नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
सायली कॅन्टीनमध्ये पोहोचली.... रोहन कॅन्टीनमध्ये तीची वाटच बघत होता... रोहनने दोन वडासांबार ऑर्डर केला आणि दोघेही एका कोपऱ्यातील बेंच वर बसले...
सायली :अरे रोहन!!फक्त कॉफीच ऑर्डर करायची ना..वडासांबार कशाला??
रोहन :राहू दे गं... आता महिनाभर कुठे आपण भेटणार आहोत??
सायली : हं... बोल कशासाठी बोलावलं....
रोहन : अगं काही नाही... हे स्लॅमबूक मी माझ्या जवळच्या मित्रांकडून भरून घेत आहे.... तुला मी माझी जवळची मैत्रीण मानतो... म्हणून तूझी एक आठवण म्हणून मला हे भरून पाहीजे...
सायली :अच्छा... बघू ते स्लॅमबूक...
रोहनने ते स्लॅमबूक सायलीच्या हातात दिले....
सायली : हे wow किती सुंदर स्लॅमबूक आहे...
असं काय माझ्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी रोहन हे स्लॅमबूक भरायला लावत आहे का??पण मी सायली आहे सायली... असल्या भानगडीत न पडणारी असा विचार करतच सायलीने स्लॅमबूक भरायला सुरुवात केली...
Name : सायली age : 18, resi :kalamboli
Nick name :सई.. Best friends :नेहा अनुया गीतिका
Your crush :
आता पकडली जाती की नाही ही... बघू हिचा crush कोण आहे तो 🤔 काय लिहीत आहे सायली...
विकी 😳..
विकी सायलीचा क्रश? असं कसं काय? विचारू का सायलीला?🤔नाही नको मला काय करायचं तो विकी का टिफि कुणी का असेना... जाऊदे एकदाचं विचारूनच टाकतो....
रोहन :सायली!!तूझा क्रश चक्क विकी??🤔 तुला त्याच्या पेक्षा अजून चांगलं कुणी भेटलं नाही का??
सायली : माझा विकी आहेच तसा गोड... मला अजून चांगलं कसा काय कुणी भेटेल...
रोहन : मग त्याचं अंजली सोबत अफेअर झाल्यावर तुला खूप दुःख झालं असेल नाही...
सायली : काय 😳 अरे देवा 🤦♀️ तू कुठला विकी समजत आहेस... हं माझंच चुकलं मी त्याचं आडनाव देखील लिहायला पाहीजे होतं... थांब मी लिहते... विकी कौशल 😍😍
रोहन : अरे देवा... विकी कौशल होय 😂😂दोन मिनिटासाठी मी कुठे कुठे फिरून आलो...
सायली : 😂 कुठे विकी आणि कुठे विकी कौशल 🤦♀️ असं म्हणून सायलीने परत स्लॅमबूक लिहायला सुरुवात केली..
First love : पहिलं प्रेम 😍अजून व्हायचं आहे...
रोहन :कधी होणार??
सायली : काय??
रोहन : अं काही नाही...
ऑटोग्राफ : sayli...
या स्लॅमबूक मध्ये माझं नाव कुठेच नाही 🙄... ठीक आहे सायली पहिलं प्रेम... ती रीकामी जागा मीच भरणार...असा विचार करत रोहनने स्लॅमबूक परत घेतला... वडासांबार आला... दोघांनीही नाश्ता सुरु केला..
चहा झाल्यानंतर अनुया आणि प्रज्वलची राईड पुन्हा सुरु झाली... तब्ब्ल तासभर राईड झाल्यानंतर दोघेही ब्रेक फास्ट करून पानशेत धरणाच्या तिथे आले....
तिथलं वातावरण एकदम आल्हाद दायक होतं ते बघून दोघेही खूप खूष झाले होते.. दोघेही जरा लवकर आल्यामुळे बाकी पर्यटकांची गर्दी कमी होती.....
.दोघांना लवकरच बोटिंग करायला मिळाली...
दोघेही पाण्याच्या तरंगात एकमेकांच्या संनिध्यात कधी सेल्फी काढत तर कधी एकमेकांचे फोटो काढत बोटिंगचा आस्वाद घेत होते...
प्रज्वल आणि अनुया दोघांनाही आज असं वाटत होतं की अश्या राईड नेहमीच व्हायला हव्या... खरंच कसला मस्त क्वालिटी टाईम आहे हा...
पी एल संपल्यावर परत एक बाईक राईड घेऊ असा विचार दोघेही करत होते....
प्रज्वलला त्याच्या परिस्थितीनुसार प्रॅक्टिकली ते शक्य नव्हतं... पण तरीही विचार करायला काय हरकत आहे असं म्हणून तो विचार करू लागला....
अनुया : प्रज्वल!! किती सुंदर आणि रमणीय जागा आहे ना ही...
प्रज्वल : हो.... ऊन जास्त नसल्याने अजूनच आल्हाददायक आहे....
अनुया : ते ओरडून काय सांगता आहेत बघ....
प्रज्वल : काय?? अच्छा.....तिकडे पुढे धोका आहे... तिकडे जाऊ नका म्हणून सांगत आहे... थांब मी बोट वळवतो... प्रज्वलने शिताफीने बोट वळवली...
किती व्यवस्थित सगळं करतो हा प्रज्वल🤔....एकदम जबाबदारीने.... मोटरसायकल पण किती व्यवस्थित चालवली.... मला एक झटका देखील बसू दिला नाही...😍😍
मी अगदीच योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडले.... माझ्या मॉम डॅड ने माझे प्रेम समजून घेतले तर माझ्या ईतकं सुखी कुणीच असणार नाही....जाऊदे पुढचं पुढे बघू... आजचा दिवस आपल्यासाठी किती छान आहे हे बघू... असा विचार करत अनुया परत पाण्याशी खेळण्यात मग्न झाली...
तब्बल अर्धा तास बोटिंग केल्यावर दोघेही पाण्याबाहेर आले...समोरच बुट्टेवाला उभा होता... प्रज्वलने लागलीच बुट्टा विकत घेतला.... दोघेही बुट्ट्याचा आस्वाद घेत होते सोबतच मोबाईल मध्ये फोटो सेशन देखील सुरु होते...
थोडा वेळ तिथेच फेर फटका मारल्यावर दोघांनाही जाम भुका लागल्या होत्या....
प्रज्वलने जेवणासाठी आधीच एक रेस्टॉरंट बघून घेतले होते... त्याचे मोबाईल वर review देखील चेक केले होते... चांगले review पाहून दोघेही त्या रेस्टोरंट मध्ये घुसले....
प्रज्वल ने अनुयाच्या पसंतीचे जेवण ऑर्डर केले...
मनसोक्त जेवण झाल्यावर दोघांनाही थोडेसे थकल्यासारखे झाले होते...
अनुया : खूप थकल्यासारखं वाटत आहे ना...
प्रज्वल : हो... अनुया आपण असं करू ईथुन थोडं पुढे गेलं की एक शेत लागतं.... त्या शेतामध्ये एक मोठे वडाचे झाड आहे त्याच्या पायथ्याशी आपण थोडा वेळ बसू आणि मग निघू
अनुया : प्रज्वल!!थँक्स अ लॉट... तुला माझ्या मनातलं कसं काय कळतं रे... आता मला हेच लागणार असं तुला कसंकाय समजतं....
प्रज्वल : प्रेमामुळे... अजून काय....
अनुया : 🥰🥰🥰 प्रज्वल!! I love you...
प्रज्वल : 🥰🥰...
दोघेही शेतात आले... आणि झाडाच्या पायथ्याशी गप्पा मारत बसले...
प्रज्वल :अनुया ते बघ तिकडे कसला गोंधळ चालू आहे...
अनुया : 😳 प्रज्वल!! अरे ती बाई बघ तीला कसं तो माणूस ओढून नेत आहे... दुसरा माणूस तिला मारत आहे आणि ती बाई किती जोऱ्यात किंचाळत आहे... प्रज्वल!!आपण इथून निघू या... मला काही तरी क्राईम घडत आहे असं वाटत आहे...
प्रज्वल : हो आपल्या या झाडाचं खोड मोठं आहे म्हणून आपण त्यांना दिसत नाहीये... चल अनुया!!आपण इथून निघून जाऊयात...
अनुया : हो मला तर तो गोंधळ बघून नुसती धडकी भरली आहे....
प्रज्वल ने त्या लोकांच्या नकळत त्याची बाईक काढली... अनुया लागलीच त्याच्या मागे बसली... तिथून अर्धा किलोमीटर दूर गेल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला...
अनुया : प्रज्वल!!बरं झालं नेहा आपल्या सोबत नव्हती... नाहीतर मॅम तिथे जाऊन त्यांच्या मध्ये पडल्या असत्या... पण खरंच प्रज्वल!!नेमकं काय घडत असणार रे ते...
प्रज्वल : मला वाटतं की ती बाई तीचा नवरा आणि सासू सासरे असावेत... तू बघितलं नाही का ती वयस्कर बाई तिच्या झिंज्या पकडून ओढत होती...
अनुया : ओ.. प्रज्वल!!त्या लोकांनी त्या तरुण बाई सोबत काही बरं वाईट केलं तर... आपण असं त्यांना सोडून जाणं कितपत योग्य आहे??🤔
प्रज्वल : अगं अनुया!! तुला काय वाटतं माझ्या मनात हे आलं नसेल का? पण मी आणि तू सोबत आहोत... उगाचच ही कुणकुण जर तूझ्या घरच्यांना लागली तर ते आपल्याला कोणत्या भावात पडेल....
अनुया : हं... पण तरी... थांब तो समोर कॉन्स्टेबल दिसत आहे आपण त्याच्या कानावर नुसतं टाकू तरी...म्हणजे निदान आपण काहीतरी चांगलं केल्यासारखं होईल...
ठीक आहे... जशी तुझी इच्छा...असं म्हणून प्रज्वलने गाडी थांबवली....
प्रज्वल आणि अनुयाने त्या कॉन्स्टेबलला त्यांनी काय बघितलं ते सांगितलं....
पोलीस कॉन्स्टेबल : एक मिनिट.. अनुया ना तू...
अनुया : 😳 हो पण तुम्ही कसं ओळखलंत
क्रमश :
भाग 82 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या