आमच्यासारखे आम्हीच (भाग 86)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
..........................................................................

तितक्यात नेहाला विश्वासचा फोन आला...

नेहा: 😳 आज चक्क विश्वासदादाला माझी आठवण आली... असा विचार करून नेहाने फोन उचलला..

विश्वास : काय चिमणे कशी आहेस?? या दादाची तुला आठवण येते की नाही??

नेहा : काय विश्वास दादा असं काय म्हणतोस??

विश्वास :  मग या भावाला एखादा फोन तरी करावा... ख्याली खुशाली विचारावी... आपला दादा घरी गेला नाही हॉस्टेलला राहून अभ्यास करत आहे... म्हणून तरी...

नेहा : विश्वास दादा!!नक्की काय झालं आहे ते सांग... ईतकं बोर झालं तर श्रावणी वहिनी सोबत एक डेट करायची ना...

विश्वास : अगं ती ईथे पुण्यात असेल तर ना... ती तिच्या एका फॅशन इव्हेंट साठी ती मुंबईला गेली आहे....

नेहा :तरी म्हटलं इतक्या दिवसानंतर या चिमणीची आठवण कशी काय झाली 🤔...

विश्वास : असं काही नाही बरं चिमणे... मला तुझी नेहमीच आठवण होत असते... पण तू घरी आहेस... तूझ्या आईवडिलांना वाटायचे आता हा कुठला नेहाचा भाऊ उगवला आहे??

नेहा : हा हा हा... विश्वास दादा!!तू नको काळजी करूस.. माझ्या मम्मी डॅडीना तूझ्याबद्दल सगळंच माहिती आहे...

विश्वास : गूड...

नेहा : बरं विश्वास दादा!! ऐक ना... ती रेव्ह पार्टीची बातमी पाहिली... त्यात आपल्या कॉलेजचे काही जण होते असा उल्लेख होता...तुला माहिती आहे का कोण होते ते...

विश्वास : अरे नेहा!!तुला आतापर्यंत कळाले नाही का ते तुमच्याच वर्गातले तुम्ही काय म्हणता त्यांना 🤔झेंडू आणि फुलजडी...

नेहा : मला टीव्ही वर पाहून वाटलेच होते....पण त्यांनी मास्क घातलेला होता म्हणून ओळखू नाही आले....खरंच हे दोघेही मूर्खपणा करण्याचा एकही चान्स सोडत नाहीत....

विश्वास : तो झेंडू तर वाया गेलेला आहे पण त्या अंजलीला देखील काही कळत नाही  .... सतत नको त्या गोष्टी करत असते.... नेहा!!श्रावणीचा फोन येतोय... मी ठेवतो फोन📳...

नेहा : ठीक आहे... श्रावणी वहिनी ला माझे हाय सांग...

विश्वास : ठीक आहे...चल बाय...

नेहा : बाय...

मुलींनो आपला संशय खरा ठरला ते दोघे म्हणजेच झेंडूआणि फुलजडीच होते......फोन 📳ठेऊन नेहा तिघींना म्हणाली....

अनुया : तसंच पाहीजे त्या अंजली सोबत... मला उगाचच भांडत असते... आता भोग म्हणावं आपल्या कर्माची फळे...

सायली : नको गं अनुया!!असा विचार करूस... तूला आठवतं का... सुरुवातीला अंजली आपल्या सोबत किती चांगली वागायची....

गीतिका :हो... ती बदलली त्या निवडणुकापासून...

नेहा : तरी मी तिला मॅक्सिमम क्रेडिट देते...

सायली : क्रेडिट देणं आणि पद असणं यात फरक आहे नेहा!! तेही त्यांचा पॅनल जिंकून आला होता तरी पद तर तुला मिळालं ना.... त्या गोष्टीचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला असावा....

नेहा :सायली!! तू बोलतेस त्यात तथ्य आहे.... मला वाटतं की आपल्या कॉलेजच्या gathering  च्या वेळेस मी राजीनामा देते आणि अंजलीला ते पद घ्यायला लावते...

सायली :अगं नेहा!!मला तसं नव्हतं म्हणायचं नव्हतं...

नेहा :सायली!! अगं मी काहीच माईंड नाही केलं... उलट तूझ्या बोलण्यामुळे मला आता काय करायचे आहे हे समजलं... तसंही मला पदाची हाव नाहीये..... आणि जर या एका राजीनाम्यामुळे अंजली मध्ये फरक पडणार असेल तर... मला मनापासून वाटतं की अश्या प्रकारे नुकसान हे आपल्या शत्रूचं देखील होऊ नये... अंजली तर आपली मैत्रीण आहे...

अनुया : नेहा!!तुझ्यासारखी ग्रेट तूच बाई 🙄

गीतिका : मला तर वाटतं की माझ्या आईकडून अंजलीची कॉन्सेलिंग व्हावी... तिच्यात नक्कीच बदल होईल..

नेहा : चला... बॅक टू pavelian... अभ्यास करू या... आपले हे न संपणारे विषय चालतच राहतात...

चौघीनी परत ग्रुप स्टडी करायला सुरुवात केली....चौघीही अभ्यासात मग्न झाल्या तितक्यात सायलीच्या फोनची रींग वाजली...

मला अश्या अवेळी कोण फोन करणार?? असा विचार करत सायलीने फोन बघितला...रोहन??🤦‍♀️आता ह्याने कशाला फोन केला असेल?? तसंही ईकडे घरी आल्या पासून एक हुरहूर लागलीच होती ना.... थोडंसं मनोमन खूष होऊन सायलीने फोन उचलला...

सायली : हॅलो..

रोहन : हॅलो सायली!!कसा चाललाय तुमचा अभ्यास??

सायली : चांगला चालू आहे... सगळे मिळून करतो म्हणून बऱ्यापैकी समजतं...

रोहन :चांगलं आहे बाबा तुमचं... मला तर ईथे एकटं असल्यामुळे फार अवघड जात आहे.. अभ्यास होत नाही... मन लागत नाही....

सायली : का बरं?उलट तुला तर प्रज्वल चांगलं मार्गदर्शन करतो ना...

रोहन : मी अभ्यासाचं कुठे म्हणतोय??

सायली : म्हणजे 🤔

रोहन : काही नाही..... चल मी फोन ठेवतो...

त्याने फोन ठेवला नाही की गीतिकाचा फोन
 खणखणला...

 नेहा :आज काय फोन डे आहे की काय??गीतिका आता कुणाचा फोन आहे...

गीतिका :यास्मिन चा फोन आहे....हॅलो, हॅलो, हॅलो... यास्मिन मुझे लगता है नेटवर्क प्रॉब्लेम है... एक मीन.मै थोडा बाहेर आती हूं....

असं म्हणून गीतिका बाहेर गेली...

नेहा : अनुया!!आता फक्त तुझाच फोन राहिला आहे...

अनुया : काळजी करू नको नेहा!!माझा फोन येणार नाही... मी प्रज्वलला सांगितलेलं आहे की सकाळी दहा ते संध्याकाळी 5 मला फोन करायचा नाही... तसंही आमची वेळ ठरलेली आहे... रात्री नऊ ते दहा...

नेहा : फक्त एक तास... एका तासात तुमचं बोलणं होतं का?😜

अनुया : काय करणार नेहा?माझं बोलण्याचं लिमिट फक्त एका तासाचं आहे 😂😂... प्रज्वल बिचारा नुसतं ऐकत असतो...

नेहा : अच्छा म्हणजे प्रज्वल बिचारा आहे हे तुला मान्य आहे 😜😜 हो ना...

तितक्यात गीतिका पळत पळत रूम मध्ये आली... गर्ल्स एक गूड news आहे...

नेहा : let मी guess... रशीद आणि यास्मिनचं जुळलं... हॊ ना...

गीतिका : हॊ पण तितकंच नाही... त्यांचं oficial जुळलं आहे... म्हणजे यास्मिनच्या घरच्यांनी तिच्या आणि रशीदच्या नात्याला मान्यता दिली आहे.
क्रमश :

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या