आमच्यासारखे आम्हीच (भाग 87)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
........................................................................

अनुया : अरे वा... यास्मिन किती लकी आहे.... तिच्या आईवडिलांनी तिला समजून घेतलं....

नेहा : अगं का नाही समजून घेणार... एक तर ते दोघेही एकाच जातीतले आणि त्यांची आर्थिक स्थिती देखील जवळ जवळ सारखीच आहे... आणि आधीच यास्मिनचे आईवडील तिच्या लग्नाचं बघत होते... त्या मुळे त्यांनी मान्यता दिली आहे... तसंही रशीदचं पुढच्या वर्षी बी ई complete होईलच...

गीतिका : आपली परीक्षा संपली की ते यास्मिनचा साखरपुडा करणार आहेत...

अनुया : साखरपुडा 🤔.. मस्तच की... चला कुणीतरी officially engaged असणार आहे...

सायली : पण आजचा डे म्हणजे सगळा फोन डे गप्पा डे असाच गेला नाही....

नेहा : जाऊदे.. आजच्या डेला आपण ब्रेक डे असं नाव देऊ...

सायली : ब्रेक डे तर करायचा होता गं.... पण तो परवा...

नेहा : का?🤔 परवा काही स्पेशल आहे का??🙄

सायली : काय माहिती 😏

नेहा :😂😂😂just kidding dear... तुझा प्रगट दिन आम्ही कसा विसरू... आपण तुझा बर्थडे फुल टू एंजॉय करायचा... आणि अभ्यासाचं टेन्शन तू नको घेऊस... आपण सोबत अभ्यास केल्यामुळे जवळ जवळ आपला पोर्शन संपला आहे... Revision साठी जवळ जवळ पंधरा दिवस मिळणार आहेत... आणि मी पूर्ण calculate केलं आहे... आपण याच स्पीड ने अभ्यास केला तर आपली एक नाही दोन वेळेस revision होणार आहे....

सायली :  वा नेहा!!थँक्स... तू तर माझं टेन्शन दूर केलं...

नेहा :अरे थँक्स काय?? आपण सिंसियरली आणि नियमित अभ्यास केला म्हणून हे शक्य झालं... त्या मुळे आता तुझा बर्थडे आपण छान सेलेब्रेट करू या...

सायली : थँक्स अ लॉट dear...

विकी आणि अंजली आपापल्या घरी कधी नोटीस पोहोचते याची वाट बघत होते...

पण दुबे सरांनी हुशारी केलेली होती त्यांनी नोटीस दोघांच्याही वडिलांना ई-मेल द्वारे कळवली होती ...

अंजलीच्या वडिलांना रेव्ह पार्टी बद्दल कळाले...कळाल्या कळाल्या अंजलीच्या वडिलांनी अंजलीची चांगलीच खरडपट्टी काढली...

त्या नंतर अंजलीकडून त्यांनी विकीचा फोन नंबर घेतला....

अंजलीच्या वडिलांनी फोन करून विकीला देखील सुनावले... माझ्या मुलीशी या पुढे कसलाही संबंध ठेवायचा नाही अशी वॉर्निंग दिली..... अंजलीच्या हातातून तीचा फोन त्यांनी काढून घेतला....जेणेकरून अंजली आता कुणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये राहणार नाही....

 अंजलीचे शिक्षण थांबवण्याचे ठरवले आणि अंजली साठी स्थळ बघायला लागले.....

अंजली तिच्या बाबांच्या अश्या वागण्यामुळे बिथरली... तिला असे वाटत होते की आता पळून जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही... पण पळून जाणार तरी कसे?🤔
अंजलीच्या बाबानी तीचे सगळेच रस्ते बंद केले होते... घराच्या बाहेर पडताना देखील तीची आई किंवा तीचे बाबा सोबत असत....त्या मुळे अंजली चांगलीच सैरभैर झाली होती....

इकडे नेहा अनुया आणि गीतिकाने काँट्रीब्युशन करून काही पैसे जमा केले.... त्यात त्यांनी सायलीसाठी एक gift घ्यायचे ठरवले.....

सायलीच्या मम्मी डॅडी ने बर्थडे पार्टी साठी सायलीला काही पैसे दिले होते...सायली जवळच एका कॅफे मध्ये बर्थडे पार्टी देणार होती.... सायलीचं देखील प्लँनिंग व्यवस्थित झालं होतं....

रात्रीचे बारा वाजले... अनुया गीतिका आणि नेहाने फोन करून तो ही कॉन्फरेन्स व्हिडीओ कॉल....सायलीला उठवलं बर्थडे विष केलं आणि थोडा वेळ गप्पा मारून फोन ठेऊन दिला...

मनासारखा बर्थडे सुरु झाल्यामुळे सायली जरा सुखावली होती....

 सायलीच्या मम्मी डॅडी नी सकाळी जेवणासाठी सगळे नातलग बोलावले होते आणि संध्याकाळी या मैत्रीणी मैत्रिणी भेटणार होत्या....

ठरल्याप्रमाणे सगळ्याजणी एका कॅफे मध्ये भेटल्या...
नेहा :काय सायली मग कसे झाले घरी बर्थडे सेलेब्रेशन ??

सायली : कसे होणार... नुसतं बोर झालं आज...

नेहा : बोर झालं?? का बरं...

सायली : माझ्या मम्मी डॅडीला काहीच कळत नाही बघ...

नेहा :म्हणजे??

सायली :अगं माझ्या मम्मी डॅडीना माझं खूप कौतुक आहे पण नातेवाईक... त्यांना थोडीच माझं कौतुक आहे...

 माझ्या ऍडमिशन च्या वेळी या लोकांनी माझ्या मम्मी डॅडीला नको नको ती भीती घालण्याचा प्रयत्न केला होता...

आज माझी आत्या म्हणते कशी... चार वर्ष ही पोरगी घरा बाहेर राहणार आहे... तोंड काळं नाही केलं म्हणजे मिळवलं 🙄

लगेच माझी मामी म्हणाली, ती माझी चुलत पुतणी नाही का?? अशीच शिकायला बाहेर ठेवली होती... एका मुलासोबत ती पळून गेली.....

माझं तर नुसतं डोकं खराब झालं यार... पण या सगळ्यात एक गोष्ट खूप छान होती... माझे आईवडील त्या नातेवाईकांचा शब्द न शब्द खोडत होते...

माझी आई तर त्यांना म्हणाली की माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे...ती असली पाऊले उचलणार नाही...

नेहा : ग्रेट.... मग सायली!!तू बोर कशाला होतेस... तू नाण्याची दूसरी बाजू बघ ना.... तूझे आईवडील नेहमीच तूझ्या बाजूने बोलतात...

सायली : पण त्या अंजलीने एक कांड करून ठेवले ना... लागलीच माझ्या मावशीने रेव्ह पार्टीचे उदाहरण दिले...

नेहा : तुझं बरोबर आहे... गव्हा सोबत किडेही रगडले जातात...

अनुया :सायली!!बस्स आता तो विषय बंद...आजचा तुझा दिवस आहे... आपण छान एन्जॉय करू....

गीतिका : तो बघ तिथे टेबल अरेंज केला आहे तिथे चला...

अनुया : गीतिका नेहा सायली तुम्ही तिथे जागेवर जाऊन बसा मी केक आणते....

सायली :केक आणते??🤔

अनुया : केक आणते म्हणजे... मी ऑर्डर केला होता तो माणूस बाहेर येऊन थांबला आहे...

सायली : अच्छा....

सायली!!ते बघ 😳अनुया सोबत कोण कोण आहे..हॉटेल च्या एंट्रन्स कडे बघून नेहा म्हणाली ..

सायलीने तीची मान वर केली... आणि बघितलं...प्रज्वल आणि रोहन 🙄... अचानक...

happy बर्थडे सायली केक समोर करून प्रज्वल म्हणाला 

सायली : थँक्स... पण हे कशाला...

प्रज्वल : फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या दोघांतर्फे हा केक...

रोहन : happy बर्थडे सायली

सायली :थँक्स... पण तुम्ही ईथे कसे काय आले??🤔

प्रज्वल : तूझ्या बर्थडे साठी...

सायली :😳काय...

प्रज्वल : अगं म्हणजे तूझा बर्थडे आम्हाला निमित्त मात्र होतं... मला अनुयाची खूप आठवण येत होती... म्हणून आलो.... आणि एकटा येण्याची माझी हिम्मत होत नव्हती म्हणून रोहनला सोबत घेऊन आलो...

वा रे वा म्हणे माझी आठवण येते... या रोहनने प्रज्वलला आणलं असणार आहे ते देखील सायलीचा बर्थडे आहे म्हणून... बरं आहे प्रज्वल जागच्या जागीच गुंडाळतो... अनुया विचार करू लागली होती...

चल सायली लवकर केक काप आम्हाला आजच परत आमच्या गावी जायचे आहे...

क्रमश :

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या