नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
..........................................................................
सकाळी नाश्ता झाल्यावर नेहाच्या बाबांनी अंजलीला गीतिकाच्या घरी घेऊन जाण्याचे ठरवले होते... दरम्यान नेहाने गीतिकाशी कॉन्टॅक्ट करून तिच्या आईची अपॉइंटमेंट घेतली होती....
अंजलीचे वडील देखील डायरेक्ट गीतिकाच्या घरी येणार होते...
अनुया आणि प्रज्वलची एक कॉफी डेट ठरली होती ती झाल्यावर तो त्याच्या गावी जाण्यासाठी निघणार होता...
सायलीला देखील थोडावेळ का होईना आधल्या दिवशी सेलेब्रेट झालेला बर्थडे मनोमन भावला होता त्या मुळे आजचा एक दिवस अभ्यास करूच नये असंच तिला वाटत होतं....
नेहाने आज आपला काही ग्रुप स्टडी होणार नाही... असा मेसेज चौघींच्या व्हाट्सअँप ग्रुप वर टाकून दिला....
कुणाचाच अभ्यासाचा मूड नसल्याने ग्रुप स्टडी का कॅन्सल केली हे विचारण्याची तसदी देखील कुणी घेतली नाही...
नेहा, नेहाचे वडील आणि अंजली तिघेही गीतिकाच्या घरी पोहोचले...
अंजलीचे वडील तिथे येणार याची काडीमात्र कल्पना अंजलीला नव्हती...
अंजलीचे वडील येईपर्यंत गीतिकाच्या आईने अंजलीचे समुपदेशन केले त्यात अंजलीच्या अश्या विचित्र वागण्याचे मूळ केवळ कॉलेज मध्ये झालेली निवडणूक आहे हे लक्षात आले....
गीतिकाच्या आईने नेहाला बोलावून अंजलीबद्दल सांगितले...
नेहा : काकू!!मला वाटलंच होतं.... म्हणूनच मी आता कॉलेज gathring साठी राजीनामा देऊन अंजलीलाच गर्ल्स representative करणार होते...
गीतिकाची मम्मी : नेहा!!अगं पण हा तुझ्यावर अन्याय नाही का??
नेहा : अन्याय आहे की नाही माहिती नाही... कारण माझ्यापेक्षा जास्त मते अंजलीला पडली होती... पण ही गोष्ट वेगळी आहे की तिला बरीच मते ही बोगस voting मुळे पडली होती... पण खरं सांगू का काकू!!मला कुठल्याही पदाची हौस नाहीये..... आणि मी राजीनामा देण्याने जर अंजली सुधारत असेल तर मला तर आनंदच होईल...
गीतिकाची मम्मी : नेहा!! I am proud of you dear... मी खूप लकी आहे की माझ्या मुलीला तुझ्यासारखी मैत्रीण भेटली....
नेहा : थँक्स अ लॉट काकू!! पण गीतिका देखील खूप समजूतदार आहे... तिच्यामुळे तर आम्हाला तुमचे समुपदेशन मिळत आहे.....
तितक्यात अंजलीचे वडील तिथे आले....त्यांना नेहाचे वडील घेऊन आले होते...
अंजली : बाबा!!तुम्ही ईथे?? ओ आता कळालं तुम्हाला नेहाने बोलावलं ना... नेहा!! यार मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... आता माझं आयुष्य वाया जाणार...माझे बाबा माझं लग्न लाऊन देणार...
नेहा :अंजली!!तू शांत हॊ... तू म्हणतेस तसं काहीही होणार नाही समजलं ना... आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे....
अंजली : काय खाक व्यवस्थित होणार आहे... बघ ते बाबा माझ्या कडे किती रागाने बघत होते....
अंजलीचे वडील अंजली जवळ जाणार तितक्यात नेहाच्या बाबांनी त्यांना आवाज देऊन गीतिकाच्या मम्मी च्या केबिन मध्ये नेलं....
अंजली : नेहा!! मी निघते... मला बाबांसोबत घरी जायचं नाहीये... मी घरी गेले की ते माझं शिक्षण बंद करणार आता..
नेहा : अंजली!!तू चिडू नकोस... तुझे बाबा तसं काहीच करणार नाहीत.. त्या साठी तर माझे बाबा तुझ्या बाबांना गीतिकाच्या मम्मी कडे घेऊन गेले... ते बघ ती गीतिका छान इडली सांबार घेऊन येत आहे... आपण शांतपणे नाश्ता करू...
गीतिका : hi अंजली!!हे घे हा नाश्ता....
अंजलीचा चेहरा अजूनही पडला होता...
नेहा : अंजली!!जस्ट चील यार...
गीतिकाची मम्मी : या बसा!!
अंजलीचे बाबा : मला ना अंजलीला वाढवण्यात मी कुठे चुकलो तेच कळत नाहीये.... मी तिला ती जे म्हणेल ते देत गेलो... कधीच तिला कुठली बंधने घातली नाही त्याचा हा परिणाम आहे असं मला स्पष्टपणे वाटायला लागलं...
गीतिकाची मम्मी : हे बघा अंजलीचे बाबा!!तुम्ही असा नकारात्मक विचार करू नका... अंजली फक्त वाहवत गेली इतकंच आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये... ती या सगळ्या वाईट गोष्टीतून बाहेर पडू शकते पण त्या साठी तिला तूमची आणि तिच्या आईची साथ हवी आहे...
अंजलीचे बाबा : तुम्ही म्हणत आहात की अजूनही वेळ गेली नाहीये म्हणून... पण ती तर घर सोडून पळून गेली ना...
गीतिकाची मम्मी :हॊ पळून आली... पण तुमच्या आणि तिच्या नशिबाने ती नेहाकडे आली ना...हे बघा!! तुम्ही येण्यापूर्वी मी अंजलीशी बोलले...
तिला असं वाटत आहे की कॉलेज निवडणुकीच्या वेळी तिच्यावर अन्याय झाला आहे.... त्या मुळे ती एकटी पडली...त्यातच त्या विकीने तिला प्रपोज केलं... अंजलीने होकार दिला..... आणि तिथेच ती चुकली... मग काय त्या चक्रव्युव्हात अडकून गेली.... पण तुमचं नशीब चांगलं आहे की आतापर्यंत तिच्यासोबत काही विपरीत घडलं नाही... आता फक्त तुम्हाला ईतकंच करावं लागेल की एकदम टोकाची भूमिका न घेता तिला शिकू द्या...थोडा बदल ती स्वतः मध्ये करेल थोडा बदल तुम्ही वागणुकीत करा...
अंजलीचे बाबा : पण पुन्हा असं वाकडं पाऊल अंजली उचलणार नाही... असं कशावरून...
गीतिकाची मम्मी : ज्या विकीच्या भरवशावर अंजली घरून पळाली... त्या विकीने तिला चांगला झटका दिला आहे... आणि दूसरी गोष्ट म्हणजे नेहा देखील तिच्या पदाचा राजीनामा देऊन अंजलीला गर्ल्स representative करणार आहे....त्याने काय होईल... अंजलीला जे वाटत आहे ना की तिच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे... ती तिच्या मनातली एक सल दुर होईल... एक मिनिट मी नेहाला बोलावते.... असं म्हणून गीतिकाच्या मम्मीने नेहाला केबिन मध्ये बोलावून घेतलं...
नेहा: काका प्लीज अंजलीला एक संधी द्या... ती पुढे असं वागणार नाही याची मी गॅरेंटी देते... आणि समजा अंजली तसं काही चुकीचं वागली तर मी स्वतः तुम्हाला कळवते....मग तर झालं.... पण काका तिचं शिक्षण थांबवू नका....
नेहाची कळवळ पाहून अंजलीच्या बाबांच्या डोळ्यातुन अश्रू आले... आणि म्हणाले बेटा!!तुझ्यासारखी मैत्रीण असल्यावर आता मला काहीच चिंता नाही...
अंजलीच्या बाबाचे सकारात्मक बोलने ऐकून लागलीच अंजली आणि गीतिकाला केबिन मध्ये बोलवले गेले...
अंजली चे बाबा :अंजली बेटा!!मी चुकलो,मी तुझ्याशी असं टोकाचं वागायला नको होतं..ये बेटा जवळ ये.... तुझ्या आईने पण तू हरवल्यापासून अंथरून धरलं आहे
अंजली : सॉरी बाबा!!मी चुकले... मी असं वागायला नको होतं.... आता मी प्रॉमिस करते की मी परत अशी चूक कधीच नाही करणार....
क्रमश :
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या