नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
नेहा :विक्या धोकेबाज निघाला म्हणजे?🤔 मला नाही कळालं??
अंजली :अगं मी घरून निघताना त्याने खूप मोठया बाता मारल्या... तू कशाला ईतकं सहन करत बसलीस... मला आधीच सांगायचं होतं ना... अश्या घरात तुला थांबण्याची काहीच गरज नाही... तिथून लवकर निघ... मी त्याच्या भरवश्यावर निघाले... मी बसमध्ये बसले थोडं पुढे गेले नाही की त्या विक्याने माझा फोन ब्लॉक केला...मला धड पुढेही जाता येईना अन मागेही येता येईना... तरी मला विक्याने त्याच्या घराचा पत्ता आधी कधी दिलेला होता त्या पत्त्यावर गेले तर कळालं की विकी तिथे राहतच नाही....शेवटी मला तुम्ही आठवल्या... म्हणून मी तुझ्याकड आले.. खरं सांगू नेहा!!त्या क्षणाला जर तुम्ही मला आठवल्या नसत्या तर मी स्वतःचे काही बरे वाईट करून घेतले असते...
नेहा :ए अंजली!!काहीतरीच काय बोलतेस गं??बरं झालं मग ऐनवेळी तुला आमची आठवण आली ते.... पण मला एक समजत नाही अंजली तुझं आणि विकीचं टाइमपास अफेअर आहे असंच तू म्हणायची ना... मग तू त्याच्यावर ईतका विश्वास टाकलाच कसा...
अंजली : त्याच्यावर विश्वास होता की नाही हे मला माहिती नाही.... पण माझ्या वडिलांनी मला एक टक्का देखील समजून घेतलं नाही... मला काही न विचारता माझ्या लग्नासाठी स्थळ देखील बघायला सुरुवात केली... माझी चूक झाली हे मान्य... पण मला चूक सुधारण्याची एक संधी पण देणार नाही का?? मी जेव्हा जेल मध्ये गेले तेव्हाच विचार केला होता की आता विकी शी ब्रेक अप करायचं म्हणून...
नेहा : अगं अंजली!! तू तुझ्या बाबांच्या बाजूने एकदा विचार कर....एखादी छोटी मोठी चूक असती तर त्यांनी तुला समजावून सांगितले असते.. तुझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला असता... पण झालं काय ना... एक तर" रेव्ह पार्टी रेड"हीच ब्रेकिंग news होती... त्यात आपल्या कॉलेजचे नाव आले... नशीब तुम्ही मास्क घातला होता म्हणून नाहीतर तुमचे चेहरे दिसले असते तर तो एक trauma होताच ना.... त्यातल्या त्यात रेव्ह पार्टी म्हणजे त्यात सगळ्याच वाईट गोष्टी आल्या.. नशिली पदार्थांच्या सेवनापासून तर शारीरिक संबंधा पर्यंत.... साहजिकच त्यांना टेन्शन येणार ना...
अंजली :अगं नेहा!!पण आम्ही तसं काही केलं नाही ना..
नेहा : अगं अंजली!!पण हे तुझ्या बाबांना काय माहिती... तू रेव्ह पार्टी मध्ये पकडली गेली ह्यावरून ते असेच रिऍक्ट होणार ना....कुणाच्याही वडिलांना आपल्या मुलीबद्दल असा ई-मेल आल्यावर त्यांना वाटणारच की आपण दिलेल्या स्वातंत्र्याचा आपली मुलगी गैरफायदा घेत आहे...
अंजली : हॊ अन ते दुबे सर.. त्यांनी असा डायरेक्ट मेल केला....त्याचे काय??
नेहा : अगं अंजली!! ते त्यांच्याजागी बरोबर आहेत.. त्यांच्यावर आपली जबाबदारी असते... म्हणून तर पोलीस स्टेशन ला तेच आले ना... तुम्हाला सोडवायला...मला आता सांग तुझी चूक झाली ना. मग तू दुबे सरांची तूझ्या बाबांची माफी मागितली का?
अंजली : हॊ तर... मागितली ना... पण माझे बाबा माझें काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हते...
नेहा : बरं आता तू काय ठरवलं आहेस? पुढे काय करणार आहेस??
अंजली : तेच तर काही कळत नाहीये... मी त्या विकीच्या भरवश्यावर पळाले आणि तोच पळपुटा निघाला...
नेहा : अंजली!!तुला माहिती का तू काय केलं आहेस??
अंजली : काय??
नेहा : तुझी पहिली चूक झाली असताना तू घरातून पळून जाण्याची दूसरी चूक केली आहे...
अंजली : हॊ गं.. पण आता काय करणार...
नेहा : जाऊदे आता तू काहीच विचार नको करूस.. दिवसभराच्या तानाने थकली असशील ना तू आराम कर.... उद्या सकाळी ठरवू काय करायचं ते...
अंजली : हॊ गं थकले तर मी आहेच....
दोघीही फेरफटका मारून घरी आल्या... बोलता बोलता नेहाने अंजलीच्या फोन चा पॅटर्न पासवर्ड बघुन घेतला होता...
थकल्यामुळे अंजलीला झोप लागली....
अंजली झोपी गेल्यावर नेहाने तिच्या फोन मधून तिच्या आई बाबांचा फोन नंबर काढून घेतला... अंजलीने तिच्या आई बाबांचा नंबर ब्लॉक करून ठेवलेला होता....
ही अंजली कधीच सरळ विचार करत नाही... अंजलीचे आईवडील तिची किती काळजी करत असतील... असा विचार नेहाने केला..
नेहाने तिच्या बाबांना अंजली बद्दल सगळं सांगितलं... त्यावर नेहाचे बाबा नेहाला म्हणाले अंजली आणि अंजलीच्या बाबांना दोघांनाही गीतिकाच्या मम्मीची गरज आहे... मी असं करतो... मी त्यांनाच ईथे बोलावून घेतो... म्हणजे त्यातून काहीतरी सकारात्मक घडेल....
नेहा : ओ थँक्स बाबा!!तुम्ही किती समजून घेतलं.. तुमच्याजागी दुसरं कुणी असतं तर म्हणालं असतं की अश्या मैत्रिणीसोबत राहू नको...
नेहाचे बाबा : अगं हे तुमचं अडनिडं वय त्या गोष्टीला कारणीभूत आहे....तुम्हाला वाटतं आता तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता आणि आम्हाला वाटतं की तुम्ही अजून लहान आहात.... तूमची काळजी वाटते.... तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही त्रास होऊ नये असंच आम्हाला वाटत असतं ... आम्हाला काही कटू अनुभव आलेले असतात त्यावरून आम्ही तुम्हाला बंधनात टाकत असतो...पण तुम्ही असा गैरसमज करून घेता की आम्ही तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहे... बरं आपण नंतर बोलू.. मला आधी अंजलीच्या वडिलांचा नंबर दे... मी त्यांना बोलतो... ते तीची काळजी करत असतील..
असं म्हणत नेहाच्या बाबांनी अंजलीला फोन📳 लावला....
अंजलीचे बाबा अंजली हरवल्याची तक्रार करण्यासाठी नुकतेच पोलीस स्टेशनला पोहोचले होते.... अंजलीने स्वतःच्या जीवाचे काही बरेवाईट तर केले नसेल ना या विचाराने ते धास्तावले होते..
नेहाच्या बाबांनी अंजली त्यांच्या कडे असल्याची बातमी देताच त्यांचा जीव भांड्यात पडला...अंजली जेऊन नुकतीच झोपी गेली आहे... तुम्ही देखील आता आराम करा तुम्ही सकाळी या आपण सविस्तर बोलू... अंजलीला देखील तीने केलेल्या चुकांचा पश्चाताप होत आहे... आता सगळं काही व्यवस्थित होईल असे आश्वासन नेहाच्या बाबांनी अंजलीच्या वडिलांना दिले आणि फोन ठेवला....
आता अंजली चे बाबा आणि नेहाचे बाबा दोघेही निश्चिन्त झाले होते...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang.
0 टिप्पण्या