नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
पोलीस कॉन्स्टेबल : अगं मी नेहाचा मामा...तू नेहाच्या घरी असताना बघितलं...
अनुया : अच्छा मामा का?? हो तरीच कुठे तरी बघितल्यासारखं वाटत आहे... मामा तुम्ही प्लीज बघता का? त्या शेतात जाऊन... नाहीतर ते लोकं त्या स्त्रीला मारून टाकतील....
पोलीस कॉन्स्टेबल : हो हो मी लागलीच जातो... पण बेटा असं ईतकं दूर फिरायचं नाही अन तुझ्यासोबत हा मुलगा कोण आहे??
आता काय उत्तर द्यायचे असा प्रज्वल आणि अनुयाला प्रश्न पडला
अनुया : हा माझा....
आत्ये भाऊ...अनुयाचे वाक्य तोडत प्रज्वल म्हणाला
पोलीस कॉन्स्टेबल :आत्ये भाऊ... तू तिला ईकडे कशाला घेऊन आला होतास...
प्रज्वल : अं अं आमच्या एका नातेवाईकांना भेटायला गेलो होतो... तुम्ही प्लीज लवकर तिकडे जा ना...
ठीक आहे ठीक आहे निघालो मी असं म्हणून पोलीस कॉन्स्टेबल तिथून निघून गेला...
पठ्ठयानो मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, पोलीस कॉन्स्टेबल... मला काय असली प्रकरण कळत नाहीत का?? मला त्या स्त्री ला वाचवण्यासाठी लवकर निघावं लागलं नाहीतर मी तूमची चांगलीच मज्जा घेतली असती....असा विचार करून पोलीस कॉन्स्टेबल त्या स्त्री ला वाचवण्यासाठी पळाला...
प्रज्वल :हुश्श सुटलो बूवा पहिल्यांदा खोटं बोललो अनुया!!काय करणार मला तर काहीच सुचत नव्हतं...
दोन मिनिटे तर मला वाटलं की या तुझी पोच कुठ कुठपर्यंत आहे... अगदीच रस्त्यावर उभ्या असणाऱ्या हवालदाराने तूला ओळखलं...
अनुया : आता मी घरी पोहोचे पर्यंत आपल्या बद्दल माझ्या घरी कळू नये म्हणजे झालं...काय यार हे कॉन्स्टेबल मामा ओळखीचे निघाले.... थोडया वेळापूर्वी किती आनंदात होते मी....पण आता त्याची जागा टेन्शनने घेतली...
प्रज्वल :अरे अनुया!! जाऊदे तसंही आपण जे बोललो त्यावर त्यांनी विश्वास ठेवलाच ना... नको जास्त विचार करूस...चल आपण समोर कॉफी घेऊ म्हणजे थोडं आपल्याला रिलॅक्स होता येईल...
अनुया : हो चल कॉफी घेता घेता मी नेहाशी एकदा बोलून घेते... तिच्या कानावर एकदा घालते...
प्रज्वलने एका कॅफे समोर त्याची गाडी पार्क केली
अनुयाने लागलीच नेहाला फोन लावला....आणि काय घडलं ते सांगितलं...
नेहा : 😳अनुया!! अगं माझ्या मामाची आताच पंधरा दिवसापूर्वीच ईथे पुण्याला बदली झाली... तुम्ही त्याला काय सांगितलं??
अनुया: प्रज्वल माझा आत्ये भाऊ आहे असं...
नेहा :😂😂😂... आणि तुम्हाला वाटतं माझ्या मामाने तुमच्यावर विश्वास ठेवला असेल...
अनुया : 😳 म्हणजे 🤔??
नेहा : अगं तो माझा मामा आहे... एकदम टॅलेंटेड..... त्याला एका नजरेतच तुमच्या बद्दल कळाले असणार...
अनुया : बापरे 😳नेहा!! मी घरी जाई पर्यंत माझ्या डॅडाला हे कळायला नको...
नेहा : dont worry dear... हा मामा माझ्याशी खूप फ्रेंडली आहे..मी त्याला सगळं व्यवस्थीत सांगेन.... तुम्ही एंजॉय करा ...
अनुया : थँक्स अ लॉट नेहा!! तुझ्याशी बोलल्यावर आता थोडं रिलॅक्स वाटत आहे...
प्रज्वल : माझ्या कडून पण तिला थँक्स सांग...
अनुया : नेहा!!प्रज्वल पण थँक्स म्हणतोय...
नेहा : प्रज्वल ला सांग नुसत्या थँक्स वर नाही भागणार...
मला नंतर पार्टी घेईन...
अनुया : ओके ओके 😂😂 नक्कीच सांगते...
अनुयाला असं हसताना बघून प्रज्वल देखील खूष झाला.. नक्कीच नेहाने आपलं टेन्शन कमी केलं असणार..असा विचार करू लागला...
अनुया : प्रज्वल!! नेहा म्हणाली ती तिच्या मामाशी बोलून घेईल
ईकडे यास्मिन च्या मामाचा मुलगा दुबई वरून भारतात आल्याची खबर यास्मिनच्या अम्मीला लागली...
त्या मुळे यास्मिन ची अम्मी तिच्या मागे सारखा लग्नासाठी तगादा लावत होती...
यास्मिनने तिच्या अम्मी अब्बू ना ती तिच्या मामाच्या मुलाशी लग्न करणार नाही हे ठाम पणे सांगितलं... त्या वर तीची आई तिच्यावर खूप चिडली....
यास्मिन : अम्मी!! तूम ईतना गुस्सा क्यूँ हो रही हो...उन्हे अगर मुझसे शादी करनी होती तो वो रोके के लिए नही आते??...
अम्मी : तुम्हारी उससे कुछ बात हुई क्या? तूम इतने कॉन्फिडन्स के साथ ऐसे कैसे कह रही हो...
यास्मिन : हा मेरी बात हुई है |पर तूम अगर मामा को नही बताओगी तो मै तुम्हे बताती हूं
अम्मी : ठीक है नही बताती...
यास्मिनने तिच्या मामाच्या मुलाच्या अफेअर बद्दल सांगितलं आणि लवकरच तो मामाशी बोलून घेईल आणि त्या साठीच तो आता दुबई वरून आलेला असणार असं तिला सांगितलं...
अम्मी : ये भाईजानने अच्छा नही किया... हमने तुम्हारे लिए कितने सपने देखे थे
त्यावर यास्मिनने अम्मी!!तूम बेवजह मामा पे चीड रहे हो..
तसंही मी देखील त्याला एक चांगला मित्र, भाऊ असंच त्याला समजत होते... मी देखील नवरा म्हणून त्याच्या कडे कधीच पहिलं नाही हे तिच्या अम्मीला सांगितलं...
इसीलिये अम्मी अब तूम मामा पे गुस्सा मत हो... हम खूशी खूशी उनके शादी मे शामिल होंगे....
यास्मिनच्या अम्मीला यास्मिनचे खूप कौतुक वाटले....
चहा आणि नाश्ता झाल्यावर आता महिनाभर काय करणार आहेस असा प्रश्न रोहनने सायलीला केला...
सायली : ofcourse अभ्यास... अजून काय... के टी लागू नये म्हणून प्रयत्न करणार...
रोहन : काहीही काय बोलतेस सायली... तू तर रँकर आहेस ना...
सायली : बरं.... रँकर तर तू पण आहेस की....
रोहन :हं...सायली!!तू फेसबुक वर नाहीस का??
सायली : आहे ना...
रोहन : मी खूप शोधलं.. मला दिसली नाहीस....
सायली : माझं प्रोफाइल नाव सई आहे... सापडेल बघ
हे ना... प्रोफाइल लॉक दिसत आहे.. कसं ओळखणार... प्रोफाइल pic पण रेड रोज आहे...
सायली : मी जास्त ऍक्टिव्ह नाही रे... मला जरा फेसबुकची भीती वाटते... याचे फोटो म्हणे ईकडे तिकडे viral होतात....
रोहन : हं... बरोबर आहे तुझं... हे बघ ही फ्रेंड request पाठवली आहे... Accept कर...
सायली : हं केली accept.. चल रोहन आता निघते मी... माझी पॅकिंग सुद्धा बाकी आहे...
ओके चालेल असं म्हणून रोहन ने शेक हॅन्ड साठी त्याचा हात पुढे केला...
काय करू काय नको असा विचार करत सायलीने देखील तीचा हात शेक हॅन्ड साठी पुढे केला.
क्रमश :
भाग 83 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
:
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या