आमच्यासारखे आम्हीच (भाग 84)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

एव्हाना हॉस्टेल बऱ्यापैकी रिकामं झालं होतं.. ज्या मुली घरी राहून अभ्यास करू शकत नव्हत्या अश्याच मुली फक्त हॉस्टेल ला थांबल्या होत्या...

फर्स्ट ईयर च्या मुली अगदीच बोटावर मोजक्या थांबल्या होत्या... त्या देखील काही दिवसांनी आपापल्या घरी जाणार होत्या...

अंजली आणि विकी दोघांनाही दोन तीन दिवस सोबत मज्जा करायची होती... काही थ्रीलिंग अनुभव घ्यायचे होते म्हणून दोघेही थांबले होते...

कधी इमॅजिका,तर कधी भीमाशंकर,तर कधी सिहंगड असं रोज एक डेस्टिनेशन ठरवून दोघेही फिरत असत.

अशीच एक रेव्ह पार्टीची जाहिरात सोशल मीडिया वर एका प्रायव्हेट ग्रुप मध्ये विकी ने पाहिली होती...

 त्याचं थ्रिल अनुभवण्यासाठी अंजली आणि विकी ने त्यांचं नाव नोंदवलं...

अंजली : विकी!!रेव्ह पार्टी?? 🤔म्हणजे काय रे??

विकी : जे जे थ्रिल आपल्याला अनुभवायचं आहे ना.. ते सगळं याच एका पार्टीत 😉 समजलं का??

अंजली : अरे वा😳... मी खूप एक्सायटेड आहे... कधी जायचं आहे...

विकी : आजच... संध्याकाळी 5 वाजता.... पूर्ण रात्रभर थांबण्याच्या तयारीने ये...

अंजली : 🤔 मला बॅगेचं लोडणं सांभाळावं लागेल त्याचं काय ना ...उद्या मला घरी जावेच लागेल... माझे मम्मी पप्पा घरी ये म्हणून मागे लागले आहेत..

विकी : ईतकंच ना... तुझी बॅग माझ्या रूमवर ठेऊन देऊ मग तर झालं...

अंजली : 👍done... मग परत भेटू या संध्याकाळी पाच वाजता..ऐक ना विकी!!रेव्ह पार्टी साठी मला ना शॉर्ट फ्रॉक घालायचा आहे.. पण हॉस्टेल वरून मला तसं फ्रॉक मध्ये नाही निघता येणार.. आमची रेक्टर खूप कडक आहे... ती मला फ्रॉक वर पाहिलं की नको नको ते प्रश्न विचारणार... असंही मला ती रोज विचारत असते घरी कधी जाणार म्हणून 😏

विकी : तू माझ्या रूमवर चेंज कर... तू येण्याआधी मी माझ्या पार्टनर ना रूम च्या बाहेर घालवतो...

व्यवस्थित प्लॅन करून अंजली हॉस्टेलच्या बॅग घेऊन बाहेर पडली.विकीच्या रूमवर बॅग ठेऊन चेंज करून दोघेही पार्टीच्या ठिकाणी जाऊन पोहोचले...

पार्टीच्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आपापले नाव सोशल मीडिया साईट वर नोंदवले होते त्यांना एक स्पेशल पास दिला गेला होता... त्या पास वर त्यांना एक उपनाम दिले गेले होते.. जेणेकरून त्यांची खरी ओळख बाहेर येऊ नये असा त्यांचा प्लॅन होता...

अंजली ला मार्गारेट नाव दिले गेले तर विकीला वॉल्टर नाव दिले गेले...

अंजली : विकी!! नाही नाही वॉल्टर!!किती छान नाव दिलं आहे ना....

विकी : yes मार्गारेट...

दोघेही हॉटेल मध्ये घुसले दोघांनाही स्विमिन्ग पूल साईड ला वेगवेगळे ग्रुप दिसत होते... प्रत्येक ग्रुप हा वेगवेगळी ऍक्टिव्हिटी करताना दिसत होते..

कुणी ड्रग्स ने नशा करताना दिसत होते... तर कुणी हुक्का पाणी करताना दिसत होते... एका ठिकाणी ड्रिंक्स चा प्रकार चालू होता... तर त्या स्विमिन्ग पूल च्या उजव्याबाजूला डेकोरेशन केलेलं lawn होतं...तिथे डीजे चालू होता... तिथे मद्यधुंद बरीचशी जोडपी मोठया प्रमाणात नृत्य करत होती...

विकी : अंजली!!चल एक एक तकीला 🥂शॉट घेउन येऊ 😉

अंजली :तकीला शॉट 🤔

 विकी : ते तिथे आहे चल तिथे...

अंजली : विकी!! मला हुक्का पण try करायचा आहे...

विकी : अगं हो हो... एक एक करून सगळंच try करू 😉 विसरलीस का?? आपल्याला नाईट आऊट करायचं आहे...चल आपण तकिला शॉट तर घेऊ....

एकामागे एक दोन तीन तकिला शॉट घेऊन झाल्यावर... दोघांनाही थोडी नशा चढली...

अंजलीने विकीचा हात पकडला आणि त्याला ओढून डीजे च्या ठिकाणी वेडीवाकडी चालत गेली...

धुंदी मध्येच दोघेही डी जे मध्ये नृत्य करायला लागले.... त्यांचे नृत्य रंगात आले होते ईतक्यात तिथे गलबला सुरु झाला...

सगळे जण ईकडे तिकडे धावायला लागले... कुठून तरी आवाज आला पळा पटकन आपल्या पार्टी वर पोलिसांची रेड पडली आहे...

विकी ने अंजलीचा हात पकडला आणि दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले...
 पण त्यांना चांगलीच चढल्याने दोघांचेही पाय लटलट कापायला लागले..
कसंबसं जोर करून दोघेही नेमकं हॉटेलच्या दरवाजा पर्यंत पोहोचले...
पण हे काय🤔 त्याच दरवाजातुन ते पोलीस आतमध्ये येत होते...त्यांनी अंजली आणि विकीला आपल्या ताब्यात घेतलं...

विकी आणि अंजली दोघेही आता खूप घाबरून गेले... काहीही सुधरत नसताना पोलिसांच्या हातापाया पडू लागले...अंजलीने रडायला सुरुवात केली 
पण पोलीस त्यांचे काही एक ऐकायला तयार नव्हते...

विकीने त्याच्या जवळ असलेले पैश्यांचे बंडल काढले.. आणि हे घ्या पण आम्हाला सोडा अशी विनवणी तो पोलिसांना दाखवू लागला...

तितक्यात तिथे उभा असलेला पोलीस इन्स्पेक्टर त्याने विकी ला पैसे देण्याचा प्रयत्न करताना पाहीले...

पोलीस इन्स्पेक्टर : बरोबर आहे, बड्या बापाचे बिघडलेले औलाद तुम्ही 🤔 तूमच्या कडून आम्ही चांगलं वागण्याची अपेक्षा करणंच चुकीचं आहे..... तू या इन्स्पेक्टर जाधव ला पैश्याचं आमिष दाखवतोस?? इन्स्पेक्टर जाधवला... आता पोलिसी खाक्या काय असतो हे तुम्हाला मी दाखवतो...चुपचाप माझ्यासोबत चला...

आता दोघांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता....

रेव्ह पार्टी मधून पोलिसांनी तब्बल पन्नास जणांना त्यांच्या ताब्यात घेतले होते... सगळ्यांना जेल मध्ये नेण्यासाठी पोलिसांना तब्बल चार वॅन आणाव्या लागल्या होत्या.....
दोन वॅन मध्ये मुली आणि दोन वॅन मध्ये मुले असं त्यांना जेलमध्ये नेण्यात आलं...

चौकडी आपापल्या घरी सुखरूप पोहोचली होती... चौघींच्याही घरी आता त्यांच्याच फर्माईश नुसार जेवणाचा मेनू ठरत असे...दोन ते तीन दिवस चौघीही चांगल्या आळसावल्या होत्या... आता मात्र चौघीनाही परीक्षेच्या अभ्यासाचे टेन्शन येणे सुरु झाले होते...

टेन्शन आल्याने चौघीनींही जसा त्यांच्या अकरावी बारावीत मिळून अभ्यास केला होता तसाच अनुयाच्या घरी अभ्यास करायचं ठरलं... सकाळी दहा वाजता बरोबर तिच्या घरी सोबत डब्बा घेऊन जायचं आणि संध्याकाळी पाचपर्यंत अभ्यास करायचा.. मध्ये एकदा डब्बा पार्टी आणि चार चा चहा असे वेळापत्रक नेहाने तयार केलेले होते... त्यानुसार ते त्या आमलात आणत होत्या.....
एकमेकींशी चर्चा करताना त्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवत होत्या
क्रमश :
भाग 85 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या