणार आहोत...

अनुया :ए wow... तिथे बोटिंग पण करता येते... आपण बोटिंग करू या...

प्रज्वल : हो अनुया!!आज तू म्हणेल तसं....

अनुया : वा... आज एकदम ईतकं मेहेरबान 🤔...

प्रज्वल : काय करणार अनुया?🤔 आता एक महिना आपली भेट नाही होणार ....

अनुया : नको रे आताच पी एल ची आठवण करूस...

प्रज्वल : तुम्ही कळंबोलीला कधी जाणार आहात??

अनुया : सकाळी सहा वाजताचं बुकिंग केलं आहे... खरं तर आजच जायचं होतं पण आपल्या आजच्या डेट मुळे उद्या चाललो आहोत... खरंच प्रज्वल!!मैत्रीणी असाव्यात तर अश्या... त्या देखील काहीच तक्रार न करता माझ्यासाठी थांबल्या... खरं तर त्यात सायली खूप होमसीक फील करत असते... पण तीने देखील काहीच तक्रार केली नाही...

प्रज्वल : अनुया!! सायली वरून आठवलं... ती रोहनला कधीच होकार देणार नाही का गं...

अनुया : प्रज्वल!! ती म्हणते  तीला अश्या भानगडीतच पडायचं नाही... म्हणजे जरी समजा तिला रोहन आवडला तरी ती कदाचीत नाहीच म्हणणार...

प्रज्वल :पण रोहन तिच्या बाबतीत सिरीयस आहे गं....तुला माहिती आहे का? अंजलीने रोहन ला प्रपोज केलं होतं ते?🤔

अनुया :काय 😳??..

प्रज्वल :मग तर तुला हे देखील माहिती नसेल की तीने त्याला रोज किंग केले होते...

अनुया :😳प्रज्वल!!मला असे एकामागून एक धक्के देऊ नकोस ना.....

प्रज्वल :अगं खरं... मी तुला सांगायचं कसं काय विसरून गेलो... मलाच याचे आश्चर्य वाटत आहे....हं आठवलं तू तेव्हा तुझ्या सेमिनारच्या टेन्शन मध्ये होतीस 

अनुया : पण विकी आणि अंजली??

प्रज्वल : ती तर एक गंम्मतच आहे...

चल आपण त्या टपरीवर जाऊन जरा चहा घेऊ.... तिथे चहा घेत घेत बोलू..

प्रज्वलने साईडला गाडी लावली.....

ए छोटू दो कट मलाई मारके.... प्रज्वलने चहा वाल्याला ऑर्डर दिली....

अनुया : हं प्रज्वल!!आता सांग हे अंजली प्रकरण....

प्रज्वल : अगं अंजलीने रोहनला प्रपोज केलं... रोहनचं सायलीवर खरं प्रेम आहे... त्याने अंजलीला सरळ सरळ नकार दिला...त्याने नकार दिला की लागलीच विकीने तीला प्रपोज केलं... अंजलीने लागलीच विकीला होकार दिला...

अनुया : 🙄 खरंच अंजली... तीचा कधीच काही भरवसा नसतो.... कधी कशी वागेल ते सांगता येत नाही....

प्रज्वल : ते तर जाऊदे पण पाच मिनिटांपूर्वी अंजली रोहनला म्हणाली होती की ती रोहन साठी आयुष्यभर थांबायला तयार आहे... पण दुसऱ्याच क्षणाला तीने विकीला होकार दिला😂😂...

अनुया : वो अंजली है बाबू!!... कुछ भी कर सकती है... टाईम पास अफेअर चालू आहे असं ती म्हणत होती...

ईकडे रोहनने सायलीला फोन📳 केला...

रोहन : सायली!! थोडा वेळ कॅन्टीन मध्ये येशील का?? मला थोडं बोलायचं होतं...

सायली : रोहन!!काय बोलायचं आहे तुला??फोन वर नाही बोलता येणार का??

रोहन : अगं सायली!!फोन वर नाही बोलता येणार म्हणून तर मी म्हणत आहे ना अगदीच थोडया वेळासाठी ये ना... तसंही मग एक महिना आपली भेट होणार नाही....

सायली : 🙄 बरं ठीक आहे येते मी....
हा रोहन पण उगाचच माझ्या मागे लागला आहे..... याला समजत कसं नाही की मी असल्या भानगडीत पडणार नाही... जाऊदे तसंही आता एक महिना सुट्टी विचार करत करतच सायली तयार झाली....

यास्मिनची तब्येत आता सुधारत होती...तीचे आईवडील तीची पुरेपूर काळजी घेत होते.. अधून मधून तीचे तिच्या आईवडिलांच्या नकळत रशीद सोबत बोलणे होत होते... यास्मिनच्या मनातलं गीतिकाशी रशीद काय बोलायचा ते  कुतूहल काही केल्या तिच्या मनातुन जात नव्हतं....

एक बात पूछू?? गुस्सा तो नही करोगे 🤔रशीदचा फोन आला तेव्हा यास्मिनने घाबरत घाबरतच रशीदला विचारलं...

रशीद : क्या??

यास्मिन : तुम्हारी गीतिका से क्या बात होती थी?

रशीद : मुझे जलने की बू आ रही है |

यास्मिन : रशीद!!प्लीज बोलो ना

रशीद :इसका मतलब तुम्हे मुझपे बिलकुल ही भरोसा नही है...
रशीदच्या त्या प्रश्नामुळे यास्मिन आता चांगलीच कोंडीत सापडली... भरोसा तो है |ठीक है जाने दो तुम्हे नही बताना है तो मत बताओ...

रशीद : अच्छा ऐसा है |फिर तो बता ही देता हूं 😉असं म्हणून रशीदने तो गीतिकाशी काय बोलणं होत होतं ते सांगितलं आणि गीतिकाने ते का सांगितलं नाही त्याचं कारण देखील रशीदने यास्मिनला सांगितलं...

यास्मिन :ओ ऐसी बात थी... और मैने न जाने क्या क्या नही सोचा... वैसे भी मेरी गल्ती नही थी तूमने उसको रोज क्वीन बनाया था ना 😏...

रशीद : 😂😂 अब वो रोज क्वीन तो किसी ना किसी को बनना ही था ना...

यास्मिन :🙄हं...

नेहा :गीतिका!! यांचं बरं आहे एक जण बाईक राईड साठी गेलं काय आणि एक जण कॅन्टीन मध्ये आपण मात्र हॉस्टेल मध्ये टाईम पास करत बसा...

गीतिका : मग शोधा एखादा बॉयफ्रेंड😜😜

नेहा :  शोधून मिळणारा बॉयफ्रेंड नको बाई मला...

गीतिका : म्हणजे??

नेहा : अगं कुणी मनापासून आवडलं तर तो माझा बॉयफ्रेंड.. नाहीतर आपण सरळ सरळ अरेंज मॅरेज करणार...

गीतिका : हूं... मघाशी श्रावणीदीदीचा फोन आला होता वाटतं..

नेहा : बरं झालं आठवण केलीस... अगं श्रावणीदीदी  आपल्या स्किट चा व्हिडीओ मागत होती...तिला तारा ने मागितला होता...पण या सगळ्या अंजलीच्या गोंधळामुळे मी तो डिलीट केला...

गीतिका : ईतकंच ना माझ्याकडे save आहे तो व्हिडीओ कारण मी माझ्याजवळ व्हिडीओ आला की मम्मा ला पाठवला होता.... तो तू पाठवून दे... नेहा!!यावरून अजून एक गोष्ट आठवली आपण हॉस्टेल डे च्या दिवशी ट्रेझर हंट खेळणार होतो ना 🤔.. तसंही काही झालं नाही....

नेहा : हो ना... मी दिव्याला विचारलं होतं...दिव्या म्हणाली की गेस्ट लेक्चर ठेवल्यामुळे ते कॅन्सल केलं.... पण खरंच तो खेळ ठेवायला पाहीजे होता खूप मज्जा आली असती...
क्रमश :
 भाग 81 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या