आमच्यासारखे आम्हीच (भाग 88)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
......................................................................

सायलीने केक कापला... सायलीने मनात कितीही ठरवले असले तरी रोहन तिच्या बर्थडेला येण्याचा तिला मनोमन आनंद झाला होता...

आनंदातच सायलीने केक कापला होता... रोहन आणि प्रज्वलच्या येण्याने दिवस भरातील कडू अनुभव देखील सायली विसरली होती...तिच्या मनात एक समाधानाची लहर उठली होती....

नेहा : प्रज्वल!!रोहन!! दोघांनीही मस्त सरप्राईज दिले...
पण तुम्हाला सायलीचा बर्थडे कसाकाय माहिती...

अनुया : अगं नेहा मीच बोलता बोलता प्रज्वलला सायलीच्या बर्थडे बद्दल सांगितलं होतं ....आणि आपल्या या संध्याकाळ च्या सेलेब्रेशन चं... पण हे दोघे येतील असं स्वप्नात ही वाटलं नव्हतं... पण आल्या आल्या प्रज्वलने मला फोन📳 करून सांगितलं....

नेहा : अच्छा....

प्रज्वल : नेहा!!जरा तूझ्या मैत्रिणीला समजावून सांग ना.. ती रुसून बसली आहे... माझ्याशी नीट बोलत देखील नाहीये...

नेहा : कोण? अनुया 🤔 मला तर ती बिलकुल चिडलेली वाटत नाहीये... काय गं अनुया!!प्रज्वल काय म्हणतोय??

अनुया : हॊ बरोबर म्हणतोय तो... मी त्याच्यावर चिडली आहे ... बघ ना नेहा!! ईतक्या दिवसानंतर आणि लांबून प्रज्वल आला आहे... आणि आता हे सेलेब्रेशन झालं की निघायचं म्हणत आहे...त्याने एक दिवस तरी माझ्यासाठी काढावा ना... तसंही त्याचे काका इथे राहतात... एक दिवस थांबून उद्या त्याच्या गावी गेला तर बिघडलं कुठे...

नेहा : प्रज्वल!! अनुया बरोबर म्हणत आहे...तुला एक दिवस थांबता येईल की...

प्रज्वल : हॊ थांबलो असतो... पण रोहन अन मी सोबत आलो आहे ना.. मी त्याला दगा कसा देणार....

रोहन : ए प्रज्वल!!उगाचच माझ्यावर नाव नको टाकूस... मी जाईन की एकटा...

सायली : प्रज्वल!!असं अनुयाचं मन नको मोडूस... जास्त नाही एक दिवस थांब की...

हिला बरं प्रज्वलच्या मनाची काळजी... आम्ही ईतका जीव ओवाळून टाकतोय ते बरं नाही दिसत🙄..

प्रज्वल : बरं बाबा थांबतो....

थोडा वेळ पार्टी चालली... नंतर निघताना परत रोहनने शेक हॅन्ड करून happy बर्थडे wish केलं...त्या वेळेस सगळ्यांच्या नजरा सायलीवर खिळल्या... सायलीने नजर चोरून रोहनच्या हातात हात दिला....

हसत खेळत पार्टी संपली.... सगळेजण आपापल्या घरी गेले....
तितक्यात नेहाला अंजलीचा फोन आला...

नेहा : हॅलो अंजली!!बोल गं...

अंजली : नेहा!!प्लीज हेल्प मी... मी घर सोडून आले...

नेहा : घर सोडून आले म्हणजे??

अंजली : नेहा!!मला तू बाहेर भेटतेस का??

नेहा : बाहेर 😳 ईतक्या रात्री... अगं माझे आई बाबा मला पाठवणार नाही...

अंजली : जाऊदे मग... मला आता काहीच मार्ग उरला नाही... मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेते.. असं म्हणून अंजलीने फोन 📳कट केला...

बापरे ही अंजली असं काय बोलते आहे... तीने खरंच असं काही केलं तर 🤔  नाही नाही... आता आई बाबा रागावले तरी चालेल पण हिला थांबवणं महत्वाचे.. असा विचार करून नेहाने अंजलीला लागलीच फोन 📳लावला...

नेहा : अंजली!! तू काहीही करणार नाहीयेस समजलं ना... मी लागलीच येते... तू कुठे आहेस ते सांग..

अंजलीने तिचं live लोकेशन नेहाला पाठवलं 

नेहाने तिच्या आईवडीलांना अगदीच थोडक्यात अंजली बद्दल सांगितले...

नेहाचे बाबा : नेहा!!चल आपण दोघे सोबत जाऊन तूझ्या मैत्रिणीला घेऊन येऊ....

नेहा : ओ थँक्स अ लॉट बाबा!!

नेहाचे बाबा : अरे तुझी मैत्रीण अडचणीत आहे तिला असं वाऱ्यावर कसं सोडता येईल??चल लवकर... आता कुठे असेल ती??🤔

नेहा : बाबा!!हे तीने तिचं live लोकेशन पाठवलं आहे...

नेहाचे बाबा : नेहा!!आपल्याला टॅक्सी ने जावे लागेल.....चल मी कॅब बोलावतो...

नेहा आणि नेहाचे बाबा अंजली असलेल्या लोकेशन वर गेले..

नेहाला पाहताच अंजली नेहाच्या गळ्यात पडून रडायला लागली...

नेहा :अगं अंजली!!रडू नको प्लीज आपण जरा घरी जाऊन बोलू या का??

नेहाचे बाबा : अंजली बेटा!! असं रडू नको... चल बस टॅक्सी मध्ये घरी जाऊ...

अंजली :थँक्स काका...

तिघेही नेहाच्या घरी पोहोचले.....

नेहाच्या बाबांनी नेहाला अंजली बरोबर बोलून घे असं टॅक्सी मध्येच अंजलीला सांगितले होते...

नेहाने आधी अंजलीला जेवायला वाढले आणि नंतर बाहेर एक फेरफटका मारून येतो असं सांगून नेहा आणि अंजली दोघीही घराबाहेर पडल्या...

नेहा :हं अंजली बोल आता... तुला का गरज पडली हे पाऊल उचलण्याची...

अंजली : मी आणि विकी थ्रिल म्हणून रेव्ह पार्टीला गेलो होतो.. मला तर माहिती देखील नव्हतं की माझ्याकडून काही crime घडत आहे... किंवा असं काही करणं म्हणजे illegal असेल... त्या विक्याने 😡माझं नाव नोंदवलं होतं.... आणि नेमकं पार्टी वर रेड पडली... आम्ही पकडल्या गेलो... दुबे सर त्या वेळी देवासारखे धावून आले नी आम्हाला सोडवलं... पण प्रिन्सिपॉल सरांनी आमच्या घरी आमच्या आईवडिलांना ई-मेल द्वारे कळवलं...

नेहा : अगं अंजली!!आपण तिथे राहतो म्हणजे ती त्यांची जबाबदारी असते ना मग त्यांना ते कळवणं भागच होतं...मग पुढे काय झालं...

अंजली :अशी नोटीस आल्यावर आणखी काय परिणाम होणार?? माझ्या वडिलांनी माझ्या हातातून फोन 📳काढून घेतला...
विकीला चांगलं धमाकावलं...
माझं घराबाहेर येणं जाणं बंद केलं.... आणि माझ्यासाठी स्थळ देखील शोधत आहेत...
 माझ्या हातून चूक झाली हे मला मान्य आहे.. पण ती चूक माझ्या हातून घडत होती हे देखील मला कळत नव्हतं... माझ्या वडिलांनी ईतकी टोकाची भूमिका घ्यायला नको होती....
त्यांनी मला तितकं तरी समजून घ्यायला हवं होतं....
 मी माझ्या वडिलांच्या अश्या वागण्याने बिथरले होते... काय करू आणि काय नको असे वाटत होते..
मग काय काल माझे वडील माझ्या रूमचा दरवाजा लावायचा विसरले मला चान्स मिळाले..मग मी तिथून पळाले...
लकीली माझा फोन तिथेच खिडकी मध्ये फोन ठेवलेला होता तो उचलला आणि पळाले...
पण अंजली!!तुला माहिती आहे का? तो विक्या तो पण खूप धोकेबाज निघाला... मी आधी त्याच्या गावी गेले...
पण विक्याने मला टाळलं... तो मला भेटलाच नाही..
क्रमश :
भाग 89 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या