आमच्यासारखे आम्हीच (भाग 85)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

विकी आणि अंजलीला जेल मध्ये आणलं गेलं सोबत बाकीचे लोकं होते.तिथे सगळेच एकमेकांना अनोळखी होते..

त्यात पार्टी मध्ये त्यांना मास्क मिळाले होते. त्या मास्क मुळे कुणाचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते...

पोलिसांनी पार्टी चे एन्ट्री रजिस्टर जप्त केले होते... त्या रजिस्टर मुळे सगळ्या मुला मुलींच्या नावाच्या नोंदी पोलिसांना मिळाल्या होत्या... त्या मुळे आता कुणालाही आपले खोटे नाव सांगता येत नव्हते. त्या नोंदी मध्ये प्रत्येकाचा राहत्या घराचा पत्ता होता. पण विकीने त्याचा आणि अंजलीचा पत्ता हा कॉलेज चा पत्ता दिला होता..

तितक्यात पत्रकार लोकांना या रेव्ह पार्टी वर रेड पडल्याची ची बातमी लागली...

लागलीच पोलीस स्टेशनला सगळे पत्रकार आणि मीडियावाले जमा झाले...

सगळ्या news चॅनेल वर रेव्ह पार्टी रेड ची ब्रेकिंग news झळकायला लागली...

ब्रेकिंग news जेव्हा झळकायला लागली तेव्हा या चौघीही आपापल्या घरी होत्या... बातमी पुण्याची असल्यामुळे चौघींचेही कान टीव्ही तील बातमी कडे टवकारले गेले... मास्क मध्ये असले तरी विकी आणि अंजली त्यांच्या नजरेतून 😳सुटले नाही... पण त्यांच्या ड्रेस वर मार्गारेट आणि वॉल्टर अशी नाव दिसले ....चौघीनीही ती नावे पाहून सुस्कारा टाकला 

रेव्ह पार्टी ही एका धनाड्य उद्योजकाच्या मुलाने अरेंज केली होती...

कितीही दुश्मनी असली तरी ईतकं वाईट विकी आणि अंजलीच्या बाबतीत घडू नये असंच नेहाला वाटत होतं.

तर अनुया हे मार्गारेट आणि वॉल्टर विकी आणि अंजली जरी निघाले तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही असा विचार करत होती...

जर ही अंजली असती तर कदाचित अंजलीला आपल्या आईची गरज पडू शकेल असा विचार गीतिकाच्या मनात आला.

तर सायलीने अंजली आणि विकी ईतकी मोठी रीस्क घेणार नाही... त्यांच्या सारखी मिळती जुळती शरीरयष्टी बघून  आपला कदाचीत गैरसमज झाला असेल...असा विचार केला...

रेव्ह पार्टी अरेंज करणाऱ्यासाठी वरतून बराच दबाव झाला.. पण ओपन रेड असल्यामुळे  पकडलेल्या मुलांना काहीतरी शिक्षा होणं गरजेचे होते... त्या मुळे पोलिसांनी त्यांना रात्रभर लॉक अप मध्ये ठेऊन प्रत्येकी हजार रुपये दंड आकारून त्यांची सकाळी सुटका करायची असे ठरले..

अंजलीचा चेहरा रडून रडून सुजला होता.... काय exited होते मी विकी सोबत नाईट आऊट करण्यासाठी आणि आता लॉक अप मध्ये रात्र काढावी लागणार असा विचार करून अंजली सतत रडत होती😭😭.....

तरी बरं झालं आपल्या चेहऱ्यावर मास्क होता आणि आपल्या ड्रेस वर मार्गारेट नाव होतं.. नाहीतर आपल्या आईवडिलांना कळाल्या शिवाय राहिलं नसतं.. असा विचार करून अंजली थोडं शांत झाली...

रात्र नुसती खायला उठली होती.. एकमेकांना बघून कशी बशी रात्र सर्वांनी काढली...

इन्स्पेक्टरने मात्र रजिस्टरवर असलेल्या नोंदीनुसार सगळ्या मुलामुलींच्या पालकांना फोन लाऊन कळवले होते.. तर विकी आणि अंजलीच्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल सरांना दोघांबद्दल कळवले गेले....

सकाळी एक एकाचे पालक येत होते आणि फाईन भरून मुलांना सोबत घेऊन जात होते...

असेच सर्व जण निघून गेले... मुलांच्या जेल मध्ये फक्त एकटा विकी उरला होता... तर मुलींच्या जेल मध्ये फक्त अंजली उरली होती...

जेव्हा जेव्हा कुठल्याही मुलीला त्यांचे पालक घ्यायला येत  प्रत्येक वेळी कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल या आशेने अंजली वाट पाहत होती....पण कुणीच येत नव्हतं.. आता मात्र अंजली हतबल 🥺झाली होती...

बराच वेळ झाल्यावर पोलीस स्टेशन मध्ये दुबे सर आले...
दुबे सरांना पाहून अंजलीचा चेहरा जरासा खुलला😊... आपलं कुणीतरी आलं असं वाटून तिला हायसं वाटलं...
दुबे सरांनी विकी आणि अंजलीचं फाईन भरलं आणि त्यांना जेल च्या बाहेर काढलं...

अंजली : सर!!प्लीज सॉरी... पुन्हा नाही असं करणार...

विकी :सर आम्ही चुकलो... आम्हाला माफ करा... आम्हाला वाटलं होतं आम्ही एक वेगळं थ्रिल अनुभवू...

मग हे थ्रील नव्हतं का??🤔मला तर वाटलं की तुम्ही आयुष्यात कधी अनुभवले नसेल ते थ्रिल काल रात्री अनुभवले असणार ना...दुबे सर थोडं रागातच 😡म्हणाले...

अंजली : सॉरी सर आता या पुढे अशी चूक मी पुन्हा करणार नाही...

विकी : प्लीज सर...

दुबे सर : चला... समोर त्या उडपी रेस्टॉरंट मध्ये जाऊ... तुम्हाला भूक लागली असेल ना... असं म्हणून दुबे सरांनी दोघांनाही उडपी रेस्टॉरंट मध्ये नेऊन इडली आणि मसाला डोसा ऑर्डर केला....

खरंच कालच्या टेन्शन मध्ये आपण तहान भूक विसरूनच गेलो होतो... डोकं किती जड पडलं आहे याची जाणीव आता त्यांना झाली...

दोघांनाही चहा नाश्ता करवून दुबे सर दोघांना कॉलेज मध्ये प्रिन्सिपॉलच्या केबिन मध्ये घेऊन गेले...

प्रिन्सिपॉल : तुम्हा दोघांमुळे आपल्या कॉलेजची नाहक बदनामी झाली आता मी तुम्हाला रिस्टिकेट करतो😡...

विकी : सॉरी सर,आमचं चुकलं आम्हाला एक संधी द्या.. परत अशी चूक नाही करणार...

अंजली : सॉरी सर... आम्हाला खरंच माहिती नव्हतं.. की तिथे असं काही असेल... आम्ही चुकून त्या पार्टीच्या ठिकाणी गेलो होतो...

प्रिन्सिपॉल : शट अप... एक तर चूक करता आणि वरून खोटं बोलतेस.... दुबे सर यांच्या पेरेंट्स ला नोटीस पाठवून बोलावून घ्या 😡

दुबे सर : पण सर यांच्या पी एल चालू झाल्या आहेत....

प्रिन्सिपॉल : ठीक आहे... तुम्ही यांच्या पेरेंट्स ला नोटीस पाठवा आणि पी एल संपल्यावर बोलवून घ्या... आपल्याला या दोघांवर काही ना काही ऍक्शन घ्यावी लागेल....

आता साठी तरी सुटलो असा विचार करून अंजली आणि विकी थोडे रिलॅक्स झाले...

दुबे सर : तुम्ही या आता....

विकी आणि अंजली प्रिन्सिपॉलच्या केबिन मधून बाहेर पडले...

विकी : अंजली!! चला लवकर आपल्या गावी जाऊ... ही कॉलेजची नोटीस आपल्याच हातात पडली पाहीजे.... म्हणजे ती आपल्या पालकांपर्यंत पोहोचणार नाही 😉तसंही महिनाभरानंतर प्रिन्सिपॉल विसरून जातील 

अंजली : अरे हो... तुझी ही आयडिया एकदम best 😊आहे...

चौकडी नेहमीप्रमाणे अभ्यासाला बसली होती... अचानक नेहाला आधल्या दिवशी टी व्ही वर बघितलेली बातमी आठवली...

नेहा : ए तुम्ही कालची रेव्ह पार्टीची ब्रेकिंग news बघितली का??

अनुया : हो नेहा!!मी ही तेच म्हणणार होते... त्या मुलामुलींमध्ये विकी आणि अंजली सारखं कुणीतरी होतं... मास्क मुळे चेहरे दिसले नाही...

सायली : हो आणि नाव काय होते... मार्गारेट आणि वॉल्टर...

गीतिका : काय योगायोग आहे... मलाही तीच दोघे वाटले...

नेहा : मला तर वाटतं की कदाचीत ते दोघेच होते....
क्रमश ::
भाग 86वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇http://www.swanubhavsaptarang.com/2021/02/86.html
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या